संतवाणी’ तून उलगडला भक्तीगीतांचा महिमा श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे उत्सवाचे आयोजन

तारां कित Avatar

पुणे : माझे माहेर पंढरी…, शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा…, माझ्या भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची…, इंद्रायणी काठी देवाची आळंदी… अशा भक्तीगीतांनी कसबा पेठेतील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर भक्तीमय झाला. सांगीतिक कार्यक्रमाचे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाचा समारोप झाला.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पौराणिक महत्त्व असलेल्या पुण्याच्या कसबा पेठेतील प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती जन्माष्टमीच्या दिवशी उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवात पं. आनंद जोशी यांच्या ‘संतवाणी’ या भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पं. आनंद जोशी यांनी विविध भक्तीगीतांचे सादरीकरण केले. त्यांना तेजस जोशी (तबला), वरद वाधवडे (हार्मोनियम), सौमिनी देवरे (व्हायोलिन), विवेक कुलकर्णी (तालवाद्य) यांची उत्कृष्ट साथ मिळाली. तसेच अंजली जोशी-हिंगणीकर, तन्वी पाटील, आणि श्रेयस जोशी यांनीही साथसंगत केली. डॉ. सरोज देवरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

कार्यक्रमाची सुरूवात वक्रतुंड महाकाय या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली… माऊली माऊली… या गीतांनी कार्यक्रमाच्या पूर्वाधात भाविक भक्तीमय झाले. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… माझे माहेर पंढरी या गीतांनी मंदिराचा परिसर भक्तीमय झाला. यावेळी कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

फोटो ओळ ः श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संतवाणी कार्यक्रमात सादरीकरण करताना पं. आनंद जोशी व सह कलाकार.

Tagged in :

तारां कित Avatar