पुणे, 25 जानेवारी २०२४ : द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) पुणेच्या अध्यक्षपदी अजय भागवत यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय भागवत यांनी 1 जानेवारी 2024 पासून माजी अध्यक्ष विनीत पाटनी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
जगभरातील इतर सर्व टीआयई चॅप्टर्सप्रमाणे, अजय यांच्या नेतृत्वाखाली टीआयई पुणे उद्योजकतेला प्रोत्साहन देणे सुरु ठेवेल. अजय भागवत यांच्या मते केवळ युवा स्टार्ट-अप्सलाच नव्हे तर विविध आकारातील सर्व कंपन्यांना सहकार्य व सल्ल्याची गरज असते.
प्रेरणा, शिक्षण, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी या पाच स्तंभांच्या मदतीने टीआयई पुणे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यास मदत करत आली आहे.
टीआयई नर्चर हा सखोल मार्गदर्शनाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला असून आता युरोप आणि अमेरिकेत देखील राबविला जात आहे. अजय भागवत हे टीआयई नर्चर उपक्रमाच्या संस्थापकांपैकी एक आहे.अजय भागवत यांच्या मते केवळ उलाढालीच्या मागे न धावता चांगला नफा कमावणार्या कंपन्या तयार करणे गरजेचे आहे.
अजय भागवत म्हणाले की,सध्या काही काळ स्टार्ट-अप्समधील गुंतवणूकीमध्ये घट झाली असली तरी चांगल्या कंपन्या उत्तम प्रगती करत आहेत. गेल्या 11 वर्षात टीआयई नर्चर उपक्रमांद्वारे 300 हून अधिक स्टार्ट-अप्सना मदत झाली असून 150 हून अधिक स्टार्ट-अप्सने हा कार्यक्रम पूर्ण केला आहे.अर्ली सॅलरी,अल्टीझॉन,वॉलनटअॅप,फ्लाईट बेस,सनशॉट टेक्नोलॉजीज् अशा अनेक कंपन्यांनी विस्तार केला असून चांगला निधी जमा केला आहे.याशिवाय आम्ही अनेक लहान कंपन्यांना टिकून राहण्यास आणि वाढण्यास मदत केली आहे.
नर्चर कार्यक्रमाव्यतिरिक्त टीआयई पुणे विद्यार्थी समुदायापर्यंत देखील पोहचत असून त्यांच्यामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी बिजकोशंट हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसाय संकल्पना सादर करून एकमेकांशी स्पर्धा करण्यास प्रोत्साहित करते. गेल्या वर्षी टीआयई युनिव्हर्सिटी प्रोग्राम अंतर्गत शाल्मली कडू (इनरजाईज) या कमिन्स कॉलेजमधील विद्यार्थिनीने सर्वोत्कृष्ट महिला विद्यार्थी पुरस्कार पटकाविला.
टीआयई तर्फे महिला उद्योजकांच्या मदतीसाठी विशेष समर्पित कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते. दरवर्षी, आम्ही महिला उद्योजकांसाठी ग्लोबल कॉन्टेस्टचे आयोजन करतो ज्यामध्ये त्यांना जागतिक व्यावसायिक नेतृत्वाद्वारे मार्गदर्शन,जगभरात नेटवर्किंग याचा फायदा मिळतो आणि विजेत्याला रोख बक्षीस मिळते.या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये पारूल गंजू (अहामियून),अनुया निसल (सेरीगेन मेडिकल प्रॉडक्टस) या अनुक्रमे भारतातील उपविजेत्या आणि विजेत्यांचा समावेश होता.
अजय भागवत हे उद्योजक आणि टीआयई पुणे चे अध्यक्ष अशा अनेक जबाबदार्या पार पाडत असून याआधी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे तयार झालेल्या एमसीसीआयए इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाऊंडेशनच्या उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.ते म्हणाले की, आम्ही येथे जागतिक दर्जाची सामान्य चाचणी सुविधा तयार करण्यात यशस्वी झालो आहोत.याचा वापर किफायतशीर किंमतीत सर्व स्थानिक कंपन्या करत आहेत.
भारत सरकारच्या मेक इन इंडिया धोरणामुळे उत्पादन क्षेत्राला गती मिळत असताना व्यवसाय समुदायाची तंत्रज्ञान क्षेत्रासाठी असलेली पसंती अजूनही कायम आहे. उत्पादन क्षेत्र आणि निगडीत परिसंस्थेला प्रस्थापित होण्यास व वाढण्यास आणि वर्चस्व मिळविण्यास वेळ लागतो. त्यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्या कशा प्रगती करतील हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
अजय भागवत यांना गव्हर्निंग कौन्सिल आणि रश्मी घोष यांच्या नेतृत्वाखाली टीआयई पुणे कार्यालयातील कर्मचार्यांचे उत्तम सहका
र्य लाभले आहे.


