भारतीय एस.एम.ई शाश्वततेकडे व्यावसायिक यशाकरिता एक प्रमुख चालक म्हणून पाहत आहेत: डी.एच.एल एक्सप्रेस ने जागतिक शाश्वतता सर्वेक्षण (ग्लोबल सस्टेनेबिलिटी सर्व्हे) 2024 सुरू केले

तारां कित Avatar

भारतातील 68% आणि चीन मधील 61% एस.एम.ई यांचे मानणे आहे की शाश्वत वितरण पर्याय उपलब्ध करून दिल्याने त्यांचे व्यावसायिक यश वाढेल
वित्तीय सेवा आणि फॅशन क्षेत्र हे शाश्वत पद्धतींसाठी कार्यवाहक अर्थसंकल्प (ऑपरेटिंग बजेट) वाटप करण्याची खूप इच्छा बाळगतात
एस.एम.ई च्या समोर अंतर्गत व ग्राहकांनी खरेदी करणे कायम सुरू राहणे हे एक मोठे आव्हान बनले आहे
“सस्टेनेबिलिटी मॅटर्स: डी.एच.एल एक्सप्रेस ग्लोबल सर्व्हे ऑन स्मॉल बिझनेस” या विनामूल्य ईबुक मध्ये अधिक माहिती देण्यात आलेली आहे जी लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांकडून (एस.एम.ई) माहिती प्रदान करते

मुंबई/ बॉन, 5 डिसेंबर : लहान व मध्यम उद्योगांसाठी (एस.एम.ई) शाश्वतता ही धोरणात्मक गरज बनलेली असून यामुळे त्यांच्या दीर्घकालीन मूल्यावर व विश्वासार्हतेवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे डी.एच.एल एक्सप्रेसच्या नवीन आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात पहायला मिळत आहे. पुरवठा साखळी कामाकाजांमध्ये (ऑपरेशन्समध्ये) शाश्वततेचे प्राधान्य वाढत चाललेले आहे आणि ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे म्हणून डी.एच.एल एक्सप्रेस ने यू.के, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, जपान, मेक्सिको, कॅनडा आणि भारत या 11 जागतिक बाजारपेठांमधील 5,000 एस.एम.ई निर्णयकर्त्यांचे सखोल सर्वेक्षण केले.

शाश्वतता त्यांच्या व्यवसायासाठी “खूप महत्वाची” किंवा “फारच महत्वाची” आहे असे 95% भारतीय एस.एम.ई मानत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे जागतिक सरासरी 75% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे आणि भारतीय व्यवसायांची शाश्वततेसाठी असलेली मजबूत बांधिलकी स्पष्ट करते.

“अनेक व्यवसायांच्या कार्यसूचीमध्ये (अजेंडांमध्ये ) शाश्वतता आता अग्रस्थानी आहे. परंतु शाश्वतता धोरण विकसित करण्याचे व अंमलात आणण्याचे आव्हान बऱ्याचदा बळजबरी वाटू शकते – कारण सर्वेक्षणाला उत्तर देणाऱ्या बऱ्याच जणांनी प्रवासाची सुरुवात कोठून करावी हे माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. डी.एच.एल एक्सप्रेस कमी उत्सर्जन शिपिंग उपाय प्रदान करण्याच्या समर्पित पोर्टफोलिओसाठी ओळखली जाते आणि एस.एम.ई हे डी.एच.एल एक्सप्रेस सारख्या विश्वासार्ह लॉजिस्टिक्स अग्रणी सोबत भागीदारी करून स्वत:चे स्थान प्रस्थापित करू शकतात जेणेकरून त्यांना व्यवहार्य, स्पर्धात्मक राहता येईल आणि दीर्घकालीन वाढीची खात्री करता येईल,” असे डी.एच.एल एक्सप्रेस चे कार्यकारी उपाध्यक्ष ग्लोबल कमर्शिअल ग्रीव्हन म्हणतात.

आर. एस. सुब्रमण्यम, एस.व्ही.पी, दक्षिण आशिया, डी.एच.एल एक्स्प्रेस म्हणतात, “शाश्वतता आता व्यवसायांसाठी ‘चांगली’ राहिलेली नाही, विकासाला चालना देण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी ही गरज बनली आहे. “भारतीय एस.एम.ई ने हे जाणले असून त्यांच्या कामकाजात शाश्वत पद्धतींचा समावेश करण्यासाठी ते सक्रिय पावले उचलत आहेत. खरे पाहता, डी.एच.एल मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्राहक जागतिक सरासरी 23% च्या तुलनेत शाश्वत शिपिंगसाठी अधिक पैसे देण्यास तयार असतील, असे भारतातील 51% एस.एम.ई आणि चीनमधील 47% एस.एम.ई चे मानणे आहे, हे आम्ही पाहत आहोत. हे शक्य आहे, कारण भारत आणि चीन पॉवरहाऊसची निर्यात करत आहेत आणि येथील एस.एम.ई शाश्वत धोरणांकडे झुकून पाश्चिमात्य ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.”

या संशोधनात किरकोळ, ग्राहकोपयोगी वस्तू, व्यावसायिक सेवा, अभियांत्रिकी, फॅशन, तंत्रज्ञान, रसायने, जीवन विज्ञान आणि आरोग्यसेवा व आर्थिक सेवा, या नऊ क्षेत्रांमध्ये व्यवसायांनी भाग घेतला आणि एसएमईंना विकसित होत असलेले भूदृश्य पार करण्यास व नवीन संधींचा लाभ घेण्यास मदत करणारी मौल्यवान माहिती उपलब्ध करून दिली. याचा परिणाम स्वरूप तयार झालेले ईबुक एस.एम.ई वर शाश्वततेचा होणारा परिणाम आणि त्यांच्या पुरवठा साखळी कामकाजात (ऑपरेशन्समध्ये) वाढत्या प्राधान्यक्रमाचा शोध लावते.

भारतात केलेल्या सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्षांमध्ये पुढील गोष्टी सामील आहेत :

भारत आणि चीनमधील एस.एम.ई साठी शाश्वतता फारच महत्वपूर्ण आहे: 72% चीनी एस.एम.ई आणि 59% भारतीय एस.एम.ई म्हणाले की शाश्वतता त्यांच्या व्यवसायासाठी “फारच महत्वपूर्ण” आहे. हे प्रमाण जागतिक सरासरी 35% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे.

शाश्वततेसाठी मजबूत ग्राहक समर्थन: 51% भारतीय एस.एम.ई चा असा विश्वास आहे की त्यांचे ग्राहक शाश्वत शिपिंगसाठी “फारच” किंवा “खूप” अधिक पैसे देण्यास तयार आहेत, जे जागतिक सरासरी 23% पेक्षा लक्षणीय प्रमाणात जास्त आहे.

शाश्वतता व्यावसायिक यशास चालना

Tagged in :

तारां कित Avatar