Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशाल मेगा मार्ट लि.ची प्राथमिक समभाग विक्री येत्या ११ डिसेंबरपासून सुरू

विशाल मेगा मार्ट लि.ची प्राथमिक समभाग विक्री येत्या ११ डिसेंबरपासून सुरू

दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ७४ ते ७८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित.

· बोली / ऑफरचा कालावधी बुधवार, ११ डिसेंबर २०२४ ते शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली / ऑफरचा दिवस मंगळवार, १० डिसेंबर २०२४.

राष्ट्रीय, 9 डिसेंबर २०२४ : विशाल मेगा मार्ट लिमिटेड (व्हीएमएम) या कंपनीतर्फे प्राथमिक समभाग विक्री योजना (आयपीओ) जाहीर करण्यात आली असून ती बुधवार, ११ डिसेंबर २०२४ खुली होईल व शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ रोजी बंद होईल. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची विक्री या योजनेत होणार असून त्यातून ८,००० कोटी रुपये उभे राहतील. तसेच केदारा कॅपिटलच्या अधिपत्याखालील समायत सर्व्हिसेस एलएलपी या कंपनीकडे असलेल्या इक्विटी शेअर्सचाही या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेलच्या स्वरुपात समावेश असणार आहे.

व्हीएमएम ही कंपनी भारतातील आघाडीच्या रिटेल कंपन्यांपैकी एक आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात तिने ८.९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. देशातील ३० राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४१४ शहरांत या कंपनीची ६४५ दुकाने आहेत. त्यांत एकूण १.१५ कोटी चौ.फूट जागा व्यापली गेली आहे. व्हीएमएमच्या या स्टोअर्समध्ये विविध प्रकारची उत्पादने मिळतात. तयार कपडे ४५ टक्के, सर्वसाधारण वस्तू २८ टक्के आणि दैनंदिन वापरावयाच्या वस्तू २७ टक्के असे या कंपनीचे विक्रीचे प्रमाण आहे.

· फायदेशीर आणि भांडवल-कार्यक्षम वाढीची यशस्वी वाटचाल

· एका स्टोअरमध्ये विविध श्रेणीतील उत्पादनांच्या विक्रीत दुहेरी अंकाइतकी वाढ

· स्वतःच्या ब्रँड्सच्या वैविध्यपूर्ण आणि वाढत्या पोर्टफोलिओसह अन्य उत्पादनांच्या श्रेणींमध्ये विशिष्ट किंमतींचे धोरण राबविण्यात अग्रेसर

· भांडवल-कार्यक्षम, ओम्नी-चॅनल प्लॅटफॉर्म

अँकर गुंतवणुकदारांसाठी बिड / ऑफरचा कालावधी मंगळवार, दि. १० डिसेंबर २०२४ रोजी सुरू होईल व त्याच दिवशी बंद होईल. आयपीओतील इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसईवर करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. या ऑफरसाठी पुढील कंपन्यांना बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) म्हणून नेमण्यात आले आहे :

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.

· ऑफरमधील ५० टक्के वाटा हा संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखून ठेवण्यात आला असून त्यांना विशिष्ट प्रमाणानुसार शेअर्सचे वाटप केले जाईल.

· ऑफरमधील १५ टक्के वाटा बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

· ऑफरमधील ३५ टक्के वाटा किरकोळ वैयक्तिक बोलीदारांसाठी उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments