Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रा. सुधीर रमेश देशपांडे यांना वास्तूरचनाशास्त्रात पीएचडी

प्रा. सुधीर रमेश देशपांडे यांना वास्तूरचनाशास्त्रात पीएचडी

पुणे, दि. 27 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन मधील (बीएनसीए) संशोधन केंद्रातून प्रा. सुधीर रमेश देशपांडे यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये पी. एचडी. संपादन केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‌‘वास्तूरचनाशास्त्रातील बांधकाम रचना आणि पद्धतीतील वैशिष्ट्यांमधून परवडणाऱ्या आर्थिक क्षमतेचा वेध : पुणे विभाग‌’ हा होता. प्रा.देशपांडे हे ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये प्राध्यापक असून त्यांनी बीएनसीएतील संशोधन केंद्रातून संशोधन पूर्ण केले. त्यासाठी त्यांना डॉ. मीरा शिरोळकर यांनी मार्गदर्शन केले. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप या संशोधन केंद्राचे प्रमूख असून प्रा. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात डॉ.वसुधा गोखले यांचाही सहभाग आहे. या केंद्रातून आतापर्यंत 24 जणांनी पी.एचडी. संपादन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments