Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक लाँच

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक लाँच

गुरूग्राम, १७ जानेवारी २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये रुपये 17 99 000 इतक्या प्रारंभीच्या किमतीवर बहुप्रतीक्षित ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकचे अनावरण केले. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये तिचे बोल्ड डिझाइन, अद्ययावत तंत्रज्ञान, अद्वितीय परफॉर्मन्स आणि संपूर्ण सुरक्षेसह इलेक्ट्रिक एसयूव्ही क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवला आहे. निर्विवाद. अद्वितीय आणि आता इलेक्ट्रिक क्रेटा भारतीय ग्राहकांना तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत उत्पादने देण्याच्या एचएमआयएलच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या अनावरणाच्या निमित्ताने बोलताना एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अन्सू किम म्हणाले की, “क्रेटा इलेक्ट्रिकने एचएमआयएलच्या विद्युतीकरणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा क्षण दिला असून सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाप्रति आमची ही वचनबद्धता आहे. ही आमची पहिली भारतातच बनवलेली ईव्ही एसयूव्ही आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीतील जागतिक ज्ञानाचे एक दशक पूर्ण केलेल्या ह्युंदाई मोटर कंपनीने स्वतःला ईव्ही नावीन्यपूर्णतेतील आघाडीची कंपनी म्हणून प्रस्थापित केले आहे. हीच नावीन्यपूर्णता आणि ज्ञान यांचा वापर भारतात आणला जात असून देशाच्या ईव्ही लँडस्केपमध्ये प्रवेश करत आहोत. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ही मानवतेसाठी प्रगती या तत्त्वाचा भाग असून अद्ययावत मोबिलिटी सोल्यूशन्सचे केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्याच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक भारतीय ईव्ही उद्योगात नवनवीन मानके स्थापित करेल तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, अशी आम्हाला खात्री वाटते.”

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिफाइड बाह्यरचना: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या बाह्यरचनेत बोल्ड आणि फ्युचरिस्टिक डिझाइन आहे. त्यामुळे रस्त्यावर ही गाडी आधुनिक असल्याचे दिसून येते. ह्युंदाईच्या जागतिक पिक्सेल डिझाइन लँग्वेज फॉर ईव्हीने प्रेरित असलेल्या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये खालील वैशिष्‍ट्ये आहेत:

· इलेक्ट्रिफाइड अपील – ह्युंदाईच्या जागतिक ईव्ही सिग्नेचर पिक्सेल डिझाइन डीएनए पुढे नेणारी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ही गाडी पिक्सेलाइट ग्राफिक फ्रंट ग्रिलसोबत येते. त्यासोबत एक इंटिग्रेटेड चार्जिंग पोर्ट व पिक्सलेटेड ग्राफिक लोअर बंपरही आहे. गाडीचा पुढील भाग पिक्सेलेटेड ग्राफिक रेअर बंपर, एलईडी टेल लॅम्प्स आणि पिक्सलेटेड एलईडी रिव्हर्स लॅम्प्स अशा भविष्याधारित डिझाइन्सनी युक्त आहे.

· अॅक्टिव्ह एअर फ्लॅप्स (एएएफ)- ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये अॅक्टिव्ह एअर फ्लॅप्स (एएएफ) आहेत. त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यात मदत होते. वाहनांचे भाग थंड करून एअरोडायनॅमिक्स वाढवण्यातही हे उपयुक्त ठरते.

· एअरोडायनॅमिक डिझाइन – एका चांगल्या ड्राइव्हसाठी एअरोडायनॅमिक्स सुधारण्याच्या दृष्टीने ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये आर१७ (डी = ४३६.६ मिमी) एअरो अलॉय व्हील्स लो रोलिंग रेसिस्टंस (एआरआर) टायर्ससह आणि एक स्पोर्टी रेअरस्पॉयलर आहे.

· डायनॅमिक साइड प्रोफाइल – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या साइड प्रोफाइलमध्ये एक डायनॅमिक आणि बोल्ड डिझाइन तसेच सरळ रूफलाईन आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य वाढते.

· भविष्याधारित मागील डिझाइन – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकची मागील बाजू नावीन्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइनने बनलेली आहे आणि तिचे पिक्सलेटेड डिझाइन पॅटर्न्स यातून स्पष्ट दिसतात. एलईडी टेल लॅम्प्स तसेच पिक्सलेटेड डिझाइन रिव्हर्स लॅम्प्ससोबत एक फ्युचरिस्टिक अपील देतात आणि गाडीची मागची बाजू अत्यंत उठून दिसते.

वैविध्‍यपूर्ण इंटीरिअर: प्रीमियम आरामदायीपणामध्‍ये स्‍मार्ट तंत्रज्ञानाची भर करण्‍यात आली आहे. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर आधुनिक जीवनशैलीसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या वैविध्‍यपूर्ण केबिनचा अनुभव मिळतो.

ड्युअल-टोन इंटीरिअर्स- ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ड्युअल-टोन ग्रॅनाईट ग्रेसह डार्क नेव्‍ही कलर थीममध्‍ये येते. फ्लोटिंग कन्‍सोलवरील अॅम्बियण्‍ट लायटिंगच्‍या सभोवताली असलेले आकर्षक ओशियन ब्‍ल्‍यू रंग केबिनमध्‍ये अत्‍याधुनिक बाबींचा अनुभव देते, जे वेईकलच्‍या आकर्षक एक्‍स्‍टीअरला साजेसे आहे.
फ्लोटिंग कन्‍सोल – ग्राहकांना केबिनमध्‍ये एैसपैस जागेचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये फ्लोटिंग कन्‍सोल आहे, जे स्‍मार्ट ओपन स्‍टोरेज स्‍पेस देते आणि ड्रायव्‍हरचा अनुभव व युटिलिटीमध्‍ये वाढ करते.
पर्यावरणपूरक सीट्स- ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्‍या सीट्स शाश्‍वत मटेरिअल्‍सपासून बनवण्‍यात आल्‍या आहेत, जेथे आर्टिफिशियल लेदर सीट अपहोल्‍स्‍टरीसाठी फॅब्रिक व कॉर्न अर्काकरिता पुनर्चक्रण केलेल्‍या प्‍लॅस्टिक बॉटल्‍सचा वापर करण्‍यात आला आहे. यामधून एचएमआयएलची शाश्‍वततेप्रती कटिबद्धता दिसून येते. या सीट्सच्‍या अपहोल्‍स्‍टरीवर अद्वितीय ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक डिटेलिंग देखील आहे.
ड्युअल कर्व्हिलिनियर स्क्रिन्‍स – भावी कॉकपीट देण्‍यासाठी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये २६.०३ सेमी (१०.२५ इंच) ड्युअल कर्व्हिलिनियर स्क्रिनसह एचडी इन्‍फोटेन्‍मेंट आणि डिजिटल क्‍लस्‍टर आहे, ज्‍यामुळे ड्रायव्हिंग करताना सर्व महत्त्वपूर्ण ईव्‍ही संबंधित माहिती उपलब्‍ध होते.
ईव्‍ही युनिक स्‍टीअरिंग व्‍हील – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक अद्वितीय, आधुनिक थ्री-स्‍पोक स्‍टीअरिंग व्‍हीलसह येते, ज्‍यामध्‍ये मोर्स कोड डिटेलिंग आहे.
टच टाइप क्‍लायमेट कंट्रोल पॅनेल – परिपूर्ण टच-टाइप ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ड्रायव्‍हर व सह-प्रवाशांना स्‍वत:हून तापमान सेट करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे प्रवाशांना उच्‍च दर्जाचा अनुभव मिळतो. ‘ड्रायव्‍हर-ओन्‍ली’ मोड पॅसेंजर व्‍हेंट्स बंद करून ऊर्जा वापर सानुकूल करते आणि रेंज वाढवते.
एैसपैस जागा आणि आरामदायीपणा: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकने इव्‍ही एसयूव्‍ही बाजारपेठेत आरामदायीपणा, स्‍टाइल आणि कार्यक्षमतेसाठी स्‍तर उंचावला आहे. आधुनिक, तंत्रज्ञान-प्रेमी ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक एैसपैस जागा, शाश्‍वत मटेरिअल्‍स आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानावर भर देत स्‍पेस आणि आरामदायीपणाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्‍या इंटीरिअरमधील प्रत्‍येक भाग ग्राहकांना आरामदायीपणा व अत्‍याधुनिकता देण्‍यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आला आहे.

विस्‍तारित स्‍पेससाठी लांब व्‍हीलबेस – २६१० मिमी लांब व्‍हीलबेससह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक अधिक इंटीरिअर स्‍पेस देते, ज्‍यामुळे सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. यामध्‍ये सर्व प्रवाशांसाठी एैसपैस लेगरूम, नी रूम, हेडरूम आणि शोल्‍डर रूम आहे.
सुलभ इन्‍ग्रेस व इग्रेस – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्‍या सरळ रूफलाइनमध्‍ये सुलभ इन्‍ग्रेस व इग्रेस आहे, ज्‍यामधून प्रवाशांना त्रासमुक्‍त अॅक्‍सेसची खात्री मिळते.
८-वे पॉवर्ड फ्रण्‍ट सीट्स – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये पुढील आसनांवरील प्रवाशांसाठी (ड्रायव्‍हर व सह-प्रवासी) ८-वे पॉवर्ड सीट्स आहेत, ज्‍या आरामदायीपणा सीटिंगची खात्री देण्‍यासोबत लांबच्‍या प्रवासादरम्‍यान सोयीसुविधामध्‍ये वाढ करतात.
ड्रायव्‍हर मेमरी सीट – वेलकम रिट्रॅक्‍ट फंक्‍शन असलेल्‍या ड्रायव्‍हर-साइड मेमरी सीटसह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक परिपूर्ण ड्रायव्हिंग पोझिशन देते. यामुळे तुमच्‍या पसंतीनुसार सीट पोझीशन करण्‍यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि कधीही तुमच्‍या इच्‍छेप्रमाणे पूर्ववत पोझीशनवर येते, ज्‍यासाठी फक्‍त बटन प्रेस करावे लागते.
पॉवर्ड पॅसेंजर सीट वॉक-इन डिवाईस – ड्रायव्‍हर-केंद्रित अनुभवासाठी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये पॉवर्ड पॅसेंजर सीट वॉक-इन डिवाईस आहे, जे मागील आसनावरील प्रवाशांना फ्रण्‍ट पॅसेंजर सीट इलेक्ट्रिकली पुढील दिशने समायोजित करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे अधिक लेगरूम मिळते.
वॉईस-एनेबल स्‍मार्ट पॅनोरॅमिक सनरूफ – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये वॉईस-एनेबल स्‍मार्ट पॅनोरॅमिक सनरूफ आहे, जे एका कमांडसह सहजपणे खुले व बंद करता येते. हे सनरूफ प्रत्‍येक राइडमध्‍ये आरामदायीपणा व सोयीसुविधेची भर करते, ज्‍यामुळे प्रवाशांना प्रवास करताना बाहेरील नयनरम्‍य दृश्‍यांचा आनंद घेता येतो.
नाविन्‍यपूर्ण स्‍पेस सोल्‍यूशन्‍स – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये सर्व प्रवाशांच्‍या स्‍पेस गरजांची पूर्तता करण्‍यासाठी २२-लीटर फ्रंक स्‍पेससह ४३३-लीटर बूट स्‍पेस आहे.
अग्रणी तंत्रज्ञान: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक प्रत्‍येक प्रवासाला तंत्रज्ञानाचे पाठबळ असण्‍याची खात्री देते. अस्‍सल तंत्रज्ञान-केंद्रित ड्रायव्हिंग अनुभव देण्‍यासाठी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये पुढील वैशिष्‍ट्ये आहेत:

इन-कार पेमेंट- ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये इन-कार पेमेंट वैशिष्‍ट्य आहे, जे १,१५० हून अधिक चार्जिंग पॉइण्‍ट्सवर कारच्‍या इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमवरून ईव्‍ही चार्जिंगसाठी पेमेंट करण्‍याची सुविधा देत ग्राहकांच्‍या सोयीसुविधेमध्‍ये वाढ करते. ग्राहक मायह्युंदाई मोबाइल अॅपचा वापर करत संपूर्ण भारतात १०,००० हून अधिक चार्जिंग पॉइण्‍ट्स शोधू शकतात.
डिजिटल की – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये डिजिटल की आहे, जी वापरकर्त्‍यांना स्‍मार्टफोन किंवा स्‍मार्टवॉच वापर करत वेईकल लॉक, अनलॉक व स्‍टार्ट करण्‍याची सुविधा देते.
एडीएएस लिंक्‍ड रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्‍टम – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये एडीएएस-लिंक्‍ड रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्‍टम आहे, जी पुढे असलेल्‍या वेईकलपासूनचे अंतर आपोआपपणे ओळखते आणि त्‍यानुसार रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग लेव्‍हल समायोजित करते.
शिफ्ट-बाय-वायर (एसबीडब्‍ल्‍यू) – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये कॉलम-टाइप उिझाइन शिफ्ट-बाय-वायर सिस्‍टम आहे, जी सर्वोत्तम नियंत्रणासह अधिक सोयीसुविधा आणि भावी ड्रायव्हिंग अनुभव देते.
सिंगल पेडल ड्राइव्‍ह (आय-पेडल) – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये आय-पेडल तंत्रज्ञान आहे, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर अॅक्‍सेलरेटर पेडलचा वापर करत कारची गती वाढवू शकतो, कमी करू शकतो किंवा कार पूर्णपणे थांबवू शकतो. अॅक्‍सेलेरेटरवरील पाय काढल्‍यास कार पूर्णपणे थांबेल.
वेईकल-टू-लोड (व्‍ही२एल) – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वेईकल-टू-लोड तंत्रज्ञान आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना कॅम्पिंग करताना किंवा इमर्जन्‍सीदरम्‍यान पॉवर उपलब्‍ध होऊ शकते. हे तंत्रज्ञान वेईकलच्‍या आतमध्‍ये व बाहेर गॅझेट्स व अप्‍लायन्‍सेसना चार्जिंग करते, ज्‍यामुळे प्रवासींचे डिवाईसेस कार्यरत राहतील.
इन-कार अनुभव – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आपल्‍या प्रगत एंटरटेमेन्‍ट सिस्‍टमसह कारमधील अनुभव अधिक उत्‍साहित करते. या कारमध्‍ये सर्वोत्तम व उच्‍च दर्जाच्‍या ऑडिओसाठी बोस प्रीमियम साऊंड ८-स्‍पीकर सिस्‍टम आहे. या सिस्‍टमला पूरक जिओसावनच्‍या माध्‍यमातून इन-कार म्‍युझिक स्ट्रिमिंग आहे.
अॅडवान्‍स्‍ड क्‍लायमेट कंट्रोल – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये टच-टाइप ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी) सह ड्रायव्‍हर-ओन्‍ली मोड आणि हवेशीर फ्रण्‍ट सीट्स आहेत, जे अधिक आरामदायीपणा देतात. वेईकलमध्‍ये कूल्‍ड ग्‍लोव्‍ह बॉक्‍स आणि फ्रण्‍ट आर्मरेस्‍टसह कूल्‍ड स्‍टोरेज देखील आहे.
इंटेलिजण्‍ट वॉईस कमांड्स – २६८ एम्‍बेडेड वॉईस-एनेबल कमांड्स आणि १३२ हिंदी वॉईस कमांड्ससह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक तुमच्‍या आवाजाच्‍या माध्‍यमातून विविध पैलूंवर प्रभावी नियंत्रण ठेवते. तसेच वेईकल सुरक्षित आणि अधिक उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देखील देते.
ह्युंदाई ब्‍लूलिंक कनेक्‍टीव्‍हीटी – अधिक सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी ७० हून अधिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये असलेले ह्युंदाई ब्‍लूलिंक प्रवाशांना प्रवासादरम्‍यान कनेक्‍टेड ठेवते.
इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्‍स: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये ह्युंदाईच्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाची शक्‍ती आहे, जे ड्रायव्हिंग करताना इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्‍स देते.

रोमांचक अॅक्‍सेलरेशन – फक्‍त ७.९ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करणारी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक प्रवाशांसाठी प्रत्‍येक प्रवासाला रोमांचक अनुभव बनवते.
उच्‍च ऊर्जा घनता – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पॅक्‍ससह उपलब्‍ध आहे:
५१.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक (लॉंग रेंज), जे सिंगल चार्जमध्‍ये ४७३ किमीची रेंज देते.
४२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक, जे सिंगल चार्जमध्‍ये ३९० किमीची रेंज देते.
शक्तिशाली कार्यक्षमता – ५१.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक (लॉंग रेंज) १२६ केडब्‍ल्‍यू (१७१ पीएस) शक्‍ती निर्माण करते, तर ४२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक ९९ केडब्‍ल्‍यू (१३५ पीएस) शक्‍ती निर्माण करते. ही स्थिरता ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग गरजांशी अनुकूल पर्याय निवडण्‍याची सुविधा देते, ज्‍यामधून शक्तिशाली व कार्यक्षम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
बॅटरी हीटर – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये बॅटरी हीटर आहे, जे थंड वातावरणामध्‍ये अधिकतम चार्जिंग कार्यक्षमता व रेंजची खात्री देते.
११ केडब्‍ल्‍यू फास्‍ट स्‍मार्ट कनेक्‍टेड वॉल बॉक्‍स चार्जर – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ११ केडब्‍ल्‍यू स्‍मार्ट कनेक्‍टेड वॉलबॉक्‍स चार्जरचा (एसी होम चार्जिंग) वापर करत फक्‍त ४ तासांमध्‍ये १० टक्‍के ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होऊ शकते. चार्जर स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटीसह येतो आणि वापरकर्ते मायह्युंदाई अॅपच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष चार्जर ऑपरेट करू शकतात.
डीसी चार्जरचा वापर करत फास्‍ट चार्जिंग – फास्‍ट डीसी चार्जरसह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक फक्‍त ५८ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
१०० केडब्‍ल्‍यू: ३९ मिनिटे
५० केडब्‍ल्यू: ५८ मिनिटे
सर्वांगीण सुरक्षितता: ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक प्रवाशांना सर्वांगीण सुरक्षितता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जेथे प्रगत वैशिष्‍ट्यांची श्रेणी परिपूर्ण मन:शांती देते.

शक्तिशाती बॉडी रचना – जवळपास ७५ टक्‍के अॅडवान्‍स्‍ड हाय स्‍ट्रेन्‍थ स्‍टील (एएचएसएस) व हाय स्‍ट्रेन्‍थ स्‍टील (एचएसएस) सह, तसेच हॉट स्‍टॅम्पिंगचा व्‍यापक वापर करत डिझाइन करण्‍यात आलेली ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक प्रवाशांना प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान सुरक्षिततेची खात्री देते.
ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स लेव्‍हल २ एडीएएस – ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स लेव्‍हल २ एडीएएस आहे, जे १९ तंत्रज्ञान-सक्षम सुरक्षितता वैशिष्‍ट्ये देते. यामध्‍ये लेन कीपिंग असिस्‍ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट कोलिजन वॉर्निंग आणि स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी सर्वसमावेशक सुरक्षितता देतात.
सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ७५ हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह प्रमाणित म्‍हणून ५२ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांचा समावेश करण्‍यात आला आहे – सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ७५ हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि ५२ प्रमाणित वैशिष्‍ट्यांसह ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक सर्व प्रवाशांना अधिक सुरक्षिततेची खात्री देते.
सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून सुरक्षितता वैशिष्‍ट्ये:
सहा एअरबॅग्‍ज
ऑल-व्‍हील डिस्‍क ब्रेक्‍स
इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्‍स (ईपीबी) सह ऑटो होल्‍ड
हिल-स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल (एचएसी) आणि हिल डिसेंट कंट्रोल (एचडीसी)
इलेक्ट्रिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) सह वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट (व्‍हीएसएम)
चाइल्‍ड सीट अँकर (ISOFIX)
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (टीपीएमएस)
· तसेच, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्‍ये सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर (एसव्‍हीएम), ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर (बीव्‍हीएम), रेन सेन्सिंग वायपर्स आणि फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर्स (एफपीएएस) आहेत.

· आयपी६७ रेटेड बॅटरी – वेईकलची बॅटरी आयपी६७ प्रमाणित आहे, ज्‍यामुळे बॅटरीचे धूळ व पाण्‍यापासून संरक्षण होते आणि सर्व प्रदेश व वातावरणामध्‍ये मन:शांती मिळते. बॅटरीची १६-फिट ड्रॉप टेस्‍ट करण्‍यात आली आहे, ज्‍यामधून ग्राहक सुरक्षिततेची खात्री मिळते. वेईकलची वॉटर सोक टेस्‍ट देखील करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे १२० सेकंदांसाठी ४२० मिमी पाण्‍यामधून ड्रायव्हिंग करता येते.

रंग:

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ८ मोनोटोन (३ मॅटे पर्यायांसह) आणि २ ड्युअल टोन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामधून स्‍टायलिश पर्यायांची श्रेणी मिळते.

मोनोटोन – मेटालिक

मोनोटोन – मॅट

ड्युअल टोन

ओशियन ब्‍ल्‍यू

ओशियन ब्‍ल्‍यू मॅट

ओशियन ब्‍ल्‍यूसह ब्‍लॅक रूफ

अॅटलास व्‍हाइट

टायटन ग्रे मॅट

अॅटलास व्‍हाइटसह अॅबिस ब्‍लॅक रूफ

फायरी रेड

रॉबस्‍ट एमराल्‍ड मॅट

स्‍टारी नाइट

अॅबिस ब्‍लॅक

परिपूर्ण मन:शांती:

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक प्रभावी वॉरंटी पॅकेजसह येते, ज्‍यामधून ग्राहकांना परिपूर्ण मन:शांती मिळते. यामध्‍ये ३-वर्ष वेईकल वॉरंटी (अमर्यादित किलोमीटर), ८-वर्ष/१.६ लाख किमी बॅटरी वॉरंटीचा समावेश आहे, ज्‍यामधून बॅटरीच्‍या दीर्घकालीन टिकाऊपणाची खात्री मिळते, जे ईव्‍ही मालकांसाठी प्रमुख घटक आहे. वेईकल मालकांना ३ वर्षांच्‍या कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइटड असिस्‍टण्‍स (आरएसए)चा देखील फायदा मिळेल.

मूल्‍यामध्‍ये अधिक भर करण्‍यासाठी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक जवळपास ५ वर्षांच्‍या ह्युंदाईच्‍या शील्‍ड ऑफ ट्रस्‍ट पॅकेजेससह (रनिंग रिपेअर व मेन्‍टेनन्‍स पॅकेज) येते. वेईकल ७ वर्षांच्‍या विस्‍तारित वॉरंटीसह देखील येते.

टेक्निकल वैशिष्‍ट्ये

उत्‍पादन

४२ केडब्‍ल्‍यूएच

५१.४ केडब्‍ल्‍यूएच (लाँग रेंज)

आकारमान

एकूण लांबी (मिमी)

४३४०

एकूण रूंदी (मिमी)

१७९०

एकूण उंची (मिमी)

१६५५

व्‍हीलबेस (मिमी)

२६१०

इलेक्ट्रिक पॉवर

अधिकतम पॉवर (केडब्‍ल्‍यू (पीएस))

९९ (१३५)

१२६ (१७१)

हाय व्‍होल्‍टेज बॅटरी

क्षमता (केडब्‍ल्‍यूएच)

४२

५१.४

ड्रायव्हिंग रेंज

३९०

४७३

चार्जिंग

११ केडब्‍ल्‍यू फास्‍ट एसी चार्जरमधून अंदाजित एसी फास्‍ट चार्जिंग (एसओसी १० टक्‍के ते १०० टक्‍के)

४ तास

४ तास ५० मिनिटे

५० केडब्‍ल्‍यू डीसी फास्‍ट चार्जरमधून अंदाजित डीसी फास्‍ट चार्जिंग (एसओसी १० टक्‍के ते ८० टक्‍के)

· १०० केडब्‍ल्‍यू: ३९ मिनिटे

· ५० केडब्‍ल्‍यू: ५८ मिनिटे

व्‍हील आणि XHMIGCC01

प्रकार आणि व्‍हील

२१५/६० आर१७ (व्‍यास = ४३६.६ मिमी) ऐरो अलॉई व्‍हील

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक किमती (रूपयांमध्‍ये, एक्‍स-शोरूम)

व्‍हेरिएण्‍ट्स

एक्झिक्‍युटिव्‍ह

स्‍मार्ट

स्‍मार्ट (ओ)*

प्रीमियम*

एक्‍सलन्‍स एलआर*

४२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक

17 99 000

18 99 900

19 49 900

19 99 900

५१.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक

21 49 900

23 49 900

*११ केडब्‍ल्‍यू स्‍मार्ट कनेक्‍टेड वॉल-बॉक्‍स चार्जर (इन्‍स्‍टॉलेशनसह) पर्यायी 73 000 रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

भारतातील ईव्‍ही इकोसिस्‍टमवर लक्ष केंद्रित

ह्युंदाईची जागतिक थीम ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी संलग्‍न राहत एचएमआयएल भारतात प्रबळ ईव्‍ही इकोसिस्‍टम विकसित करण्‍यासाठी कटिबद्ध आहे, ज्‍याकरिता नाविन्‍यपूर्ण बॅटरी तंत्रज्ञान, बॅटरी स्‍थानिकीकरण, व्‍यापक चार्जिंग पायाभूत सुविधा आणि भावी ईव्‍हींची श्रेणी यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीचा पुढील ७ वर्षांमध्‍ये देशभरात जवळपास ६०० सार्वजनिक ईव्‍ही फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स उभारण्‍याचा देखील मनसुबा आहे, ज्‍यामधून शाश्‍वत गतीशीलतेला चालना देण्‍याप्रती आणि भारताच्‍या शुद्ध ऊर्जेच्‍या दिशेने परिवर्तनाला पाठिंबा देण्‍याप्रती एचएमआयएलची कटिबद्धता दिसून येते.

एचएमआयएल ग्राहकांकरिता ईव्‍ही अलवंबन अधिक सोईस्‍कर करण्‍यासाठी भारतभरात चार्जिंग स्‍टेशन्‍सचे नेटवर्क वाढवत आहे. कंपनी ईव्‍ही मालकांना चार्जिंग पायाभूत सुविधा सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि यासाठी मायह्युंदाई अॅपच्‍या माध्‍यमातून संपूर्ण भारतात १०,००० चार्जिंग पॉइण्‍ट्स उपलब्‍ध करून देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments