Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedशालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, आरोग्यदायी सवयींची कमतरता स्पोर्ट्झ व्हिलेजने केलेल्या अहवालातील...

शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, आरोग्यदायी सवयींची कमतरता स्पोर्ट्झ व्हिलेजने केलेल्या अहवालातील निष्कर्ष 12 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षण उघड करते

भारत, January 23, 2024: देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचा निष्कर्ष स्पोर्ट्झ व्हिलेज या क्रिडा क्षेत्राशी संबंधित संस्थेने केलेल्या 12 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आला आहे. एज्यूस्पोर्ट्स इन स्कूल फिजिकल एज्यूकेशन कॅम्प या त्यांच्या क्रिडा उपक्रमाद्वारे देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याचे विविध मापदंडाच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले, त्यातून बहुतांश शाळांमधील मुलांची शारीरिक तंदुरुस्ती (फिटनेस) खूपच वाईट असल्याचे दिसून आले आहे.

 

या देशव्यापी सर्वेक्षणात शाळेतील मुलांच्या आरोग्याची बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), एरोबिक क्षमता, अनअॅरोबिक क्षमता, कोअर स्ट्रेंग्थ, लवचिकता, शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद अशा विविध मापदंडांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. या सर्वेक्षणात देशातील 250 शहरे आणि गावांमधील विविध शाळांमधील 7 ते 17 वर्षे वयोगटातील 73 हजारपेक्षा अधिक मुलांचा समावेश होता. या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे, की साप्ताहिक शारीरिक शिक्षणाच्या तासांची वारंवारता मुलांच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याबाबतच्या सर्वसमावेशक माहितीवरून, दर आठवड्याला होणारी शारीरिक शिक्षणाची सत्रे आणि मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे विविध पैलू यातील घनिष्ठ संबंध अधोरेखित झाला आहे.

 

दर आठवड्याला दोनपेक्षा जास्त शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये सहभागी झालेली मुले शारीरिक तंदुरुस्तीची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मापदंडाबाबत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शारीरिक शिक्षणातील नियमित सहभागामुळे शरीराच्या खालच्या भागाची ताकद, पोटाची ताकद, लवचिकता आणि एरोबिक क्षमता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सुधारणा दिसून आल्याचेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे. यावरून मुलांच्या सर्वांगीण विकासातील शारीरिक शिक्षणाचा सकारात्मक महत्त्व स्पष्ट होते. त्यामुळे मुलांच्या दैनंदिन आयुष्यात शारीरिक कसरतींचा नियमित समावेश करण्याच्या महत्त्वावर भर देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

या सर्वेक्षणातून मुली आणि मुलांमधील विविध आरोग्य मापदंडांच्या आधारे शारीरिक तंदुरुस्तीतील लक्षणीय फरकदेखील स्पष्टपणे दिसून आला आहे. उदा. मुलींमध्ये निरोगी बॉडी मास इंडेक्सचे (बीएमआय) प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. मुलींमध्ये हे प्रमाण 62 टक्के आहे, तर त्या तुलनेत मुलांचे प्रमाण कमी आहे. काही विशिष्ट शारीरिक तंदुरुस्तीच्या मापदंडांच्याआधारे केलेल्या परीक्षणानुसार, लवचिकता आणि शरीराच्या वरच्या भागाची ताकद याबाबतीत मुली मुलांपेक्षा अधिक उत्तम असल्याचेही दिसून आले आहे. हे निष्कर्ष मुलींच्या उत्तम आरोग्यातील नियमित शारीरिक व्यायामाचे सकारात्मक परिणाम अधोरेखित करतात

 

मुले एरोबिक क्षमता आणि शरीराच्या खालच्या भागातील ताकद याबाबतीत मुले अधिक तंदुरुस्त असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या निरीक्षणांच्या आधारे लिंग-आधारित उत्तम आरोग्याच्या निर्देशकांमधील फरक समजून घेऊन मुले आणि मुलींच्या तंदुरुस्तीसाठी योग्य शारीरिक शिक्षणाची योजना करणे शक्य होते. यामुळे मुले आणि मुली दोघांच्याही सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तयार केलेल्या पद्धतींचे महत्त्वही अधोरेखित होते.

 

या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातील निष्कर्षांवर भाष्य करताना, स्पोर्ट्झ व्हिलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सौमिल मजमुदार म्हणाले, “स्पोर्ट्झ व्हिलेजमध्ये आम्ही क्रिडाप्रकारांच्या, खेळांच्या आधारे मुलांचे जीवन

 

 

 

बदलण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे वार्षिक आरोग्य सर्वेक्षण देशातील शालेय मुलांचे आरोग्य आणि फिटनेसच्या स्थितीवर प्रकाश टाकते. ही स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शालेय प्रशासन आणि पालकांच्या दृष्टीनेही अभ्यासापेक्षा शारीरिक शिक्षणाचे महत्त्व कमी असल्याचे जाणवते. मुलांना खेळण्यासाठी, शारीरिक व्यायामासाठी अगदी कमी वेळ मिळतो. त्यांची ऊर्जाही बौद्धिक कामात अधिक खर्ची पडत असल्याने व्यायाम, खेळ यासाठी ऊर्जा कमी पडते. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. शाळांनी खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिला पाहिजे आणि त्यासाठी मुलांना क्रिडा प्रकार, व्यायाम यासाठी आवश्यक ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. विविध अभ्यासांमधूनही असे दिसून आले आहे, की नियमित रचनाबद्ध शारीरिक कसरतींमुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुलांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासही मदत होते. गेल्या 15 वर्षांमध्ये ,एज्यूस्पोर्ट्स उपक्रमाने शाळेचे वेळापत्रक आणि कॅलेंडरमध्ये यामध्ये समन्वय साधून हे अंतर भरून काढले आहे.”

 

 

प्रमुख निष्कर्ष:

 

· संपूर्ण भारतात एकूण 73000 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले

 

· पाच पैकी दोन मुलांचा बीएमआय निरोगी नाही

 

· पाच पैकी दोन मुलांमध्ये अपेक्षित अनएरोबिक क्षमता नाही

 

· चार पैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही

 

· तीन पैकी एका मुलांमध्ये शरीराच्या खालच्या भागात अपेक्षित ताकद नाही

 

· पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नाही

 

 

 

मुली आणि मुलांमधील फिटनेस पातळीबाबतचे तुलनात्मक विश्लेषण:

 

या सर्वेक्षणानुसार, निरोगी बीएमआय पातळी असलेल्या मुलींची टक्केवारी (62 टक्के मुलींचा बीएमआय उत्तम आहे) मुलांच्या तुलनेत जास्त आहे. मुलींनी लवचिकता आणि शरीराच्या वरच्या भागातील ताकद याबाबतीतही उत्तम कामगिरी नोंदविली आहे. तथापि, त्या एरोबिक क्षमता आणि शरीराच्या खालच्या भागाची ताकद याबाबत मुलांपेक्षा मागे आहेत.

 

image.png

 

 

मुलांच्या फिटनेस पातळीबाबत सरकारी शाळा आणि खासगी शाळा आधारावर तुलनात्मक विश्लेषण:

 

या सर्वेक्षणानुसार, खासगी शाळांमधील मुले शरीराच्या वरच्या भागातील ताकदीच्या बाबत सरकारी शाळांमधील मुलांच्या तुलनेत सरस आहेत. (खासगी शाळांमधील मुलाचे प्रमाण 43 टक्के आहे, तर सरकारी शाळांमधील मुलांचे प्रमाण 31 टक्के आहे.) बीएमआय, एरोबिक क्षमता आणि लवचिकता याबाबतीत सरकारी शाळांमधील मुले आघाडीवर आहेत.

 

image.png

 

 

दर आठवड्याचे शारीरिक शिक्षण तास आणि त्याचा प्रभाव याचे तुलनात्मक विश्लेषण:

 

फिटनेस पातळीबाबत दर आठवड्याचे शारीरिक शिक्षण तास आणि त्याचा प्रभाव याचे तुलनात्मक विश्लेषण या सर्वेक्षणानुसार, दर आठवड्याला दोनपेक्षा जास्त शारीरिक शिक्षणाचे तास असणाऱ्या शाळांमधील मुलांची कामगिरी कमी तास असलेल्या मुलांच्या तुलनेत उत्तम आहे. दोनपेक्षा अधिक तास असलेल्या शाळेतील मुलांनी शरीराच्या खालच्या भागांची ताकद, पोटाची ताकद, लवचिकता आणि एरोबिक क्षमता आदी मापदंडाबाबत चांगली कामगिरी केली आहे.

 

image.png

 

 

मापदंडांबाबत माहिती :

 

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय): एखाद्या व्यक्तीचे वजन आणि उंची यावरून काढला जाणारा विशिष्ट निर्देशांक, याआधारे त्या व्यक्तीचे वजन निरोगी आरोग्यासाठी आवश्यक वजनमर्यादेत आहे की नाही हे मोजले जाते.

 

एरोबिक क्षमता: हृदय आणि फुफ्फुसांची स्नायूंना ऑक्सिजन मिळवण्याची क्षमता.

 

अनएरोबिक क्षमता: ऑक्सिजनशिवाय ऊर्जा प्रणालींमधून मिळालेली एकूण ऊर्जा. उच्च तीव्रतेच्या कमी कालावधीचे व्यायाम किंवा धावणे यासाठी ही क्षमता उपयुक्त असते.

 

ओटीपोटाची किंवा कोअरची ताकद: ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद जे शरीराचे पोश्चर निर्धारित करण्यात मदत करते

 

लवचिकता: सांध्याची मुक्तपणे हालचाल करण्याची क्षमता.

 

शरीराच्या वरच्या भागाची ताकद: पेक्टोरल (छाती), रॉम्बोइड्स (पाठीचा वरचा भाग), डेल्टॉइड्स (बाहेरील खांदा), ट्रायसेप्स (वरच्या हाताच्या मागे) आणि बायसेप्स (वरच्या हाताच्या समोर) या भागांच्या स्नायूंची ताकद.

 

 

शरीराची खालची ताकद: यामध्ये पायातील स्नायूंची ताकद, जसे की (क्वाड्रिसेप्स) पायाच्या वरच्या भागातीलपुढील बाजूचे स्नायू, (हॅमस्ट्रिंग्स) पायाच्या मागच्या बाजूला असलेल्या स्नायूंची ताकद, तसेच ग्लुटील्स, हिप फ्लेक्सर्स आणि काफ मसल्सची ताक

द.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments