केंट आर ओ सिस्टिम्स लिमिटेड (“कंपनी”) ने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.
कंपनीची प्राथमिक समभाग विक्रीद्वारे इक्विटी शेअर भांडवलाच्या ऑफरद्वारे निधी उभारण्याची योजना आहे. प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून एकूण ऑफरमध्ये प्रती शेअर 1 रु. दर्शनी मूल्याच्या 10,094,568 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ‘ऑफर फॉर सेल’ चा समावेश आहे.
‘केंट’ हा ब्रँड चांगल्या प्रकारे प्रस्थापित असून भारतातील पाणी शुद्धीकरण उत्पादन विभागातील रिव्हर्स ऑस्मोसिस (“RO”) तंत्रज्ञान सादर करणारा पथदर्शी म्हणून ओळखला जातो. (स्रोत: टेक्नोपाक रिपोर्ट). गेल्या काही वर्षांत, कंपनीने पाणी शुद्धीकरण उत्पादन विभागात आपली श्रेणी विस्तारित केली असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 5.50 दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली आहे.
मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.