१६ जानेवारी २०२५ : पिंपरी, पुणे – डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे तसेच महाराष्ट्र पोलिस विभागाने यशस्वीपणे ग्रीन कॉरिडोरचे उत्तम नियोजन करीत अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णाला मिळाले जीवदान. अवयवदानाच्या धाडसी निर्णयामुळे व डॉक्टर्स आणि वाहतूक पोलिसांच्या वेगवान कृतीमुळे दात्याचे फुप्फुस जेजे हॉस्पिटल, मुंबई येथून ते डीपीयु सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे येथील रुग्णालयात पोहोचवले. सुरक्षित वाहतुकीच्या नियोजनासह योग्य वेळेत अवयव पोहोचविण्याबरोबर एका रुग्णाला नव जीवन देण्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे.
एका अपघातादरम्यान मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले. ३६ वर्षीय ट्रक चालक होते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना अवयव दानाबाबत समुपदेशन करण्यात आले. आपल्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून या कुटुंबाने अवयव दानाचा धाडसी निर्णय घेतला. अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती ZTCC प्रतीक्षा यादी नुसार त्यांचे फुफ्फुस पिंपरी तील डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार जीवन रक्षक असणाऱ्या या फुफ्फुसाचा प्रवास सुरू झाला.
मुंबई आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वेगवान आणि कार्यक्षम सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर द्वारे 150 किमीचा टप्पा केवळ दोन तासांच्या आत हा प्रवास पूर्ण झाला. हे अवयव सुरक्षित पिंपरी दाखल झाले.
पोलीस अधिकारी, कर्मचारी व डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. राहुल केंद्रे आणि डॉ. समीर चौहान यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथके आणि ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सुरक्षित व सुनिश्चित वेळेत प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि या रुग्णाला पुन्हा नवीन जन्म मिळाला.
डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामागे आमची अनुभवी डॉक्टरांची टीम व त्याला पाठबळ देणारी प्रशासकीय यंत्रणा यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी मी मनापासून अभिनंदन करतो. डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात, आम्ही आमच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्कृष्टतेप्रती अतूट वचनबद्धतेमुळे अधिक उंची गाठण्याचा आणि अधिक जीवनरक्षक शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतो.”
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे यांनी आपले विचार मांडले “अवयवदाना विषयी जागरूकता वाढविण्यासाठी मी नेहमीच आग्रही असते. अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या त्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आमच्या डॉक्टर टीमने त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि जीव वाचवण्याच्या अतूट वचनबद्धतेद्वारे रुग्णहिताला प्राधान्यक्रम दिला आहे. याचा मला अभिमान वाटतो.
डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांनी टिप्पणी केली की, “जेव्हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एका ताकतीन लढा देते . तेव्हा समाजापुढे एक असा आदर्श निर्माण होतो. याचे हे एक उदाहरण आहे. दात्याच्या कुटुंबांचा अवयवादानाचा धाडसी निर्णय, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस विभागापर्यंत आणि इतर अगणित लोकांपर्यंत एका रुग्णाच्या नवजीवनासाठी प्रत्येकाने दिलेल्या योगदान बद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे मी सर्वांचे मनापासून आभारी आहे.”
डॉ. संदीप अट्टावार, संचालक – हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे म्हणाले, “आम्ही भारतात यशस्वी हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये आघाडीवर आहोत. आम्ही आमच्या रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानासह आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहोत. हे प्रत्यारोपण शक्य करणाऱ्या उदात्त आणि निःस्वार्थ कृतीबद्दल आम्ही अवयवदात्यांच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानू इच्छितो. इतरांना नवजीवन देण्याचा दातृत्व भाव अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.


