Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार, स्वयंरोजगार मेळावा आणि उपकरणांचे मोफत वाटप

दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार, स्वयंरोजगार मेळावा आणि उपकरणांचे मोफत वाटप

पुणे, १६ जानेवारी २०२५ : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ह्युमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू 2024-25 च्या वतीने रविवार,19 जानेवारी 2025 रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे सकाळी 8.30 ते दुपारी 4.00 या वेळेत ‘दिव्यांग रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला असून भाग्यश्री सखी फाऊंडेशन या उपक्रमात सह-भागीदार आहे. ही माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर शीतल शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ह्युमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू २०२५ चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. दिलीप देशपांडे, भाग्यश्री बोरकर आणि इतर मान्यवरांनी दिली.

या मेळाव्यात उत्पादन, कंपनी प्रशासन,पॅकेजिंग, हाऊस कीपिंग आणि इतर विभागातील रोजगारासाठी सुमारे ७०० दिव्यांग व्यक्ती आणि सुमारे २५ कंपन्या सहभागी होतील.

याशिवाय स्पार्कमिंडा फाऊंडेशन तर्फे क्रचेस,वॉकर,आधारकाठी आणि कृत्रिम अवयव यांसारखी उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत.

या मेळाव्यात मोफत उपकरणांची गरज असलेल्या दिव्यांग व्यक्तींची नोंदणी केली जाईल आणि नंतर त्यांना योग्य वेळी उपकरणांचे वाटप करण्यात येईल.

या दिव्यांग मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कमाईचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावे आणि दैनंदिन जीवन सुलभ व्हावे हा प्रयत्न आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- भाग्यश्री बोरकर : ९७६२३४५२२१

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments