Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडचा पुण्यात फ्रँचायझी मेळावा; २०२७ च्या विकासाचा...

जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडचा पुण्यात फ्रँचायझी मेळावा; २०२७ च्या विकासाचा आराखडा मांडला* 

 

उद्योगातील २० वर्षांच्या प्रवासानिमित्त फ्रँचायझी भागीदारांशी संवाद; सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय उपक्रमांवरही भर

 

*पुणे* : भारतातील हेअर आणि ब्युटी उद्योगातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक असलेल्या Jawed Habib Hair & Beauty Limited यांच्या वतीने पुण्यात फ्रँचायझी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कंपनीचे फ्रँचायझी भागीदार, व्यावसायिक सहयोगी आणि उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी सहभागी झाले होते. कंपनीच्या आगामी विकास योजना, बदलते ग्राहक ट्रेंड, उद्योगातील नव्या संधी आणि २०२७ साठीच्या विकासदृष्टीवर यावेळी चर्चा करण्यात आली. पुण्यातील ५० हून अधिक सलूनचे संचालन करणारे मास्टर फ्रँचायझी अभिजीत गिलडा यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

 

जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडच्या उद्योगातील २० वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित या मेळाव्याला विशेष महत्त्व होते. फ्रँचायझी नेटवर्कमधील संबंध अधिक दृढ करणे, भागीदारांचे अनुभव आणि विचार जाणून घेणे, व्यवसायवृद्धीसाठी नव्या संधी शोधणे तसेच आगामी काळातील कंपनीच्या प्राधान्यक्रमांबाबत सर्व भागीदारांना एकत्रित दिशा देणे हा या मेळाव्याचा उद्देश होता.

 

प्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ जावेद हबीब यांनी फ्रँचायझी भागीदारांशी संवाद साधताना हेअर आणि ब्युटी उद्योगातील बदलते स्वरूप, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा, नव्या व्यावसायिक संधी आणि भविष्यातील आव्हानांवर आपले विचार मांडले. सलून व्यवसायात गुणवत्तापूर्ण सेवा, सातत्यपूर्ण मानके, कुशल मनुष्यबळ आणि फ्रँचायझी भागीदारांमधील विश्वासाचे नाते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

*यावेळी प्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ जावेद हबीब म्हणाले,* “गेल्या २० वर्षांचा प्रवास हा आमच्या फ्रँचायझी भागीदारांचा विश्वास, आमच्या टीमची मेहनत आणि संपूर्ण उद्योगाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला आहे. २०२७ आणि त्यापुढील काळाकडे पाहताना आमचे लक्ष ही नाती अधिक मजबूत करण्यावर, व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्यावर आणि पुढील पिढीतील व्यावसायिकांना घडविण्यावर आहे.”

 

मेळाव्यात कंपनीच्या विविध धोरणात्मक भागीदारांकडून उत्पादनांचे सादरीकरणही करण्यात आले. Wella, PureLuxe, Streax, Lotus Herbals यांसह इतर ब्रँडनी त्यांच्या व्यावसायिक उत्पादनांची आणि नव्या संकल्पनांची माहिती फ्रँचायझी भागीदारांना दिली. सलून व्यवसाय आणि उत्पादन ब्रँड यांच्यातील सहकार्यामुळे उद्योगाची गुणवत्ता, व्यावसायिकता आणि वाढ अधिक प्रभावीपणे साधता येऊ शकते, यावरही यावेळी भर देण्यात आला.

 

व्यावसायिक विकासासोबतच सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही कंपनी विविध उपक्रम राबवत आहे. २०२६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘नयी शुरुआत’ (Nayi Shuruaat) शिष्यवृत्ती उपक्रमाच्या माध्यमातून हेअर प्रोफेशनल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांना शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योगाची दीर्घकालीन वाढ ही नव्या कौशल्यवान व्यावसायिकांना घडविण्यावर अवलंबून असल्याने त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.

 

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून कंपनीच्या वतीने V Care Foundation यांच्या सहकार्याने देशभर केसदान उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच जावेद हबीब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण उपक्रमही आयोजित केला जातो. सौंदर्य क्षेत्रातील व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

 

२० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेड आता पुढील टप्प्यातील विकासासाठी सज्ज होत असून, फ्रँचायझी नेटवर्कचा विस्तार, उद्योगातील भागीदारांशी संबंध अधिक दृढ करणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि शाश्वत व्यवसाय संधी निर्माण करणे यावर कंपनीचा भर राहणार आहे. पुण्यातील फ्रँचायझी मेळावा हा २०२७ आणि त्यापुढील वाटचालीसाठी सर्व भागीदारांना एका समान विकासदृष्टीने जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

 

*जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडच्या फ्रँचायझी नेटवर्कशी जोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ७३९७८६२८११ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments