Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedशारदा इरेक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित पुणे जिल्हा आंतर कचेरी टेबल टेनिस...

शारदा इरेक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित पुणे जिल्हा आंतर कचेरी टेबल टेनिस स्पर्धा

सांघिक विभागात एम्फसिस संघाला विजेतेपद;
ओंकार जोग यांना दुहेरी मुकुट;
महिलांमध्ये उज्ज्वला गायकवाड यांना अजिंक्यपद
पुणे दिनांक २० जानेवारी –
शारदा इरेक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने पुरस्कृत केलेल्या आणि पुणे जिल्हा आंतर कचेरी क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या
पुणे जिल्हा आंतर कचेरी टेबल टेनिस स्पर्धेतील सांघिक विभागात एम्फसिस संघाने विजेतेपद मिळविले तर वैयक्तिक गटात ओंकार जोग हे दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले. महिलांच्या विभागात उज्ज्वला गायकवाड यांनी अजिंक्यपद पटकाविले.

ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे आयोजित करण्यात आली.एम्फसिस संघाने अंतिम फेरीत एच ई एम आर एल डीआरडीओ संघाचा ३-० असा पराभव केला. महिलांच्या एकेरीत गायकवाड (जीएस लॅब) यांनी अग्रमानांकीत रेणुका कोल्हे (इन्फोसिस) यांना १३-११,३-११,११-२,११-६ असे पराभूत केले.‌ प्रौढांच्या गटात अव्वल मानांकित ओंकार जोग (केएसबी) यांनी स्वानंद बेडेकर (एशियन पेंट्स) यांच्यावर १०-१२,११-७, ११-७,१२-१० अशी मात केली. त्यांनी पुरुषांच्या एकेरीत शुभंकर रानडे (आरडीसी) यांचा ८-११,१२-१० ,११-६,११-६ असा पराभव केला.
पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ क्रीडा संघटक अरविंद नातू ,आशिष बोडस, मधुकर लोणारे, सुरेंद्र देशपांडे, स्मिता बोडस, मनीषा बोडस यांच्या हस्ते झाला.

सविस्तर निकाल
सांघिक विभाग- अंतिम फेरी-
एम्फसिस वि.वि.एच ई एम आर एल डीआरडीओ (३-०)-
गौरांग शर्मा वि.वि. अक्रम हुसेन ११-२, १२-१०, ११-३. विकास छेत्री वि.वि संतोष मदिकुंट १५-१३,९-११,११-६,११-९. गौरांग शर्मा / विकास छेत्री वि.वि संतोष मदिकुंट / अक्रम हुसेन १२-१०,११-९,१०-१२,११-६

वैयक्तिक विभाग
अंतिम फेरी –
उज्ज्वला गायकवाड (जीएस लॅब) वि.वि रेणुका कोल्हे (इन्फोसिस) १३-११,३-११, ११-२, ११-६.
पुरुष एकेरी-ओंकार जोग (केएसबी) वि.वि शुभंकर रानडे (आर डी सी) ८-११,१२-१०, ११-६, ११-६.
पुरुष दुहेरी अंतिम सामना अश्विन भिडे व पार्थ सिंग (इन्फोसिस) विजयी विरुद्ध अभिषेक श्रीवास्तव व नवीन नातू (टीसीएस) ११-७,११-७,९-११,११-९
मिश्र दुहेरी- रेणुका कोल्हे व पार्थ सिंग इन्फोसिस विजयी विरुद्ध मेघना कुक्का व तनय घोष (सोशल सी सी) ११-७,११-७,११-४
प्रौढ एकेरी
अंतिम फेरी
ओंकार जोग (केएसबी) वि.वि स्वानंद बेडेकर (एशियन पेंट्स) १०-१२,११-७,११-७,१२-१०.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments