Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोणतेही कार्य धर्म आचरण म्हणून करावे* *ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप...

कोणतेही कार्य धर्म आचरण म्हणून करावे* *ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप देवधर यांचे मत : ग्राहक पेठ सांस्कृतिक महोत्सवांतर्गत देवधर यांना पुरस्कार प्रदान*

पुणे : कोणतेही कार्य करताना ते धर्माचरण म्हणून करावे. कोरोना काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग आणि रुग्णांना धीर देण्याचे काम मी केले तो भक्तीयोग होता. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिन्हींचा संगम करून काम करणे म्हणजे धर्म आचरण आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप देवधर यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठ सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत डॉ. दिलीप देवधर यांना सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष संध्या भिडे अदानी ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी अनिल सिंग, राजेश शहा आदी उपस्थित होते. यावेळी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवासजी खळे यांच्या गीतांची सुरेल मैफल ‘तो राजहंस एक’ सादर करण्यात आली.

डॉ. दिलीप देवधर म्हणाले, व्यवसाय करताना आनंद मिळत गेला, त्या प्रेरणेतून मी इतकी वर्षे काम करू शकलो. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना टिकवण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे.

विजय फळणीकर म्हणाले, मानसिकता हरवलेले लोक जेव्हा वृद्धाश्रमात येतात तेव्हा लक्षात येते की आपली सहनशक्ती किती असावी लागते. दिलीप देवधर यांच्याकडे पाहून कळते की कोणत्याही परिस्थितीत संयमाचा तोल ढळू न देता निस्वार्थीपणे कसे काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. सूर्यकांत पाठक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विजय मोकाशी यानी आभार मानले, स्वाती लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments