Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुरव, वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी पुणे येथे कार्यालय कार्यान्वित*

गुरव, वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी पुणे येथे कार्यालय कार्यान्वित*

*

पुणे, दि. १२ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना केली असून पुणे जिल्हा स्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील गुरव आणि वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत-बी, स.न. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकीसमोर, विश्रांतवाडी, येरवडा, जिल्हा पुणे ४११००६, दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ए.पी. माने यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments