Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedबदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंग कडे लक्ष देण्याची गरज...

बदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंग कडे लक्ष देण्याची गरज -पणन मंत्री ना. जयकुमार रावल पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

पुणे, दि. 9 : तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रिडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती आणि मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे अशी भूमिका मांडली. त्याला जवळपास 71 देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून साजरे करण्यात आले. तृणधान्याचा वापर हा एक वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असेही ना.रावल म्हणाले. तृणधान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी विविध माध्यमातून प्रचार, प्रसिध्दी करावी. तृणधान्य महोत्सव राज्यातील इतर जिल्ह्यातही घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पणन मंडळ हे उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा पूल म्हणून काम करेल असे सांगून आपल्या शेतकऱ्यांचा माल जगाच्या बाजारपेठेत पोहोचेल असा संकल्प सर्वांनी करुया असे ते म्हणाले.

हा तृणधान्य महोत्सव 12 जानेवारी पर्यंत सुरु असून महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकात दिली.

सुरुवातीस पणनमंत्री श्री. रावल यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मिलेट जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस श्री. रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

00000

वृत्त क्र. 21

पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी संचानालयाने ताकदीने काम करावे

-पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे येथील पणन संचालनालयाला भेट देऊन ना. रावल यांनी घेतला आढावा

पुणे, दि. 9 : शेतकरी, आडते, व्यापारी तसेच हमाल शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतील महत्वाचे घटक आहेत. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळावी हे पणन कायद्याचे वैशिष्टय आहे. शेतकऱ्यांचे काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी व पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पणन संचनालयाने ताकदीने काम करावे तसेच जागतिक बदलांचा वेध घेऊन,शेतकरी हितासाठी संचालयानाच्या कामात तातडीने सकारात्मक बदल घडवावेत. असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

आज मध्यवर्ती इमारत पुणे येथील पणन संचालनालयाला पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पणन संचालक विकास रसाळ, पणन सहसंचालक आर.एस.दराडे, श्रीमती स्नेहा जोशी, पणन उपसंचाक मोहन निंबाळकर, रविंद्र गोसावी यावेळी उपस्थित होते.

सहकारी ग्राहक संस्थाचे प्रश्न आणि मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर संमेलन आयोजित करण्यात यावे, सर्वसोयींनीयुक्त मार्केट कमिटीची स्थापना, खाजगी बाजार समित्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करावा असे सांगून मंत्री श्री.रावल यांनी विमान, रस्ते आणि समुद्रमार्गे जोडण्यात येणारे जागतीक दर्जाचे महामुंबई टर्मिनल मार्केट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पणन संचालनालयाच्या कामाकाजाचा आढावा मंत्री ना.रावल यांनी यावेळी घेतला. पणन संचालक विकास रसाळ यांनी पणन विभागाच्या नियोजित कार्याची माहिती दिली. बैठकीला पणन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments