पिंपरी, दि. २७ डिसेंबर २०२४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ, उपलेखापाल महेश निगडे, अविनाश ढमाले, मुख्य लिपीक सुप्रिया सुरगुडे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


