Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्युॲन्डआय तर्फे पुण्यात शैक्षणिक कार्यक्रम संपन्न

क्युॲन्डआय तर्फे पुण्यात शैक्षणिक कार्यक्रम संपन्न

पुणे,19 डिसेंबर 2024 : क्युॲन्डआय (इंडिया टुडे समुहाच्या प्रर्वतकांकडून स्थापन झालेली) तर्फे क्युॲन्डआय टुडे या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात नुकतेच करण्यात आले होते.शिक्षणाचे भविष्य यावर भर देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये 50 हून अधिक शाळांचा समावेश होता व शैक्षणिक नेतृत्व आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने संस्थांच्या सज्जतेसाठी शैक्षणिक क्षेत्रात अभिनवता आणि सहकार्यावर भर देण्यात आला.तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण,शिक्षकांची बदलत चाललेली भूमिका आणि भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे कौशल्य या विषयावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरूवात विविध शाळांमधील संचालक,प्राचार्य यांच्या स्वागताने झाली.त्यानंतर द फ्युचर ऑफ पर्सनलाइज्ड लर्निंग : हाऊ टेक्नोलॉजी इज चेंजिंग द क्लासरूम्स या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संचालक आणि प्राचार्यांना पुरस्कार प्रदान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशाबाबत बोलताना थॉमसन डिजिटल आणि क्युॲन्डआय चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय सिंग म्हणाले की,क्युॲन्डआय टुडे हे शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वासाठी अंर्तदृष्टी आणि सहकार्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने भविष्यातील शिक्षणाला आकार देण्याप्रती समर्पितता पाहणे हे प्रेरणादायी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments