गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने प्रवासादरम्यान मनःशांती राहावी यासाठी सुरक्षा तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढत असल्याचे अधोरेखित केले ~
भारत, 23 जानेवारी, 2025: राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स बिझनेसने केलेल्या ‘हॅपिनेस सर्व्हे’ मध्ये घराच्या सुरक्षेसाठी 53% प्रतिसादकर्त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान मनःशांती सुनिश्चित करणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि स्मार्ट सुरक्षा उपायांसाठी ग्राहकांची वाढती पसंती यातून दिसून येते.
राष्ट्रीय पर्यटन दिन भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे किती महत्त्वपूर्ण योगदान आहे याची आठवण करून देतो. 2027 पर्यंत हे क्षेत्र देशांतर्गत प्रवास बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी सज्ज आहे. एकट्या 2024 मध्येच या क्षेत्राने परकीय चलनात 25,010 कोटी रु. पेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. प्रवास, पर्यटनाचे प्रमाण वाढत असताना घर सुरक्षित ठेवणे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. तसे झाले तरच प्रवासादरम्यान मन:शांती टिकून राहू शकते. प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा स्वीकार ही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट असल्याचे स्पष्ट होत असताना संशोधन अभ्यासातून असेही दिसून आले की 50% घरमालक हे तंत्रज्ञान वापरायला सोपे असणे महत्त्वाचे आहे असे मानतात तर 44% लोकांसाठी विश्वासार्हता हा महत्त्वाचा घटक आहे. हे निष्कर्ष अखंड संरक्षण सुनिश्चित करणारे स्मार्ट, वापरण्यास सुलभ सुरक्षा प्रणालींसाठी वाढती मागणी अधोरेखित करतात.
सर्वेक्षणातील निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “आमच्या हॅपिनेस सर्व्हेमधून असे दिसून आले आहे की ग्राहकांची मानसिकता सतत बदलत आहे. प्रवासादरम्यान आपल्या घरांचे रक्षण करण्यासाठी ते स्मार्ट आणि प्रगत सुरक्षा उपायांचा अवलंब करत आहेत. आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात जिथे पर्यटन वेगाने वाढत आहे तिथे तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपायांद्वारे घराचे केवळ प्रत्यक्ष संरक्षण होते असे नाही तर एकूणच स्वास्थ्य चांगले राहण्यात योगदान दिले जाते. गोदरेजमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामावणाऱ्या आणि त्यांची सुरक्षितता व आनंद वाढवणाऱ्या गृह सुरक्षा उत्पादन सुविधांसह सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
आधुनिक जीवनशैलीतील प्रवासाच्या वाढत्या भूमिकेचे महत्त्व दर्शवत राष्ट्रीय पर्यटन दिन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची, परंपरेची आठवण करून देतो. अधिकाधिक व्यक्ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेट देत असताना त्यांच्या अनुपस्थितीत घरे आणि मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याची गरज कधी नव्हती तेवढी आता जास्त झाली आहे. लोकांची ही वाढती काळजी वा चिंता शमविण्यासाठी गोदरेज एंटरप्राईज ग्रुपचा सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसाय एआय-सक्षम सर्व्हिलन्स कॅमेरे, इंट्रूजन अलार्म सिस्टीम्स आणि व्हिडिओ डोअर फोन्स यांसारखी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करतो. त्यामुळे घरमालकांना दूरस्थ देखरेख क्षमता आणि सक्रिय सुरक्षा सूचना मिळतात.
हॅपिनेस सर्व्हेने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईसह 12 प्रमुख शहरांतील 2,400 प्रतिसादकर्त्यांकडून माहिती गोळा केली. त्यातून ग्राहकांच्या पसंती व सुरक्षा गरजांवर सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळाला.
***