Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवात लेखक-वाचक संवाद

पुणे पुस्तक महोत्सवात लेखक-वाचक संवाद

पुणे, १८ डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवात ‘लिटररी कॉर्नर’ येथे ‘१०८ मॅनेजमेंट सूत्राज इन्स्पिरेशन’ पुस्तकाचे लेखक डॉ रवींद्र मिनियार आणि ‘ट्विन विन सिच्युएशन’ पुस्तकाचे लेखक चेतन जोशी यांनी ‘मेकिंग इन्फॉरम्ड डिसिजन : ए की टू सक्सेस’ या विषयावर वाचकांशी संवाद साधला. ‘चुकीचे निर्णय कसे टाळावेत, वाटचालीची योग्य दिशा कोणती असावी, यासंदर्भात विचार प्रेरणेतून पुस्तक लेखन केले,’ असे चेतन जोशी यांनी सांगितले. आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विवेकबुद्धी, भावना, विश्वास यांचा वापर कसा व कधी करावा, हे समजल्यास यशस्वी होता येईल,’ असेही ते म्हणाले. ‘गीतेतील ‘कर्मन्येवा धिकारस्ते’ या श्लोकाचा चुकीचा अर्थ लोक काढतात. वास्तविक, कर्मावर लक्ष केंद्रित करावे तर इच्छित फळ मिळेल असा त्याचा अर्थ आहे,’ असे मिनियार यांनी सांगितले.

….

बालवयातच वाचनाचे संस्कार

पुणे, १८ डिसेंबर : ‘बालवयातच मुलांवर वाचनाचे संस्कार होतात. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभाग व ग्रंथालय विभागाने शाळा-महाविद्यालयांत वाचन चळवळ राबवाबी,’ असे मत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी बुधवारी व्यक्त केले.
राज्याचे सेवानिवृत्त सहायक ग्रंथालय संचालक श्याम दाईंगडे लिखित ‘सार्वजनिक ग्रंथालये आर्थिक विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘लिटररी कॉर्नर’ येथे करण्यात आले. विद्यमान ग्रंथालय सहायक संचालक प्रशांत पाटील आणि विजय कोलते यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ‘राज्यात बारा हजार ग्रंथालये असून, ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही सरकारी योजना असतानाही, ३५ हजार खेड्यांपर्यंत ग्रंथालये पोहोचलेली नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या प्रभावामुळे पुस्तक वाचन कमी झाले असून, लहानपणीच मुलांवर वाचनाचे संस्कार करा,’ असे आवाहन कोलते यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments