Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' गणपती मंदिरात शनिवारी (दि.१) थाटात साजरा होणार गणेशजन्म सोहळा* ...

दगडूशेठ’ गणपती मंदिरात शनिवारी (दि.१) थाटात साजरा होणार गणेशजन्म सोहळा* *पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’*

पुणे : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थी, शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी गणेशजन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शनिवारी, सकाळी ९ वाजता पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करण्यात येणार आहे. मंदिराला आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात येईल. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

मंदिरात शनिवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात येणार आहे. पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे सादरीकरण करतील. त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक केला जाणार आहे.

सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग होईल आणि दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा होईल. सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येईल.

* *गणरायाला १ किलोचा ‘कमळ हार’ होणार अर्पण*
*
श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजीकाका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली. त्यामुळे सकाळी ९ वाजता हार अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.

‘कमळ हार’ हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडविण्यात आली आहेत. या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे, त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे. मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे. ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते. या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे. यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे. हा अद्वितीय दागिना २० कुशल कारागीरांनी २५ दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे. या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments