Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedकल्याण ज्वेलर्सतर्फे व्हॅलेंटाइन डे निमित्त मर्यादित काळासाठी खास ऑफर ...

कल्याण ज्वेलर्सतर्फे व्हॅलेंटाइन डे निमित्त मर्यादित काळासाठी खास ऑफर व्हॅलेंटाइन डे कलेक्शन्सवर थेट १० टक्के सवलत, सर्व प्रकारच्या कलेक्शनमधील दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत

राष्ट्रीय ३१ जानेवारी – व्हॅलेंटाइन डे जवळ येत आहे आणि या दिवसाचं सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह दागिने ब्रँडने व्हॅलेंटाइन डे कलेक्शन्सवर १० टक्के सवलतीची मर्यादित काळाची ऑफर जाहीर केली आहे. त्याशिवाय ९ फेब्रुवारीपर्यंत सर्व उत्पादनांवर ५० टक्के सवलत मिळणार आहे.

मर्यादित काळाची ही ऑफर जाहीर करत कल्याण ज्वेलर्सची ग्राहक अनुभव उंचावण्याची आणि प्रेम व शुभ भेटवस्तू देण्याच्या भारतीय परंपरेप्रती असलेली बांधिलकी दिसून आली आहे. दागिन्यांच्या या मोठ्या कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या डिझाइन्सचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे प्रत्येक खरेदी सौंदर्य व दर्जाचे प्रतीक असते.

व्हॅलेंटाइनसाठी कल्याण ज्वेलर्सचे पोल्की आणि नैसर्गिक हिऱ्यांचे कलेक्शन खास पाहाण्यासारखे आहेत. पारंपरिक भारतीय कलेतून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेले हे पोल्की कलेक्शन्स अनकट हिऱ्यांचं सौंदर्य दर्शवणारे आहेत. राजेशाही नेकलेसपासून आकर्षक कानातल्यांपर्यंत हे स्टेटमेंट पीसेस वारसा आणि आधुनिक स्टाइल यांचा मेळ घालणारे आहेत. नैसर्गिक हिरे अनादी अनंत प्रेमाचे प्रतीक आहेत. एखाद्या खास व्यक्तीला भेट द्यायची असो किंवा स्वतःसाठी खरेदी करायचं असो, पोल्की आणि नैसर्गिक हिऱ्यांपासून बनवलेल्या दागिन्यांची श्रेणी अभिजात आणि सुसंस्कृतपणा दर्शवणारी आहे.

प्रेमाचा हा सीझन कल्याण ज्वेलर्ससह साजरा करा आणि तुमच्या भावना व्यक्त करणारा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करा.

उत्पादन

वर्णन

A close up of a necklace and earrings

Description automatically generated

या आकर्षक सेटने तुमची स्टाइल आणखी उंचावेल. यामध्ये नाजूक रोज गोल्ड नेकलेस, मॅचिंग इयररिंग्ज, रिंगचा समावेश असून त्यावर चमकदार हिरे आणि रूबी जडवलेले आहेत. याचं टियरड्रॉप आकाराचं पेंडंट रूबीनं सजवण्यात आलं आहे. नेकलेस अभिजातता दर्शवणारं असून रिंगमध्ये सोलेटेयर हिरा व त्याभोवती रूबीज आहेत. हा सेट सुसंस्कृततेचा आदर्श असून कोणत्याही समारंभासाठी शोभून दिसेल.

A close up of a necklace and earrings

Description automatically generated

हा लक्झरी सेट कोणाचंही लक्ष वेधून घेणारा आहे. सोन्याचे नेकलेस, इयररिंग्जवर रॉयल ब्लू एनॅमलने सजावट करण्यात आली असून ती मध्यभागी असलेल्या हिऱ्याची शोभा वाढवणारी आहे. गोलाकार पेंडंट आणि इयररिंग्ज बोल्ड तरीही आकर्षक कारागिरीने सजवण्यात आलेले आहे, तर मॅचिंग रिंगमध्ये ब्लू एनॅमलमध्ये जडवण्यात आलेला हिरा राजेशाही लूक देणारा आहे. आयुष्यातले खास क्षण साजरे करण्यासाठी, तुमचे रूप खुलवण्यासाठी हा सेट योग्य आहे.

A close up of a necklace and earrings

Description automatically generated

हा सेट सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असून त्यात सोनं आणि लाल रंगाच्या एनॅमलचा मेळ घालण्यात आला आहे. याचे गोलाकार पेंडंट आणि इयररिंग्ज, मध्यभागी असलेला हिरा व आकर्षक लाल हालोने सजवण्यात आला आहे. यातली रिंग मध्यभागी ठळक हिरा आणि लाल एनॅमलच्या फ्रेममध्ये तयार करण्यात आली असून ती आधुनिकतेचं प्रतीक आहे. दिवस असो किंवा रात्र हा सेट तुमच्या स्टाइलला रंगाची झळाळी देईल.

A close up of a necklace and earrings

Description automatically generated

अनोख्या डिझाइनच्या या सेटला आकर्षक हिरवट निळ्या रंगाच्या एनॅमलची जोड देण्यात आली आहे. चौकोनी आकाराचे हे पेंडंट आणि कानातले मोत्यांनी बनवलेले असून तुमचा लूक आणखी उठावदार करेल. मॅचिंग रिंग आणि मोती, व टरक्वाइज रंगाचे कोंदण त्याला अनोखा चार्म देणारे आहे. अभिजातता आणि स्वतंत्र ओळख यांचा मेळ घालणारा हा सेट आहे.

A gold necklace and earrings

Description automatically generated

या उठावदार सेटसह राजेशाहीपणाचा अनुभव घ्या. सोनं आणि रॉयल ब्लू एनॅमलचा मेळ त्यात घालण्यात आला आहे. त्रिकोणी पेंडंट आणि इयररिंग्ज, त्यात मध्यभागी असलेला हिरा कोणाचंही लक्ष वेधून घेईल. हा सेट त्यातील आकर्षक निळ्या रंगात फ्रेम करण्यात आलेल्या हिऱ्याच्या अंगठीमुळे परिपूर्ण झाला आहे. संध्याकाळचा एखादा कार्यक्रम किंवा खास प्रसंगी हा सेट शोभून दिसेल.

अधिक माहिती व ऑफर्ससाठी भेट द्या https://www.kalyanjewellers.net/

T&C Apply*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments