• न्यू निस्सान मॅग्नाइट आता ‘वन कार, वन वर्ल्ड’ धोरणानुसार जागतिक बाजारपेठांमध्ये निस्सानसाठी प्रवेश स्तरावरील बी-एसयूव्ही ठरणार.
• न्यू निस्सान मॅग्नाइट एलएचडीच्या सुमारे २९०० गाड्यांची जानेवारी २०२५ मध्ये लॅटिन अमेरिकी (लॅटम)) प्रदेशातील निवडक बाजारपेठांमध्ये निर्यात.
• न्यू निस्सान मॅग्नाइटच्या सुमारे ७१०० गाड्या फेब्रुवारी २०२५ च्या दुसऱ्या लाटेत मध्यपूर्व, उत्तर आफ्रिकेतील बाजारपेठा तसेच लॅटिन अमेरिकी (लॅटम) आणि आशिया पॅसिफिकमधील बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या जाणार.
• निस्सानच्या चेन्नईतील अलायन्स जेव्ही कारखान्यात उत्पादित केल्या गेलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइट आता ६५+ जागतिक आरएचडी (राइट हँड ड्राइव्ह) आणि एलएचडी (लेफ्ट हँड ड्राइव्ह) बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या जाणार.
• मॅग्नाइटची भारतातील व परदेशातील उत्तम विक्री आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्यामुळे निस्सानच्या महत्त्वाच्या आणि विशेषतः उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये पुनरागमनाचे सूतोवाच
चेन्नई, ०३ फेब्रुवारी २०२५: न्यू निस्सान मॅग्नाइट ही ऑक्टोबर २०२४ मध्ये निस्सान मोटरकडून बाजारात आणली गेलेली बी-एसयूव्ही असून तिचे रस्त्यावरील अस्तित्व ठळक आहे व ती प्रीमियम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ही गाडी आता जागतिक लेफ्ट हँड (एलएचडी) बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. निस्सान मोटर इंडियाने चेन्नईतील आपल्या कारखान्यातून एलएचडी प्रकारच्या न्यू निस्सान मॅग्नाइट सुमारे २९०० गाड्या कामराजर पोर्ट (केपीएल- एन्नोर), भारत येथून जानेवारी २०२५ च्या शेवटच्या टप्प्यात लॅटिन अमेरिकी (लॅटम) प्रदेशातील निवडक बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या. यातून निस्सानचे ‘वन कार, वन वर्ल्ड’ धोरण अधोरेखित झाले असून निस्सान मोटर इंडियाची जागतिक पाया विस्तारण्याची आणि भारताला निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याप्रति वचनबद्धता अधोरेखित होते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये निस्सान मोटर इंडिया फेब्रुवारी २०२५ च्या दुसऱ्या लाटेत न्यू निस्सान मॅग्नाइटच्या ७१०० गाड्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकी (लॅटम) तसेच आशिया पॅसिफिक प्रदेशातील निवडक बाजारपेठांमध्ये निर्यात करेल. फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत ही कंपनी न्यू निस्सान मॅग्नाइटच्या एलएचडीच्या १०,००० गाड्या निर्यात करेल.
एएमआयईओ रिजन बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनचे विभागीय उपाध्यक्ष आणि निस्सान इंडिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष फ्रँक टोरेस या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलताना म्हणाले की, “निस्सान मोटर इंडिया फक्त देशांतर्गत बाजारपेठेतच आपली ऑपरेशन्स आणि व्याप्ती विस्तारण्यासाठी कार्यरत नसून निर्यातीवरही भर देत आहे. आमच्या मागील वर्षी घोषित झालेल्या निर्यात योजनांनुसार आम्हाला न्यू निस्सान मॅग्नाइट लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) बाजारपेठांमध्ये निर्यात सुरू करताना खूप आनंद होत आहे. ही एक मोठी कामगिरी आहे आणि आम्ही या प्रदेशांमधील नवीन ग्राहकांना सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत. निस्सान मॅग्नाइट ही गाडी भारत आणि जागतिक बाजारपेठांमध्येही आमच्या यशाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ही भारतात तयार केलेली गाडी आमच्या निर्यातीला चालना देईल याची आम्हाला खात्री वाटते.”
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी आपला उत्साह दर्शवताना सांगितले की, “लेफ्ट हँड ड्राइव्ह न्यू निस्सान मॅग्नाइटची निर्यात सुरू होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ती आमच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ तत्वज्ञानाशी सुसंगत आहे. मॅग्नाइट स्थानिक ज्ञानासह सर्वोत्तम जपानी अभियांत्रिकीचा वापर करून बनवलेली आहे. ती आमच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड’ तत्वानुसार तयार केलेली असून त्यातून जगभरातील ग्राहकांना जागतिक दर्जाचे नवसंशोधन, सुरक्षा आणि मूल्य दिले जाते. यातून भारताचे निस्सानसाठी महत्त्वाचे उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून स्थान अधोरेखित केले जाते. निस्सान भारतातील आमल्या ऑपरेशन्सप्रति तसेच आमचे डीलर्स, भागीदार आणि ग्राहकांप्रति वचनबद्ध आहे. आम्ही मागील वर्षी फोर्थ जनरेशन निस्सान एक्स-ट्रेल आणि न्यू निस्सान मॅग्नाइटच्या अनावरणानिमित्ताने आखलेल्या आराखड्यांनुसार कार्यरत आहोत.”
रेनॉल्ट निस्सान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक कीर्ती प्रकाश म्हणाले की, “न्यू निस्सान मॅग्नाइटच्या लेफ्ट हँड ड्राइव्ह बाजारपेठांमध्ये यशस्वी उत्पादन आणि निर्यात हे आमच्या टीमच्या अद्वितीय कार्यक्षमता तसेच आमच्या चेन्नईतील कारखान्यातील जागतिक दर्जाच्या उत्पादन मानकांचे प्रतीक आहे. ही कामगिरी भारताच्या निस्सानच्या जागतिक यशाला चालना देण्यातील महत्त्वाच्या भूमिकेला अधोरेखित करते आणि न्यू निस्सान मॅग्नाइटची खऱ्या अर्थाने जागतिक वाहन म्हणून प्रतिमा वाढीस लावते.”
न्यू मॅग्नाइट जगभरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन वैशिष्ट्यांनी युक्त आहे. त्यात या गोष्टी आहेत:
• आकर्षक डिझाइन: सुंदर बाह्यरूप तसेच बोल्ड नवीन फ्रंट ग्रिल, सडपातळ एलईडी हेडलाइट्स आणि देखणेपणा यामुळे ती तात्काळ लक्ष वेधून घेते.
• अद्ययावत तंत्रज्ञान: एक ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि अॅपल कारप्ले तसेच अँड्रॉइड ऑटो इंटिग्रेशन ज्यातून सुलभ कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजन मिळेल. ग्राहकांच्या सोयीसाठी नावीन्यपूर्ण तपशिलांमध्ये रिमोट इंजिन स्टार्ट, एअर आयोनायझर आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स यांचा समावेश आहे.
• वाढीव सुरक्षा: विविध प्रकारची सुरक्षा वैशिष्टे जसे सहा एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), व्हेइकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी) आणि रेअरव्ह्यू कॅमेरा ज्यातून प्रत्येक प्रवासात मनःशांती मिळेल.
• उत्तम कामगिरी: मॅग्नाइटला अद्ययावत टर्बोचार्ज्ड १.० लिटरने ऊर्जा मिळाली आहे जे मॅन्युअल किंवा अद्ययावत कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशनने (सीव्हीटी) जोडले जाऊ शकते.
चेन्नईतील निस्सानच्या अलायन्स जेव्ही कारखाना (आरएनएआयपीएल)मध्ये उत्पादन झालेल्या लेफ्ट हँड ड्राइव्ह न्यू निस्सान मॅग्नाइटची जागतिक बाजारपेठांमधील निर्यात निस्सानसाठी भारताच्या जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून महत्त्वाच्या भूमिकेला स्पष्ट करते. न्यू निस्सान मॅग्नाइट आता अनेक एलएचडी बाजारपेठांसह ६५+ जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल.
हा उपक्रम कंपनीच्या जागतिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली नावीन्यपूर्ण, उत्तम दर्जाची उत्पादने डिलिव्हर करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. मेड इन इंडिया न्यू निस्सान मॅग्निटला मागणी वाढू लागली असून त्यातून निस्साने पुन्हा एकदा जगाला आपली तांत्रिक नवसंशोधन आणि उत्पादनाची शक्ती दाखवून दिली आहे.
निस्सान मोटर इंडियाने अलीकडेच आपल्या नव्याने बाजारात आलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइट (आरएचडी) दक्षिण आफ्रिकेला निर्यात करण्यास सुरूवात केली. न्यू निस्सान मॅग्नाइटच्या अनावरणावेळी केलेल्या घोषणेनुसार कंपनीने निस्सानच्या चेन्नईतील अलायन्स जेव्ही कारखान्यातून आपले नवीन उत्पादन जागतिक बाजारपेठेत आणले आणि निस्सानची लोकप्रिय एसयूव्ही प्राप्त करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला देश ठरला.
भारतात मागील वर्षी जागतिक उद्घाटन झाल्यापासून चेन्नई कारखान्यातून आरएचडी निस्सान मॅग्नाइटच्या सुमारे २७०० गाड्या दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आल्या. न्यू निस्सान मॅग्नाइट हे निस्सानच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर दि वर्ल्ड’ धोरणाचे प्रतीक असून डिसेंबर २०२० मध्ये उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत एकूण १७०,०००* गाड्या विकून भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेत एक मोठा प्रभाव टाकला आहे.
न्यू निस्सान मॅग्नाइट आपल्या आधीच्या यशावर आधारित राहून अधिक मजबूत, बोल्ड आणि उत्तम बाह्यरूपासह रस्त्यावर स्वतःचा ठसा उमटवते. नव्याने डिझाइन केलेली रचना आणि प्रीमियम नवीन बाह्यरूप व आंतररूप तसेच भारतात २०+ वर्गातील पहिल्या वैशिष्ट्यांसह न्यू निस्सान मॅग्नाइट आपले ‘बोल्ड इनसाइड आऊट’ तत्वज्ञान कायम ठेवते. जागतिक दर्जानुसार बनवण्यात आलेली न्यू निस्सान मॅग्नाइट ४०+ स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह पुनर्रचित बॉडी रचनेसह अधिक सुरक्षा देते.
न्यू निस्सान मॅग्नाइटबाबत अधिक माहिती किंवा नवीन वैशिष्ट्यांसाठी कृपया भेट द्या: New Nissan Magnite 2024
निस्सान मोटर इंडिया प्रा. लि.बाबत
निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल)ची स्थापना २०१० साली झाली असून ती निस्सान मोटर कं. लि. जपानची १०० टक्के मालकीची कंपनी आहे. ती देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांना चेन्नईत उत्पादन कारखाना आणि संशोधन व विकास केंद्रांसह सेवा देते. आपल्या जागतिक अलायन्स भागीदार रेनॉल्टसह निस्सानने भारतीय अर्थव्यवस्थेत १.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि त्यांनी ७०,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या व कौशल्याच्या संधींची निर्मिती केली आहे. अधिक माहितीसाठी www.nissan.in येथे भेट द्या.


