गुरुग्राम, भारत, २४ जानेवारी २०२४ – ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा भारतातील सर्वात मोठा ब्रॅण्ड असलेल्या सॅमसंगने आज ‘सॅमसंग एज्युकेशन हब’ या फिजिक्सवालाच्या सहयोगाने विकसित केलेल्या डिझाइन्ड-फॉर-टीव्ही एज्युकेशन अॅपच्या शुभारंभाची घोषणा केली. हे अॅप सॅमसंग स्मार्ट मॉनिटर्ससह ३२ इंच ते ९८ इंच आकाराच्या सॅमसंग टीव्हींवर असेल. २०२३ च्या मॉडेल्सपासून उपलब्ध होणारे हे एज्युकेशन हब अॅप २०२० पर्यंतच्या सॅमसंग टीव्ही आणि स्मार्ट मॉनिटर्सवरही टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल. त्याचबरोबर हे अॅप २०२४ च्या सर्व सॅमसंग टीव्ही आणि स्मार्ट मॉनिटर्सवरही उपलब्ध असेल.
ऑनलाइन एड-टेक प्लॅटफॉर्म फिजिक्सवालाशी केलेल्या खास भागीदारीच्या माध्यमातून एका अधिक मोठ्या स्क्रीनवर ऑनलाइन वर्गांना हजेरी लावण्याचा पर्याय पुरवित घराघरांत एक शैक्षणिक साधन म्हणून टीव्हीची भूमिका अधिक विस्तारण्याचे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
एज्युकेशन हब अॅपमुळे CBSE बोर्डाच्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तसेच IIT आणि NEET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना लाइव्ह क्लासेसना हजेरी लावता येणार आहे. तसेच ऑन डिमांड उपलब्ध असलेला शिक्षणात्मक कन्टेन्ट पाहता येणार आहे. हा शैक्षणिक कन्टेन्ट सॅमसंग टीव्ही असलेल्या फिजिक्स वालाच्या विद्यमान विद्यार्थी नोंदणीधारकांना तसेच या एड-टेक मंचाचे सदस्यत्व घेण्याची इच्छा असलेल्या सॅमसंग टीव्ही वापरणाऱ्यांना उपलब्ध असणार आहे.
सॅमसंगच्या ग्राहकांना त्यांच्या टीव्ही आणि स्मार्ट मॉनिटर्सवर कोणत्याही ‘प्रिमियम लाइव्ह कोर्सेस’पैकी कोणताही एक अभ्यासक्रम २ महिन्यांपर्यंत विनामूल्य पाहण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. याखेरीज त्यांना ‘फिजिक्स वाला खजाना कन्टेन्ट’च्या कन्टेन्ट लायब्ररीचा वापरही करता येणार आहे, ज्यात उत्तमोत्तम शिक्षकांच्या अव्वल दर्जाच्या लेक्चर्सचा समावेश आहे. या ऑफर्सचे तपशील जाणून घेण्यासाठी अटी व शर्थी वाचा.
“सॅमसंग एज्युकेशन हब अॅपच्या साथीने घराघरांतील टीव्हीची भूमिका केवळ मनोरंजनाच्या पलीकडे विस्तारण्याचा आणि मोठ्या स्क्रीनवर ऑनलाइन शिक्षणाचा अखंडित अनुभव मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे ‘डिझाइन्ड-फॉर-टीव्ही’ एज्युकेशन अॅप ६वी ते १२वी या इयत्तांतील विद्यार्थ्यांना आणि स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या होतकरूंना एक अखंड आणि मनोवेधक शैक्षणिक अनुभव मिळवून देत ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सज्ज आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही एका अशा भविष्याचे स्वप्न पाहत आहोत, जिथे शिक्षणाला कोणत्याही सीमारेषा नसतील, रिमोटच्या एका बटनावर ज्ञान उपलब्ध होऊ शकेल,” सॅमसंगमध्ये इंडिया कन्झ्युमर एक्स्पीरियन्स विभागाचे प्रमुख दिपेश शाह म्हणाले.
फिजिक्स वालाचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर अभिषेक मिश्रा म्हणाले, “फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, टीव्ही किंवा हायब्रीड माध्यम अशा शक्य त्या प्रत्येक माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे हे नेहमीच आमचे मिशन राहिले आहे. हा सहयोग म्हणजे दर्जेदार कन्टेन्टच्या वितरणाची कक्षा विस्तारण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. आता, विद्यार्थ्यांना घरच्या घरीच, मोठ्या स्क्रीनवर अधिक चांगल्या अध्ययनातील मौज अनुभवता येणार आहे. मला वाटते की, यामुळे त्यांची समजूत आणि मिळविलेले ज्ञान मेंदूत अधिक काळ संग्रहित करून ठेवण्याची त्यांची क्षमता यांत सुधारणा होईल.”
आजच्या आधुनिक ग्राहकांसाठी स्मार्ट अनुभवाचे खरेखुरे उदाहरण बनलेले एज्युकेशन हब म्हणजे क्लाउड गेमिंग, योगा अँड फिटनेस इत्यादी सॅमसंग स्मार्ट टीव्हीच्या इतर अनेक प्रीमियम सेवांमध्ये पडलेली एक न
वी भर आहे.


