Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedआगामी उत्सव कालावधीत 15 दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास...

आगामी उत्सव कालावधीत 15 दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील

पुणे, दि. 12 : जिल्ह्यासाठी सन 2025 मधील केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 20147 च्या नियम 5 उपनियम (3) अन्वये खालील प्रमाणे 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

शिवजयंती बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार दि. 14 एप्रिल, महराष्ट्र दिन गुरवार दि. 1 मे, गणपती उत्सव, ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशीपर्यंत सोमवार दि 1 ते शनिवार दि. 6 सप्टेंबर पर्यंत 6 दिवस, नवरात्री उत्सव दि. 1 व 2 ऑॅक्टोबर 2 दिवस, ख्रिसमस गुरुवार दि. 25 डिसेंबर व वर्षाअखेर बुधवार दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत. तसेच महत्वाचे कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार 2 दिवस परवानगी दिली जाईल, असे आदेशात नमुद आहे.

वरील नमुद उत्सवाच्या दिवशी सकाळी 6 वा. पासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील करुन पुढील अटींवर परवानगी देण्यात येईल. ध्वनी प्रदुषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम (3) अनुपालन करण्यात यावे. झोनींगप्रमाणे ठरलेल्या मयादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागु नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांची राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments