मुंबई, जानेवारी 18, 2023: ‘गोल्फलॅण्ड अॅट वानाहा’चा पहिला टप्पा यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर, भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट विकासकांमध्ये गणल्या जाणाऱ्या शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट (एसपीआरई) कंपनीने, पुण्याच्या पश्चिमेकडील बावधनजवळील ‘वानाहा’मधील गोल्फलॅण्डच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. आजच्या तारखेला कंपनीने मध्यम विभागात (याहावी व स्प्रिंग्ज) आणि अव्वल विकास विभागात (गोल्फलॅण्ड फेज 1) 1500 कोटी रुपये किमतीच्या 1800हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री केली आहे.
अंदाजे 600 कोटी रुपये उत्पन्नाची संभाव्यता असलेला गोल्फलॅण्डचा दुसरा टप्पा पुण्यातील उच्चभ्रू घरांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून सुरू केला जात आहे. ग्राहकांनी आजवर कधीच घेतला नसेल असा चैनीचा (लग्झरी) अनुभव त्यांना ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याची एसपीआरईची इच्छा आहे. ह्या प्रकल्पात 2बीएचके, 3बीएचके + i खोली (अभ्यासिका किंवा स्टडी), 4बीएचके ∞ (देवघर + अभ्यासिका + कर्मचाऱ्यांसाठी खोली), आणि टाउनहाउसेस अशा प्रकारांतील घरे आहे. अशी 276 वैशिष्ट्यपूर्ण घरे ग्राहकांना 1.48 कोटी रुपयांपासून उपलब्ध आहेत.
350हून अधिक एकर मोकळे सोडलेल्या 1000 एकरांहून अधिक जागेत पसरलेल्या भारताच्या सर्वांत मोठ्या वसाहतीतील VANAHA हे एक भव्य संमिश्र वापराचे निवासी, व्यावसायिक व रिटेल जागांचे संकुल आहे. भव्य जीवनशैलीशिवाय येथील निवासी क्लबहाउस, जिम, स्पा, बहुपयोगी कोर्ट, सुंदररित्या रचना केलेली उद्याने व प्रख्यात ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे नयनरम्स दृश्य आदी लाभांचा आनंद घेऊ शकतात. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स हे भारतातील अव्वल दर्जाचे गोल्फ व मनोरंजन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातील एकमेव 18-होल खासगी गोल्फ कोर्स येथेच आहे.
शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या व्यवसाय विभागाचे प्रमुख तसेच प्रमुख गुंतवणूक अधिकारी श्री. निरव दलाल ह्या नवीन टप्प्याच्या घोषणेबद्दल म्हणाले, “वानाहाच्या लक्षणीय यशामुळे अप्रतिम उत्पादने ग्राहकांना देण्याचा आमचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांचा आमच्या ब्रॅण्डवरील विश्वास व आत्मविश्वासही ह्यातून दिसून येतो. पुण्यातील आकाशरेखा (स्काललाइन) आणि जीवनशैली बदलण्याप्रती शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटची बांधिलकीही गोल्फलॅण्ड फेज 2 मधून अधोरेखित होते. आरामदायी जीवनशैलीच्या क्षेत्रात ह्यामुळे नवीन मापदंड स्थापन केला जाईल अशी आशा आम्हाला वाटते. आमच्या ग्राहकांकडून सातत्याने मिळत असलेला पाठिंबा आम्हाला सातत्याने अप्रतिम उत्पादने देण्यासाठी व अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत पुण्यातील रिअल इस्टेट उद्योगामध्ये लग्झरी व प्रीमियम निवासांच्या प्रकल्पात स्थिर वाढ दिसून येत आहे. 2024 मध्ये पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठ आणखी समृद्ध होण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण वाढीची क्षमता ह्या बाजारपेठेत आहे. शिवाय, जोरदार मागणीच्या बळावर पुणे बाजारपेठेत किमतींचे अधिमूल्यन होत आहे आणि घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी गुंतवणुकीची हीच योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते.”
हिंजवडी, महाळुंगे-मान हाय-टेक सिटी पार्क आणि बाणेर ह्या आयटीच्या प्रमुख केंद्रांजवळील मोक्याच्या जागी असलेल्या वानाहाला व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, ह्या संकुलाच्या आजूबाजूला उत्तमरित्या प्रस्थापित अशा सामाजिक व नागरी पायाभूत सुविधा आहेत. फ्लेम युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ह्यांसारख्या शिक्षणसंस्था, रुग्णालये व व्यावसायिक केंद्रांचा ह्यामध्ये समावेश होतो. आशियातील आघाडीच्या 5 गोल्फ कोर्सेसमध्ये गणले जाणारे ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स येथेच आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाबाबतचे आकर्षण अधिकच वाढले आहे.
शांतता व शहरातील मुख्य भागांशी संपर्क ह्यांचा अचूक समतोल वानाहामध्ये साधला गेला आहे. वानाहातील रहिवाशांना खोऱ्यातील वनस्पती व प्राण्यांच्या 400हून अधिक प्रजातींनी समृद्ध पर्यावरणाचा सहवास दिला जात आहे. परिश्रमपूर्वक रचना करण्यात आलेली घरे वातावरण ताजेतवाने राखण्यात मदत करतात. शिवाय, मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत हा प्रकल्प आहे, हिंजवडी व बाणेर आयटी केंद्रे येथून जवळ आहेत आणि सुस्थापित सामाजिक व नागरी पायाभूत सुविधांना हा भाग जोडलेला आहे. ह्यांत अनेक शिक्षणसंस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुले, रिटेल झोन्स व मॉल्सचा समावेश होतो.
दळणवळणाच्या सुविधा आणखी वाढत आहेत. चांदणीचौक ते विमाननगर ह्या मार्गावरील आगामी मेट्रो लाइन (क्रमांक 2), प्रस्तावित 10-पदरी मुंबई-बेंगळुरू महामार्ग, प्रस्तावित 6-पदरी पौड-महाड राष्ट्रीय महामार्ग, चांदणीचौकातील प्रस्तावित 8-पदरी उड्डाणपूल आणि प्रस्तावित 14-पदरी रुंद रिंग रोड ह्या सर्व प्रकल्पांमुळे येथील रहिवाशांसाठी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.


