Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवी एयर इंडिया, न्यूयॉर्कमध्ये, पाहा काही खास क्षणचित्रे

नवी एयर इंडिया, न्यूयॉर्कमध्ये, पाहा काही खास क्षणचित्रे

एयर इंडियाच्या कॅबिन क्रुने न्यूयॉर्क शहरातील काही खास क्षणांची पुनःनिर्मिती केली आणि लोकप्रिय सिनेमांतल्या ठिकाणी भेट देऊन एयर इंडियाचे न्यूयॉर्क (जेएफके) आणि नेवार्कमधील (ईडब्ल्यूआर) आगमन साजरे केले

गुरुग्राम २ जानेवारी २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने आज दिल्ली आणि नेवार्कच्या लिबर्टी इंटरनॅशनल एयरपोर्टदरम्यान (ईडब्ल्यूआर) आपल्या प्रमुख A350-900 एयरक्राफ्टच्या नॉन- स्टॉप फ्लाइट्स सुरू केल्या. काहीच दिवसांपूर्वी म्हणजे १ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीने एयर इंडियाची A350 सेवा दिल्ली- न्यूयॉर्कदरम्यान (जेएफके) सुरू केली होती.

यासह एयर इंडियाद्वारे भारताची राजधानी आणि न्यूयॉर्कदरम्यान सर्व नॉन- स्टॉप विमानवाहतूक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या मार्गावर कंपनीचे A350 एयरक्राफ्ट नव्या इंटेरियर्ससह उपलब्ध करण्यात आले असून त्यात बिझनेस क्लास व प्रीमियम इकॉनॉमी कॅबिनमधील खासगी स्वीट्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुरस्कारविजेती, नवी इन- फ्लाइट एंटरटेनमेंट (आयएफई) सिस्टीम, अधिक दर्जेदार केटरिंग आणि नवीन सर्व्हिसवेयर्सही त्यात उपलब्ध करण्यात आले आहेत.

लाँच सेलिब्रेशन करण्यासाठी एयर इंडियाच्या कॅबिन क्रुने न्यूयॉर्क शहरातील काही अविस्मरणीय सिनेमॅटिक क्षणांची निर्मिती केली. लोकप्रिय बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांतील ठिकाणीही या कॅबिन क्रुने सेलिब्रेशन केले. मनीष मल्होत्रा यांची निर्मिती असलेले युनिफॉर्म्स परिधान करत ते अशाप्रकारे या गजबजलेल्या शहरातून फिरले. न्यूयॉर्क शहरात एयर इंडियाचा नवा अनुभव दाखल झाल्याची उत्सुकता त्यांनी मोठ्या धामधुमीने व्यक्त केली.

A group of people sitting on a ledge with their hands up

Description automatically generatedप्रसिद्ध ‘लंच अटॉप अ स्क्रायस्क्रॅपर’ फोटोची पुनर्निमिती

इतिहासातला एक खास क्षण नव्याने अनुभवत एयर इंडियाच्या कॅबिन क्रु सदस्यांनी सर्वात प्रभावी फोटोग्राफ्सपैकी एक समजल्या जाणाऱ्या ‘लंच अटॉप अ स्क्रायस्क्रॅपर’ या १९३२ मध्ये काढण्यात आलेल्या फोटोग्राफची पुनर्निमिती केली. या ३० रॉकफेलर प्लाझा बांधला जात असताना काही कामगार या उंच स्क्रायस्क्रॅपर बीमवर सहज बसून जेवत असताना हा फोटो घेण्यात आला होता. एयर इंडियाच्या क्रु ने साहस आणि नाविन्याचा कळस असलेल्या या फोटोतल्या भावना पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

A group of people standing on a bridge

Description automatically generated

गॅपस्टॉ ब्रिज, सेंट्रल पार्क

प्रसिद्ध सेंट्रल पार्कमधल्या निसर्गरम्य गॅपस्टॉ ब्रिजभोवती असलेली हिरवळ आणि एकंदर निसर्गसौंदर्याने कायमच वेगवेगळ्या पिढीतील दिग्दर्शकांना भुरळ घातली आहे. होम अलोन २ – लॉस्ट इन न्यूयॉर्कमध्ये इथेच केविन मॅककॅलिस्टरला पहिल्यांदा पिजन लेडी भेटली होती. त्याशिवाय द डेव्हिल वेयर्स प्राडा सिनेमातलं प्रसिद्ध ‘रनवे जंगल’ फोटो शूट इथेच झालं होतं.

A group of people sitting on steps

Description automatically generated

मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट (द मेट)

म्युझियमच्या प्रवेशद्वाराकडे नेणाऱ्या द मेटच्या भव्य पायऱ्या स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत आणि या ठिकाणी कित्येक सिनेमे व टीव्ही मालिकांचं शूटिंग झालं आहे. मेटच्या या पायऱ्या प्रसिद्ध मालिका गॉसिप गर्ल्सगमध्ये सदैव दिसायच्या. त्याचप्रमाणे थरारक दरोड्यावर आधारित सिनेमा ओशन ८, व्हेन हॅरी मेट सॅली सिनेमातही हॅरी आणि सॅली म्युझियम असताना ‘टु मच पेपर ऑन पाप्रीकाश’ हा प्रसिद्ध संवाद म्हणतात, त्या पिकन पाय सिक्वेन्समध्येही या पायऱ्या पाहायला मिळतात.

A group of people walking in front of a sign

Description automatically generated

टाइम्स स्क्वेयरवर

एयर इंडिया क्रु ने टाइम्स स्क्वेयरवर प्रखर निऑन लाइट्सच्या प्रकाशात फेरफटका मारला. हे प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटनस्थळ बऱ्याच बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांत पाहायला मिळतं. टॉम क्रुझचा व्हॅनिला स्काय असो, ज्यात तो टाइम्स स्क्वेयवर एकटाच धावताना दिसतो, किंवा फ्रेंड्स विथ बेनिफिट्समधला फ्लॅशमॉबचा सीन असो, नाहीतर बॉलिवूड सिनेमा कल हो ना हो मधला प्रीती झिंटाचा हॅपी डान्स असो, टाइम्स स्क्वेयर प्रत्यक्षात आणि पडद्यावर नेहमीच झळाळत असतो.

A group of people in a row

Description automatically generated

न्यूयॉर्क टॅक्सीज

प्रसिद्ध यलो कॅब्ज किंवा न्यूयॉर्कमधल्या टॅक्सीज कित्येक सिनेमांसाठी हक्काचा सेट ठरल्या आहेत. या टॅक्सी फक्त प्रवासाचं साधन राहिलेल्या नाहीत, तर शहरी गजबजाटाचं प्रतीक बनल्या आहेत आणि त्या कित्येकदा कथेत महत्त्वाच्या भूमिकाही निभावतात. एखादा झटपट कॅमिओ असो किंवा मध्यवर्ती घटक न्यूयॉर्कमधल्या टॅक्सीज सिनेमॅटिक आयकॉन आहेत.

A group of people standing on a staircase

Description automatically generated

द पियर, ताज हॉटेलमधली द रोटुंडा रूम

सेंट ऑफ अ वुमन सिनेमातला फ्रंक (अल पचिनो) आणि डॉना (गॅब्रिएल अन्वर) टँगो करतात तो प्रसिद्ध सीन द पियरमध्येच चित्रित करण्यात आला होता. त्या पॅशनेट नृत्यासाठी पियरची पार्श्वभूमी सिनेमातल्या या महत्त्वाच्या क्षणासाठी अविस्मरणीय ठरली. एयर इंडियाच्या क्रु नं मॅनहॅटनमध्ये असलेल्या द पियर हॉटेलमधल्या आकर्षक रोटुंडा रूममध्ये हजेरी लावत या प्रसिद्ध सिनेमाच्या आठवणी जागवल्या.

A person sitting on a bench looking at a bridge

Description automatically generated

सटन प्लेस पार्क (क्वीन्सबोरो ब्रिजखाली)

१९७९ वुडी अलन क्लासिक मॅनहॅटनमध्ये न्यूयॉर्क शहराचं सुरेख चित्रण पाहायला मिळतं आणि म्हणूनच हा सिनेमा कॅबिन क्रूच्या सदस्यांसाठी प्रेरणादायी होता. एयर इंडियाच्या क्रु ने नेमकं तेच ठिकाण शोधून काढत आयझॅक डेव्हिड (वुडी अलन) आणि मेरी विल्की (डिएन कीटन) क्वीन्सबोरो ब्रिजखाली बसून त्याचं कौतुक करतात, पहाटेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारतात त्या सीनच्या आठवणी जागवल्या. या सीनची इमेज या सिनेमाचं प्रसिद्ध पोस्टर ठरली.

संपादकांसाठी सूचना

· सर्व फोटो हाय रिझोल्यूशनमध्ये इथे डाउनलोड करता येतील: https://newsroom.airindia.com/in/en/media-resources/images/new-air-india-in-new-york

· एयर इंडियाचे A350 विमान प्रवाशांना नवीन कॅबिन इंटेरियर्स, पुरस्कार विजेती नवी इनफ्लाइट एंटरटेनेमेंट (आयएफई) यंत्रणा आणि मोफत ऑनबोर्ड वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी, दर्जेदार केटरिंग आणि नवीन सर्व्हिसवेयर पुरवणार आहे.

· या विमानामध्ये बिझनेस क्लास कॅबिन २८ खासगी स्वीटसह देण्यात आली असून त्यात 1-2-1 कॉन्फिगरेशन आहे. प्रत्येक स्वीटमध्ये पूर्णपणे फ्लॅट बेडचा समावेश आहे. त्याशिवाय थेट आयलमध्ये प्रवेश, स्लायडिंग प्रायव्हसी दरवाजे आणि वैयक्तिक वॉर्डरोबही मिळणार आहे.

· अमेरिका आणि भारतादरम्यान बिझनेस क्लासमध्ये खासगी स्वीट्स देणारी एयर इंडिया ही एकमेव नॉन- स्टॉप कॅरियर आहे.

· A350 कार्यरत झाल्याने एयर इंडियाचा प्रीमियम इकॉनॉमी अनुभव दिल्ली व न्यूयॉर्कदरम्यानच्या सर्व फ्लाइट्समध्ये मिळणार असून सोबत २४ अतिरिक्त लेगरूम सीट्स, 2-4-2 कॉन्फिगरेशनच्या खास अपस्केल कॅबिनमध्ये दिले जाणार आहे.

· एयर इंडिया A350 च्या प्रवाशांना ऑनबोर्ड वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून सध्या ही सेवा प्रवाशांना मोफत दिली जाणार आहे.

· एयर इंडियाच्या A350 फ्लाइट्समधील नवीन आयएफई काँटेंटच्या पूर्ण श्रेणीमध्ये ३००० तासांचे मनोरंजन वेगवेगळे फॉरमॅट्स आणि प्रकारांतले आहे. त्यात १४०० तासांचे सिनेमे, ८५० तासांचा टीव्ही आणि १००० तासांच्या ऑडिओचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments