ताम्हणवाडी, दौंड येथील बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये २००० झाडांची लागवड
– फ्लीटगार्डचे कर्मचारी, ‘बिंग व्हॉलंटियर फाउंडेशन’ चे सदस्य, वनविभागाचे अधिकारी, आणि स्थानिक नागरिकांचा उत्साही सहभाग
पुणे, १५ जानेवारी २०२५ : पुण्यातील विविध ऑन-आणि ऑफ-हायवे उपकरणांसाठी फिल्टरेशन उत्पादने व उपायांची निर्माती कंपनी फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने वनविभाग आणि ‘बिंग व्हॉलंटियर फाउंडेशन’ यांच्यासोबत एक मोठ्या वृक्षारोपण मोहिमेसाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
या मोहिमेअंतर्गत १५ जानेवारी २०२५ रोजी, ताम्हणवाडी, दौंड पुणे येथील बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये २००० झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात ४२ पेक्षा जास्त फ्लीटगार्डचे कर्मचारी, ‘बिंग व्हॉलंटियर फाउंडेशन’ चे काही सदस्य, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक समुदायातील अनेक नागरिक देखील सहभागी झाले.
‘बिंग व्हॉलंटियर फाउंडेशन’ आणि ग्रामपंचायतीसह पुढील तीन वर्षे या बायोडायव्हर्सिटी पार्कच्या देखरेखीमध्ये फ्लीटगार्ड योगदान देणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. वनजमिनीवर तयार करण्यात येणाऱ्या या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये सुरुवातीला झाडांच्या लागवडीसाठी माती तयार केली गेली आणि तयार झालेल्या जमिनीवर नुकतेच हे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील जैवविविधतेला चालना मिळणार आहे. त्याशिवाय इथल्या प्रादेशिक वनस्पती आणि पक्ष्यांना एक नैसर्गिक अधिवास मिळेल ज्याचा लाभ इथल्या स्थानिक समुदायाला देखील होईल.
फ्लीटगार्ड फिल्टर्स चे व्यवस्थापकीय संचालक श्री. निरंजन किर्लोस्कर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “हवामान बदलाच्या वाढत्या चिंता लक्षात घेऊन त्याचे दुष्परिणाम कमी करण्याससाठी काही सकारात्मक योगदान देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.”


