Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाईर्स एमआयटी शिक्षण समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘मेल टू महात्मा’...

माईर्स एमआयटी शिक्षण समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘मेल टू महात्मा’ अभिनव संकल्पना विश्वशांतीसाठी सर्व राष्ट्रप्रमुख, युनेस्को व यूनो ला करणार आवाहन

पुणे, ३० जानेवारी: राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचे विचार प्रत्येकाने अंमलात आणावे तसेच विश्व शांतीचा प्रचार व प्रसार व्हावा. हा मुख्य उद्देश्य ठेवून माईर्स एमआयटी शिक्षण समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ‘मेल टू महात्मा’ ही अभिनव संकल्पना चालविली जाणार आहे. यामध्ये समूहातील ७२ हजार विद्यार्थी व ३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी युनायटेड नेशन्स, युनेस्को आणि जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या राष्ट्र प्रमुखांना पत्र लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. यामध्ये असे नमूद करण्यात येणार आहे की, म. गांधीजींचे विचार अमलात आणून, हिंसाचार,
रक्तपात, सीमावाद थांबवून शांतता नांदण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सर्वांना समोर येण्याचे आवाहन माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा कराड यांनी हा संकल्प सोडला आहे.
या वेळी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, प्रा. दत्ता दंडगे, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, म. गांधीजींनी सतत आत्मपरीक्षण केले आहे. त्यांचा विचार जीवनात उतरविणे गरजेचे आहे. त्यांच्या तत्वांवर विचार करण्याची वेळ आली आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात वैज्ञानिक व औद्योगिक प्रगती झाली. त्यातूनच भौतिक सुख, सुविधांची घोडदौड सुरूच आहे. अशा वेळेस अज्ञान, अहंभाव व स्वार्थापोटी अराजकता, आतंकवाद, रक्तपात व अन्य गोष्टींचे थैमानही वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे आपण २१ व्या शतकाचा अंत पाहू शकेल की नाही ही भिती वाटत आहे.
जगप्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी ११ व्या शांतता परिषदेच्या निमित्ताने ‘मेल टू महात्मा’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. यातून प्रेरणा घेऊन विश्वशांती दूत महात्मा गांधींच्या ७७ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, महात्मा गांधीजींना अभिवादन करूण शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आदरांजली वाहिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments