Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाविन्यपूर्णता आणि एर्गोनॉमिक उपायसुविधांसह गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने आरोग्यसेवा क्षेत्रात घडविले परिवर्तन

नाविन्यपूर्णता आणि एर्गोनॉमिक उपायसुविधांसह गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने आरोग्यसेवा क्षेत्रात घडविले परिवर्तन

मुंबई, 06 जानेवारी 2025: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडपैकी एक इंटेरिओला पुढील 3 वर्षांत 15% दराने आपल्या आरोग्यसेवा विभागाच्या वाढीची अपेक्षा आहे. विशेष आणि उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनुकूल बाजार परिस्थितीमुळे ही वाढ अपेक्षित आहे. खाजगी आरोग्यसेवा क्षेत्रात विशेषतः टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली असून खाजगी रुग्णालयांमध्ये विक्रीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. परिणामी, हा विभाग सध्या 10% च्या स्थिर दराने वाढत आहे.

इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि B2B व्यवसाय प्रमुख समीर जोशी म्हणाले, “भारतीय आरोग्यसेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. विस्तारित सेवा, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राकडून होत असलेली गुंतवणुकीत वाढ आणि व्यापक आरोग्य संरक्षणामुळे हे क्षेत्र अधिक विकसित होत आहे. तरीही, उपचाराच्या ठिकाणी रुग्णांची सुरक्षितता आणि आराम याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने सुयोग्य वातावरण, रचना निर्माण करायच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, परिचारकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याची आवश्यकता भासताना विशेषतः आयसीसीयू आणि आयसीयू सारख्या गंभीर वैद्यकीय सेवा विभागात हे विशेष जाणवते. आरोग्यसेवा सुविधा अधिक चांगल्या आणि परिणामकारक बनविण्यासाठी गोदरेजमध्ये आम्ही सतत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. उपचार प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल हे सुनिश्चित करत आम्ही विचारपूर्वक डिझाइन केलेली उत्पादने रुग्ण, परिचारक आणि आरोग्यसंस्था यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत.”

गोदरेजच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये कार्यक्षमता आणि नवकल्पना यांचा समतोल साधत आरोग्यसेवा वितरणाची गुणवत्ता उंचावली जात आहे. खालापूर येथे असलेल्या अत्याधुनिक उत्पादन युनिटमध्ये रुग्णालयातील बेड, तपासणी कोच, मेडिकल लॉकर आणि कपाटे, रुग्णांची हालचाल करण्यासाठीची साधने इत्यादी ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केली जातात. याशिवाय, या केंद्रामध्ये भारतातील आधुनिक आरोग्यसेवा क्षेत्राच्या गरजांसाठी आवश्यक असलेल्या मेडिकल अॅक्सेसरीजचे देखील उत्पादन केले जाते.

इंटेरिओने केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, परिचारक हे उपचार प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अभ्यासानुसार, कार्यक्षेत्राचे नियोजन अपुऱ्या प्रमाणात केलेले असल्यामुळे नर्सेस दिवसभराच्या 8 तासांच्या कामाच्या वेळेत सरासरी 8-10 किमी चालतात. तसेच, 90% हून अधिक नर्सिंग स्टाफला काही ना काही स्नायू-व अस्थिसंबंधी विकार (Musculoskeletal Disorder – MSD) जाणवत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये प्रमुख वेदनाग्रस्त भाग म्हणजे पाय (56%), गुडघे (51%) आणि वरचा व खालचा पाठीचा भाग (51%) असतो. याशिवाय, 61% परिचारकांना अधूनमधून मानेत वेदना जाणवतात. या वेदनांमुळे दोन महिन्यांच्या कालावधीत 41% कर्मचाऱ्यांनी 1-3 दिवस सुट्टी घेतली तर 7% कर्मचाऱ्यांनी 4-6 दिवसांची सुट्टी घेतली. या अभ्यासातून केवळ परिचारिकांच्या आरोग्यस्वास्थ्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे असे नाही, तर त्यामुळे आरोग्यसंस्थांमध्ये उत्पादकतेचे नुकसान होत असल्याचेही स्पष्ट होते.

अॅडव्हान्स्ड लॅटरल टिल्ट बेड हा ब्रँडचे अगदी अलिकडील नाविन्यपूर्ण उत्पादन हे एक क्रांतिकारी उत्पादन असून त्यामध्ये हाय-लो बेड मूव्हमेंट, रुग्णाच्या डोक्याच्या आणि पायांच्या बाजूच्या दिशेतील हालचाल, ट्रेंडलेनबर्ग पोझिशन्स तसेच विशेष बेड लॅटरल हालचाली (लॅटरल टिल्ट) अशा अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय, नेफ्रोलॉजी विभाग, प्रसूती कक्ष आणि आपत्कालीन विभागांसाठी खास संशोधनाधारित उत्पादने विकसित करून गोदरेजने खास आरोग्यसेवा क्षेत्रातील आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments