Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेईएस महाविद्यालयांमध्ये युवा जल्लोष....* ------------------------ *स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण...

जेईएस महाविद्यालयांमध्ये युवा जल्लोष….* ———————— *स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव तसेच सर्वांगीण विकासास मदत होते* *- अभिनेते डॉ. राजू पाटोदकर*

*
*जालना ता.10*:-युवा जल्लोष तथा महाविद्यालयीन स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते. अशी स्नेहसंमेलने ही जीवनात मिळालेली ही सुवर्ण संधी आहे, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.
असे प्रतिपादन मराठी नाट्य व सिने अभिनेते डॉ.राजू पाटोदकर यांनी जालनाच्या जेईएस महाविद्यालयाच्या ‘युवा जल्लोष’ महोत्सवात पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले.
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही ‘युवा जल्लोष-२०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महावीर सदावर्ते, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हेमंत वर्मा, युवा जल्लोष कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.गणेश कुलकर्णी, विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष तन्मय अग्निहोत्री, विद्यार्थी प्रतिनिधी कु. तेजस्विनी राऊत आदींची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.पाटोदकर म्हणाले की, आजची पिढी खूप फास्ट असून तुमच्याकडे शिकण्यासारखे खूप काही आहे. तुम्हास योग्य मार्गदर्शन व्हावे व तुमचं करिअर उत्तम व्हावं म्हणून महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनचे आयोजन केले जाते. यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यामधूनच मोठमोठे कलावंत व व्यक्तीमत्व घडत असतात.शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी -शिक्षक दोघे घटक महत्त्वाचे आहेत, नाट्य व सिनेमा हे क्षेत्र शुद्ध असून यामध्ये युवकांनी सहभागी व्हावे , कलावंत म्हणून नावलौकिक कमवावा, असेही श्री पाटोदकर यांनी सांगितले. कला कोणतीही असो त्यामध्ये वाहत जाण्यापेक्षा त्यासाठी वाहून घेतलेले उत्तम असेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी ‘आमदार सौभाग्यवती ‘नाटकाचा किस्सा सांगितला व नाट्य क्षेत्राचा जीवनात कसा फायदा होतो हे रहस्य उपस्थितीना उलगडून सांगितले. जवळपास ३५ वर्षापासून मी या क्षेत्रात कलावंत म्हणून काम करीत असल्याचेही डॉ.पाटोदकरांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष तन्मय अग्निहोत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा पुरवून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, व गुणवत्ता वाढीकरता ,वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही तन्मय अग्निहोत्री यांनी सांगितले.तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री म्हणाले की, मराठवाड्यातील युवकांनी कूस बदललेली असून, देशात सर्व क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे, श्री.राजू पाटोदकर हे सुद्धा मराठवाड्यातले मूळचे आहेत, आज नाट्य व सिने क्षेत्रात मराठवाड्यातील अनेक कलावंत आहेत. जेईएस महाविद्यालयाने सामाजिक, राजकीय ,आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक व्यक्तीना घडवलेले आहे, मराठवाड्यात ज्ञानदान क्षेत्रात जेईएस महाविद्यालय उत्तम कार्य करत असून, यापुढे करत राहील, असे सांगून,महाविद्यालयाचा वार्षिक अहवालाचे त्यांनी वाचन केले. आम्ही अष्टपैलू व आदर्श नागरिक घडवण्याचे काम करत असल्याचेही प्राचार्य डॉ. अग्निहोत्री यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी- विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. यशवंत सोनुने यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवा जल्लोषचे प्रमुख प्रा. डॉ.गणेश कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. खंडागळे यांनी मानले.
..,…….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments