लोहिया मातृ मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम

तारां कित Avatar

डीईएस मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ‘युगंधर’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून श्रीकृष्णाच्या जीवनावरील ठळक प्रसंग सादर केले.

श्रीकृष्ण जन्म, बालपण, कृष्णलीला, गीता उपदेश, विराट रुप अशा प्रसंगातून उपस्थितांची दाद मिळविली.

अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, अभिनेता चिन्मय जोगळेकर, भारतीय विश्वकोषाचे प्रमुख डॉ. राजा दीक्षित यांची विशेष उपस्थिती होती.

डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, शाळा समितीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, मंजिरी देशपांडे, अभिषेक खेडकर यांनी संयोजन केले.

Tagged in :

तारां कित Avatar