Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोबोटिक तंत्रज्ञानामुळे कर्करोग उपचारात अधिक सुलभता

रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कर्करोग उपचारात अधिक सुलभता

पुणे 3 फेब्रुवारी 2025 : रोबोटिक तंत्रज्ञानामुळे कर्करोग उपचारात रुग्णांसाठी आणि शल्य चिकित्सकांसाठी अधिक सुलभता आली आहे, असे मत एस हॉस्पिटलचे अध्यक्ष व ज्येष्ठ मूत्ररोग तज्ञ डॉ सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने जगभरात जागरूकता उपक्रम आयोजित केले जातात.

कर्करोगाबाबत जागरूकता वाढत असली तरी निमशहरी आणि ग्रामीण भागात आणखी काम करण्याची गरज आहे. कर्करोग उपचार हे कोणता कर्करोग झाला आहे आणि कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून असतात आणि दीर्घकाळ चालू राहतात. त्यामुळे याच्याशी लढण्यासाठी जिद्द आणि संयम राखणे महत्वाचे ठरते.

डॉ.पाटणकर म्हणाले की,कर्करोग उपचारामध्ये नवीन तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणत आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकता साध्य होते. डॉक्टरांना रोबोटिक प्रणालीच्या सहाय्याने बाधित भागावर लक्ष केंद्रित करता येते व आजूबाजूच्या पेशींना किंवा अवयवांना इजा किंवा नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी असते. कमी रक्तस्त्राव आणि अचुकतेमुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाऊ शकतो. रुग्णांबरोबरच शल्य चिकित्सकांसाठी देखील ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे. रोबोटिक प्रणाली आपले काम करत असताना नियंत्रण शल्य चिकित्सकांकडेच राहते. कोणतीही शस्त्रक्रिया करत असताना डोळे आणि हातांमधील समन्वय अतिशय महत्वाचा असतो. मात्र दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये हा समन्वय आणि हात जास्त वेळ स्थिर ठेवणे आव्हानात्मक असते. रोबोटिक प्रणाली वापरण्याचे कौशल्य असल्यास हे सहज शक्य होते आणि अचूकता साध्य होते. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांकरिता नवनवीन तंत्रज्ञान हे लाभदायक ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments