Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedलाडक्या बहिणींसाठी हळदी-कुंकवाचा भव्य कार्यक्रम संपन्न पतित पावन संघटनेतर्फे आयोजन

लाडक्या बहिणींसाठी हळदी-कुंकवाचा भव्य कार्यक्रम संपन्न पतित पावन संघटनेतर्फे आयोजन

पुणे : पतित पावन संघटनेतर्फे गुरुवार पेठेतील जिव्हेश्वर सभागृह येथे लाडक्या बहिणींसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष आणि बारा बलुतेदार संघाचे पुणे शहर कार्याध्यक्ष स्वप्निल (बघराणा) नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात कन्यादान स्वरूपाचे वाण म्हणून पाच भांड्यांचा सेट देऊन बहिणींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पत्नी मृणालिनी हेमंत रासने उपस्थित होत्या. कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने बहिणी उपस्थित होत्या. यावेळी लव्ह जिहाद या विषयावर मार्गदर्शन करुन माता-भगिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावण्यात आले आणि लव्ह जिहाद विरोधात सजग राहण्याचे आवाहन केले.

स्वप्निल नाईक म्हणाले, समाजातील अन्यायाविरोधात माताभगिनींना जागरूक करण्याचा प्रयत्न करुन लव्ह जिहाद सारख्या समस्येवर एकत्र यायला हवे. हिंदू समाजाने परंपरा, संस्कृती, आणि सामुदायिक पालकत्व टिकवले पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments