राष्ट्रीय, ११ फेब्रुवारी: सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने मेटा भारतात इन्स्टाग्राम टीन अकाऊंट्सचा टप्प्याटप्प्याने विस्तार करून तरूण वापरकर्त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करत आहे. टीन अकाऊंट्सची रचना किशोरवयीन मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि वयासाठी सुयोग्य स्थान बनवण्यासाठी करण्यात आली आहे. अंतर्गत संरक्षणांसह टीन अकाऊंट्समधून अनावश्यक संवाद मर्यादित केला जाईल, गोपनीयता सेटिंग्स सुधारित केल्या जातील आणि पालकांकडे अधिक नियंत्रण दिले जाईल. त्यामुळे आमच्या तरूण वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित सोशल मीडिया अनुभव मिळू शकेल.
डिजिटल संवाद तरूण मनांना आकार देत असल्याच्या काळात त्यांची ऑनलाइन सुरक्षा राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पालक, शिक्षक आणि धोरणकर्ते यांनीही सायबर धमक्या, धोकादायक साहित्याशी संपर्क आणि गोपनीयतेच्या धोक्यांसंबधी अनेक वेळा आवाज उठवला आहे. इन्स्टाग्रामचे हे नवीन टीन अकाऊंट्स या समस्यांवर उपाय काढताना १६ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना सर्वाधिक सुरक्षा सेटिंग्समध्ये ठेवतात आणि मेसेजिंग, संवाद तसेच कंटेंटशी संपर्कावर प्रतिबंध आणतात. त्याचबरोबर त्यांना डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरण्यासाठी अधिक चांगली साधनेही देतात.
भारतात टीन अकाऊंट्सचा विस्तार करण्याबाबत इन्स्टाग्रामच्या पब्लिक पॉलिसी इंडियाच्या संचालक नताशा जोग म्हणाल्या की, “मेटामध्ये अधिक सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल पर्यावरण निर्माण करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. भारतात इन्स्टाग्राम टीन अकाऊंट्सचा विस्तार करून आम्ही संरक्षण अधिक मजबूत करत आहोत, कंटेंट कंट्रोल वाढवून पालकांना सक्षम करत आहोत आणि त्याचबरोबर किशोरवयीन तरूणांसाठी सुरक्षित अनुभवाची हमी देत आहोत.”
किड्सस्टॉपप्रेस.कॉमच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी झवेरी म्हणाल्या की, “किशोरवयीन मुलांची ऑनलाइन सुरक्षा हा पालकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे आणि इन्स्टाग्रामचे नवीन टीन्स अकाऊंट्स वैशिष्ट्य योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. गोपनीयता सेटिंग्सचे मजबूतीकरण, नको असलेले संवाद मर्यादित करणे आणि पालकांसाठी सुपरविजन टूल्स दिल्यामुळे तरूण वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण निर्माण होऊ शकते. किडस्टॉपर्समध्ये आम्ही पालकांना माहितीपूर्ण राहण्यासाठी तसेच आपल्या किशोरवयीन मुलांसोबत जबाबदार सोशल मीडिया वापराबाबत संवाद साधण्यासाठी मदत करत आहोत.”
प्रमुख वैशिष्टे:
● गोपनीय अकाऊंट्स: टीन अकाऊंट्स प्रामुख्याने प्रायव्हेट असतील. म्हणजेच त्यांनी नवीन फॉलोअर्सना मंजूर केले पाहिजे. फॉलोअर्स नसलेल्या व्यक्ती त्यांचे साहित्य पाहू शकणार किंवा त्यांच्याशी संवाद साधू शकणार नाहीत. हे १६ वर्षे वयाखालील (विद्यमान आणि नवीन) व्यक्तींना आणि साइन अप करताना १८ वर्षांखालील व्यक्तींना लागू होईल.
● मेसेजिंगचे निर्बंध: किशोरवयीन मुलांसाठी सर्वांत कठोर मेसेजिंग सेटिंग्स असतील. त्यांना ते फॉलो करत असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या व्यक्तींकडूनच संदेश येऊ शकतील.
● संवेदनशील कंटेंट नियंत्रण: किशोरवयीन तरूणांच्या सेटिंग्स कठोर असतील. त्यामुळे संवेदनशील साहित्यांपर्यंत त्यांची पोहोच मर्यादित केली जाईल (limiting their exposure to sensitive content). जसे एक्स्प्लोर आणि रील्ससारख्या भागांमध्ये हाणामारी किंवा कॉस्मेटिक प्रक्रियांचा प्रचार मर्यादित केला जाईल.
● मर्यादित संवाद: किशोरवयीन मुलांना ते फॉलो करत असलेल्या व्यक्तीच टॅग किंवा मेन्शन करू शकतात. त्याशिवाय, हिडन वर्ड्स (Hidden Words) नावाच्या अँटी बुलिंग वैशिष्ट्याची सर्वांत कठोर आवृत्ती कमेंट्स आणि डीएम विनंत्यांमधील अवमानास्पद भाषा फिल्टर करण्यासाठी कार्यान्वित केले जाईल.
● टाइम लिमिट रिमाइंडर्स: किशोरवयीन मुलांना रोजच्या ६० मिनिटांच्या वापरानंतर एपमधून बाहेर पडण्यास सूचना देणारे नोटिफिकेशन्स येतील.
● स्लीप मोड: स्लीप मोड रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत कार्यान्वित केला जाईल. त्यामुळे नोटिफिकेशन्स म्यूट करून डीएम्सना रात्रभरात ऑटोमॅटिक उत्तरे दिली जातील.
पालकांसाठी टीन अकाऊंट्समधून सुपरव्हिजन टूल्स दिले जातील. त्यामुळे त्यांना आपल्या किशोरवयीन मुलाच्या अनुभवावर लक्ष ठेवून त्याचे व्यवस्थापन करता येईल. त्यात सुरक्षा सेटिंग्समध्ये बदलांना मंजुरी देणे आणि रोजच्या स्क्रीन टाइम मर्यादा निश्चित करणे यांचा समावेश असेल. १६ वर्षांखालील मुलांसाठी सेटिंग्स शिथिल करण्यासाठी पालकांच्या मंजुरीची गरज पडेल. पालक थोड्या मोठ्या मुलांसाठी (१६+) कोणत्याही वेळी सुपरव्हिजन सुरू करून त्यांना आपल्या मुलांच्या सुरक्षा सेटिंग्स पाहून मंजूर करणे शक्य होईल. पालकांना लवकरच अधिक मजबूत संरक्षण देण्यासाठी या सेटिंग्स थेट बदलण्याची ताकद मिळेल.
टीन अकाऊंट्स ऑटोमॅटिक सेफगार्ड्ससह येतात. परंतु अतिरिक्त नियंत्रण हवे असलेल्या पालकांना नवीन सुपरव्हिजन वैशिष्ट्यांचा अनुभव घेता येईल. जसे:
● अलीकडील संवादांवर लक्ष ठेवणे– मागील सात दिवसांत आपल्या मुलांना मेसेज पाठवणाऱ्या लोकांची यादी पाहू शकतात (मेजेस न वाचता.)
● रोजच्या कालमर्यादा निश्चित करणे– पालकांनी निश्चित केलेली कालमर्यादा संपल्यावर किशोरवयीन मुलांना इन्स्टाग्राम पाहता येणार नाही.
● विशिष्ट कालावधीत इन्स्टाग्राम ब्लॉक करणे– पालक एकाच टॉगलद्वारे रात्री किंवा निश्चित वेळी इन्स्टाग्राम पोहोच प्रतिबंधित करू शकतात.
रती फाऊंडेशनच्या सहसंस्थापक आणि संचालक उमा सुब्रमणियन म्हणाल्या की, “इन्स्टाग्रामच्या टीन अकाऊंट्समध्ये अलीकडेच झालेल्या बदलांमुळे मेटा प्लॅटफॉर्म्सना अतिरिक्त सुरक्षा मिळाली असून ते ऑनलाइन सुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. किशोरवयीन मुलांचे स्वातंत्र्य तसेच ऑनलाइन सुरक्षा अबाधित ठेवणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे आणि हा उपक्रम त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. प्रभावी अंमलबजावणी आणि दूरदर्शी दृष्टीकोनातून या अपडेट्समध्ये किशोरवयीन तरूणांच्या ऑनलाइन सुरक्षेत अर्थपूर्ण सुधारणा आणण्याची क्षमता आहे.”
किशोरवयीन मुलांना योग्य ते संरक्षण मिळेल आणि वयाची मर्यादा उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी इन्स्टाग्राम वय निश्चित करण्याच्या उपाययोजना मजबूत करत आहे (strengthening age verification). लहान मुले आपले खोटे वय देऊ शकतात. त्यामुळे प्रौढ व्यक्तीची जन्मतारीख देऊन खाते तयार करत असेल तर अशा विशिष्ट परिस्थितीत अतिरिक्त पडताळणी करणे गरजेचे ठरेल. त्यामुळे सर्व किशोरवयीन मुले योग्य त्या सुरक्षा सेटिंग्समध्ये (safety settings) असतील याची काळजी घेतली जाईल.
वयाची पडताळणी करण्याबरोबरच इन्स्टाग्राम कंटेंट प्रोटेक्शन्सही विस्तारित करत आहे. त्यामुळे लहान मुलांना फक्त वयासाठी योग्य ते साहित्य पाहता येईल, याची काळजी घेतली जाईल. मेटा कम्युनिटी मार्गदर्शक तत्वांचे (Community Guidelines) उल्लंघन करणाऱ्या साहित्यावर कारवाई करतच राहील आणि संवेदनशील साहित्य नियंत्रणे अत्यंत कठोर पातळीवर ठेवली जातील. याचाच अर्थ असा की, किशोरवयीन तरूणांना लैंगिकदृष्ट्या सूचक साहित्य किंवा स्वतःला इजा करण्याबाबतच्या चर्चांपासून मर्यादित पोहोच मिळेल. ते फॉलो करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ते शेअर केले तरी आपोआप लपवले जाईल.
मेटाबाबत:
लोकांना कनेक्ट होणे, कम्युनिटी शोधणे आणि उद्योग वाढवणे यासाठी मदत करणारे तंत्रज्ञान मेटा तयार करते. फेसबुक २००४ मध्ये आले तेव्हा त्याने लोकांची कनेक्ट होण्याची पद्धत बदलली. मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सएपसारख्या एप्सनी जगभरातील लाखो लोकांना सक्षम केले. आता मेटा ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअल्टीसारख्या २डी स्क्रीन्सच्या पलीकडे जात आहे. त्यामुळे सामाजिक तंत्रज्ञानात पुढील उत्क्रांती होण्यास मदत होईल.


