Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

पुणे, दि. 11 : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, सोशल मिडिया, ई-मेल व क्लाउड या सेवांच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्ह्यांचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार निरनिराळे मार्ग शोधात आहेत. फिशिंग, डाटा चोरी, बँकिंग फ्रौड, सोशल मिडिया अकाऊंट हॅकींग, सायबर बुलीयिंग, सेक्सॉर्टेशन यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सायबर सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिवस (Safer Internet Day) साजरा केला जातो. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

NIC च्या वतीने जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्रीमती अश्विनी करमरकर आपल्या मनोगतात म्हणाल्या, भारत सरकार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (www.cybercrime.gov.in), इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि स्टे सेफ ऑनलाईन (www.staysafeonline.in) यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना मदत केली जाते. सायबर गुन्हे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे साधन बनले आहेत. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. शासन व कायदा अंमलबजावणी यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांनी ही सतर्क राहून ह्या गुन्ह्यांना आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेस विविध शाखांचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments