Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorized'हर हर महादेव' रंगावली प्रदर्शनातून अवतरले महादेव चरित्र श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन...

‘हर हर महादेव’ रंगावली प्रदर्शनातून अवतरले महादेव चरित्र श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन : रंगावलीकार प्रा.अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : रंगावलीतून दाखविलेली शिवाची उत्पत्ती… शिवाला झालेला सती वियोग… भव्य रंगावलीतून साकारलेला शिव-पार्वती विवाह सोहळा… सप्तरंगातून दर्शविलेले अर्धनारी नटेश्वराचे सौंदर्य… वीरभद्रेश्वर आणि हनुमंताची टू इन वन रांगोळी… आणि पाण्याच्या मधोमध कार्तिक स्वामींचे बालस्वरूपातील मोहक रुप पाहताना पुणेकर भारावून गेले. तसेच रंगावलीच्या माध्यमातून बारा ज्योर्तिलिंगांचे दर्शनही नागरिकांना घडले.

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन तर्फे ‘हर हर महादेव’ या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनचे प्रा.अक्षय शहापूरकर, अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, महादेव गोपाळे, श्रीहरी पवळे आदी उपस्थित होते.

प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांचे १०० विद्यार्थी यांनी तब्बल ३० ते ३५ तासांत महादेवांच्या लीला रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या असून रांगोळीतील अनेक संशोधने प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. यावेळी स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले.

प्रा. अक्षय शहापूरकर म्हणाले, प्रदर्शनात ३० रांगोळ्या असून रंगावली चे विविध प्रकार देखील आपल्याला प्रदर्शनात पाहायला मिळतील. यामध्ये थ्री डी रांगोळी, टू इन वन रांगोळी, पाण्यावर – पाण्याखाली तसेच पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, हलती रांगोळी स्पाॅटेड रांगोळी तसेच आणखी बरेच प्रकार पुणेकरांना अनुभवायला मिळतील. हे प्रदर्शन दि.९ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असेही त्यांना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments