पुणे,22 जानेवारी 2025 : सोशल या भारतातील लोकप्रिय नेबरहुड कॅफे ने आपले को-वर्किंग मॉडेल असलेल्या सोशल वर्क्सचा 10 शहरांत 50 हून अधिक ठिकाणी विस्तार केला आहे. 10 वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या भारतातील पहिले को-वर्किंग स्पेस सोशल वर्क्सची रचना पारंपारिक कार्यालयांना पर्याय शोधणाऱ्या फ्रीलान्सर्स आणि व्यावसायिकांसाठी करण्यात आली आहे. सोशल वर्क्सच्या माध्यमातून सोशल आता नवीन ठिकाणी आपला विस्तार करत असून मुंबई,दिल्ली एनसीआर,पुणे,हैदराबाद,इंदौर,लखनौ,चंदीगड,देहरादून आणि कोलकाता येथील व्यावसायिकांना सहयोग आणि निर्मितीसाठी वर्क्स स्पेसेस उपलब्ध होतील.सोशल वर्क्स हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
सोशल तर्फे को-वर्किंग स्पेसचा विस्तार
Share with
Tagged in :