Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या STeRG टीमने अंतराळ पेलोड लॉन्च करून इतिहास रचला

एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या STeRG टीमने अंतराळ पेलोड लॉन्च करून इतिहास रचला

पुणे: एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी-डब्ल्यूपीयू) स्पेस टेक्नोलॉजी रिसर्च ग्रुपने (STeRG) अंतराळ संशोधनाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या टीमने PSLV-C60 रॉकेटच्या माध्यमातून आपला पहिला पेलोड, STeRG-P1.0, यशस्वीरीत्या लॉन्च केला. इस्रोच्या सहकार्याने पार पडलेल्या या मोहिमेने युनिव्हर्सिटीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून देशाच्या अंतराळ संशोधनात एक मौलिक योगदान दिले आहे.
हे पेलोड विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी पूर्णपणे स्वनिर्मित पद्धतीने विकसित केले आहे. हे COTS MEMS आधारित 9-ऍक्सिस IMU सेन्सर्स आणि ARM आधारित मायक्रोकंट्रोलर्सच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्यासाठी, अत्याधुनिक डेटा फिल्टरेशन तंत्रांचा वापर करण्यासाठी, तसेच उच्च-रिझोल्यूशन डेटा अधिग्रहण व संचयनासाठी डिझाइन करण्यात आले होते.
हे संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांनी स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केली आहे. “हे पेलोड विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे. कोणत्याही तयार सर्किट्सचा आधार न घेता कमी खर्चात ही टिकाऊ प्रणाली तयार करण्यात आली आहे. हे सोल्यूशन स्वस्त असून अटिट्यूड (सॅटेलाईट ची स्थिती) माहिती करण्यासाठी एक प्रभावी पर्याय ठरले आहे,” असे डॉ. पारुल जाधव, प्रोग्राम डायरेक्टर, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग यांनी सांगितले. “STeRGच्या विद्यार्थ्यांनी गेल्या 38 आठवड्यांपासून यावर कठोर परिश्रम घेतले आहेत. आम्हाला या कामगिरीचा अभिमान आहे, आणि भविष्यातही या संशोधनाला चालना देत राहू,” त्या पुढे म्हणाल्या.
एमआयटी-डब्ल्यूपीयू मधील संशोधन आणि विकास चे डीन, प्रा. डॉ. मुरली चावली यादव यांनी या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “PSLV-C60 वर COTS आधारित एव्हिओनिक्स चाचणी करणारे हे पेलोड आमच्या टीमच्या हुशारी आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. या यशस्वी मोहिमेमुळे तरुणांच्या प्रतिभेला चालना मिळाली असून, ही आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.”
विद्यापीठाचा विद्यार्थी अचिंत्य चव्हारे जो प्रकल्प संस्थापक आहे त्यांनी ऐतिहासिक क्षणाबाबत सांगितले, “STeRG आणि या प्रकल्पाचा संस्थापक म्हणून ही पहिली मोहीम यशस्वी होताना पाहणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या सततच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे. आम्ही इस्रो आणि इन-स्पेसचेही खूप आभारी आहोत, ज्यांनी आम्हाला अंतराळात संधी उपलब्ध करून दिली. या पेलोडमुळे अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पुढील संशोधन आणि विकासासाठी एक ठोस पाया तयार झाला आहे.”
हार्डवेयर टीम चा प्रथमेश फाटक म्हणतो “या प्रकल्पामुळेआमच्या वि द्यापीठात अंतराळ तंत्रज्ञानासाठी एक इकोसि स्टम तयार झाली आहे. हा अंतराळ
प्रयोग भवि ष्यात आम्हाला एक कि फायतशीर क्यूबसॅट वि कसि त करण्यात मदत करेल. यामुळेआमच्या सहकाऱ्यांना आणि अध्यापकमंडळींना मौल्यवान प्रत्यक्ष अनुभव मि ळाला आहे. या मोहि मेतील मि ळवलेल्या ज्ञानामुळेआम्ही उपग्रह वि कासाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधि क सक्षम आहोत आणि वाढत्या अंतराळ उद्योगात योगदान देण्यासाठी सज्ज आहोत.”
इस्रो आणि इन-स्पेस यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन दिले आहे. डिझाइन प्रक्रिये दरम्यान इस्रोच्या अधिकाऱ्यांनी मौल्यवान सूचना दिल्या, ज्यामुळे या पेलोडचे डिझाइन अधिक चांगले करण्यात मदत झाली.
आगामी काळात STeRG टीमने विद्यापीठाचा पहिला क्यूबसॅट विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा उपग्रह विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून डिझाइन केलेल्या नाविन्यपूर्ण प्रायोगिक पेलोड्ससह सादर केला जाईल. याशिवाय, पेलोड्सचे ट्रॅकिंग आणि संवाद साधण्यासाठी समर्पित ग्राउंड स्टेशन तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेणे या त्यांच्या प्रमुख योजना आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments