Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालसाहित्य हे साहित्य विश्वातील सर्वात सुंदर दालन बालसाहित्यिका स्वाती राजे यांचे...

बालसाहित्य हे साहित्य विश्वातील सर्वात सुंदर दालन बालसाहित्यिका स्वाती राजे यांचे मत : अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन

पुणे: साहित्य संमेलने म्हणजे वाद नाही. साहित्य संमेलनात विविध विचारप्रवाह आणि प्रणालीचे लेखक, साहित्यिक एकत्र येतात आणि त्यांच्यात संवाद होतो. समाजाला वैचारिक, सांस्कृतिक दिशा मिळावी या विचारातून साहित्य संमेलने भरवली जातात. साहित्य संमेलने हा विचारांचा उत्सव असतो. विविध साहित्य प्रवाहांनी साहित्य विश्व सजले आहे. यामधील सर्वात सुंदर दालन म्हणजे बालसाहित्य आहे, असे मत बालसाहित्यिका स्वाती राजे यांनी व्यक्त केले.

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. यावेळी बालसाहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष स्वाती राजे, ज्येष्ठ साहित्यिक न.म. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. लेखक मिलिंद जोशी, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर, बाल अभिनेता शार्दुल धारणे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई यावेळी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होऊन त्यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे होते. विविध शाळेतील मुलांनी ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला.

न. म. जोशी म्हणाले, देशाची प्रगती कोणा दुसऱ्यांच्या हातात नाही तर देशाची प्रगती आपल्याच हातात आहे, असे त्यांनी मुलांशी बोलताना सांगितले. राजन लाखे म्हणाले, आज मुलांसोबत मातृभाषेत संवाद साधण्याची गरज आहे. त्यांना भरकटण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत, परंतु साहित्याचा मार्ग आपण त्यांना दाखवायला हवा.

मिलिंद जोशी म्हणाले, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत. तंत्रज्ञान वापरासाठी असते, तर माणसे ही प्रेम करण्यासाठी असतात. परंतु आज नेमके उलटे चित्र झालेले आपल्याला दिसून येते. निराश झालेल्या मनाला प्रज्वलित करण्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. जीवन समजावून सांगणारी पुस्तके वाचा. एकाच जीवनात अनेक जीवन पुस्तके वाचल्यामुळे आपण जगतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश होळकर, शार्दुल धारणे यांनी मनोगत व्यक्त केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. विनोद वाघ यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments