Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedखजिना विहीर मंडळाचा 'ललिता त्रिपुरसुंदरी – भंडासूर वध' सजीव देखावा*  सदाशिव...

खजिना विहीर मंडळाचा ‘ललिता त्रिपुरसुंदरी – भंडासूर वध’ सजीव देखावा*  सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळाचे ९६ वे वर्ष 

 

 

पुणे : अधर्म, अहंकार आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवगणांना मुक्त करण्यासाठी ललिता त्रिपुरसुंदरी देवी आपल्या शक्तिरूपातून प्रकट होतात. त्यांच्या सोबत मंत्रीणी देवी आणि वाराही देवी अधर्माचे प्रतीक असलेल्या भंडासूर राक्षसाशी महासंग्राम करतात आणि अखेरीस त्याचा वध करून धर्म व सत्याचा विजय प्रस्थापित करतात, असा स्त्री शक्ती चा जागर करणारा ‘ललिता त्रिपुरसुंदरी – भंडासूर वध’ हा सजीव देखावा सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळातर्फे साकारण्यात आला आहे.

 

अहंकार, अन्याय आणि अत्याचार कितीही सामर्थ्यवान वाटले, तरी सत्य, धर्म आणि स्त्रीशक्तीसमोर त्यांचा पराभव शेवटी निश्चित असतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सत्याची साथ द्यावी, हा या सादरीकरणातील संदेश आहे. शुभम सोनार आणि राकेश रामनकाटे यांसह युवा कलाकारांनी यामध्ये सादरीकरण केले आहे. मंडळाचे ९६ वे वर्ष असून गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने हा सजीव देखावा पाहण्यासाठी यावे, असे आवाहन खजिना विहीर तरुण मंडळ अध्यक्ष ओम सुरेश कासार यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments