Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनांदेड सिटी तील एक आगळा वेगळा संकल्प प्रवास

नांदेड सिटी तील एक आगळा वेगळा संकल्प प्रवास

🚩🚩🚩 ** : दि १० फेब्रुवारी रोजी *आळंदी ते देहू*
*आजि सोनियाचा दिनु*
*वर्षे अमृताचा घनु*
ईश्वरकृपेने गेल्या वर्षी *श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखित सेवा संपूर्ण झाली*,ज्ञानेश्वरीच्या ९००० ओव्या , श्रीमद् भगवद् गीतेचे ७०० श्लोक *असं सारं लिखाण … आनंद धेत, माझ्या गतीनं जवळजवळ सव्वा वर्ष लागलं. नंतर गीते च्या अध्यायांना साजेशी भगवंतांची चित्रे लावून वही सजली!* खूप सात्विक आनंद लाभला ! *मनात एक विचार आला की या हस्तलिखित ग्रंथाला, आळंदीला जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचा चरण स्पर्श व्हावा , आपल्यालाही दर्शनाचा लाभ व्हावा*. या सर्वातून प्रेरणा घेऊन या दरम्यान माझी जवळची सखी सौ मुग्धा ( मीरा ) सतीश पाटील हिनेही संकल्प केला आणि *अक्षरशः दीड महिन्यात कॅनडा मध्ये असताना ज्ञानेश्वरी हस्तलिखित पूर्ण केलं* . आळंदीला एकत्र जाण्याची ओढ होती !
माउलींची ममता, कृपा अगाध आहे – याची वारंवार प्रचीती येत राहिली. *नांदेड सिटीतील मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव मिळाला*. येथील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश काका गोरे यांच्या योजनेमुळे, प पू गोविंद देवगिरी महाराज यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांचा लिखित आशीर्वाद व प्रसादरूप माळा आधीच प्राप्त झाला होता. पावसच्या स्वरूपानंदाचे साधक
श्री सुधाकर गाडे काकांच्या प्रयत्नांनी *नांदेड सिटीत अभंगज्ञानेश्वरी सप्ताह संपन्न झाला*. त्यावेळी *प पू मकरंदनाथ महाराजांचा आशीर्वाद* प्राप्त झाला. त्यांनीही ज्ञानेश्वरी हस्तलिखित पाहून शुभाशीर्वाद दिले.
आता *ओढ लागली होती आळंदीची…*
पुनःश्च, गोरे काकांनी नियोजन केले आणि आळंदी यात्रा ठरली… एकटे-दुकटे नाही . तर नांदेड सिटी तील आमच्या *‘भजनामृत’ भजनी मंडळाची* भजनसेवाही माउली चरणी अर्पण करण्यासाठी आणि ग्रंथपूजा करण्यासाठी ही सेवा दि १० फेबुवारीला मिळाली
*आळंदीला जाण्यासाठी
एक मोठी बस ठरवून आम्ही ३४ जण *नांदेड सिटी सेवा प्रमुख श्री मिलींद दीक्षित* यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी यात्रेला निघालो. *श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखित ग्रंथ घेऊन!*

*आळंदीत पोहोचण्या आधी चरोली रोडवरील गजानन महाराज मंदिरात जावून सर्वांनी दर्शन घेतले त्यानंतर आळंदी येथील नरसिंह सरस्वती स्वामी मंदिरात*.
येथील दर्शन घेऊन , आम्ही *आळंदी मध्ये श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात पोहोचलो*. माउलींच्या सम्मुख असलेल्या कारंजा सभामंडपात भजन- कीर्तन सेवा देण्यासाठी *सुसज्ज मंच आहे , माइक ची व्यवस्था आहे आणि सुमारे ३०-४० मंडळी बसतील असा हॅाल आहे*. आमच्या सोबत *श्री मंगेश भागवत यांनी लिहिलेली, तसेच श्री शिरीश जोशी यांच्या पत्नीने लिहिलेली ज्ञानेश्वरी होती शिवाय सौ आशाताई प्रकाश गोरे यांनी लिहिलेली हस्तलिखित भगवद् गीताही होती या ग्रंथाच्या साक्षीने माउलींच्या चरणी आमच्या भजनामृत मंडळाच्या सदस्यांनी सुमधुर अशी भजने गाऊन सेवा अर्पण केली*
भजन सेवा झाल्यावर आम्ही तिथेच *ग्रंथदिंडी काढली*. *हस्तलिखिते डोईवर घेऊन मार्गस्थ झालो* …. आणि तो क्षण आला ! *माउलींच्या समाधी चरणी ग्रंथ ठेवले. फुले अर्पण करून पूजन , वंदन, चिंतन केले. पेढ्यांचा नैवेद्य झाला. सारं वातावरण भारल्या सारखे ! अतिशय आनंदित, प्रमुदित होऊन बाहेर* आलो.
आजचा हा सात्विक आनंदाचा प्रवास अजून पुढे व्हायचा होता . पुढचा थांबा होता, *प पू गोविंददेवगिरी* *महाराजांच्या आळंदी – चरोली रोडवरील वैदिक निवासी, छात्र गुरुकुल – महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे ‘वेदश्री तपोवन’* येथे. निसर्गसुंदर नटलेल्या शांत व रम्य अशा टेकडीवर वसलेलं हे *भारतीय वेदशास्त्र ज्ञान देणारं गुरुकुल*. शिस्त, स्वच्छता आणि भव्यता पाहून भारून गेलो. .*येथील शिक्षण पूर्णपणे भारतीय वेषात, भारतीय बैठकीत दिले जाते. प्रचंड दुर्मिळ ग्रंथ संपदेने भरलेले शिस्तबद्ध ग्रंथ संग्रहालय पाहून अभिमान वाटला* , उर भरून आला !
येथे *दर्शन झाले ती मोठी आणि चित्रबद्ध भगवद् गीता, पुस्तकांच्या* *पानांना सोनेरी कडा*!
*याशिवाय आधुनिक डिजिटल रूपात गीता आणि वाचणारं पेन! ते पेन ज्या श्लोकाच्या ओळीवर ठेवावे, ती ओळ सुरात वाचली जाते*.
येथील परिसरात बगीचा, बसण्यासाठी ची व्यवस्था शांत वातावरणाचा आनंद व पाहुणचार घेवून परत फिरताना पाहिले- *मोठ्या प्रांगणात शिखा धारी, धोतर- उत्तरीय घालून गुरुकुल चे बटु विद्यार्थी हे बॅडमिंटन, क्रिकेट खेळत होती, कोणी जोर बैठका काढीत होते तर कोणी लागोपाठ सूर्य नमस्कार घालीत होते. हे सर्व पाहून आनंदही झाला आणि भारतीय संस्कृतीचा अभिमानही वाटला*.
इथून निघालो….. *ग्यानबा- तुकारामचा गजर करीत आणि पोहचलो देहूच्या मंदिरात , संत श्री तुकाराम मंदिरात विठ्ठल- रखुमाई दर्शन घेतलं. चेतन हिंगे या मुर्ति काराने बनवलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले*.
दिवसभर संत- सज्जन दर्शनाचा सोहळा झाला. अतिशय समाधानी चित्ताने आम्ही नांदेड सिटीत घरी परतलो.
*माउली किती प्रेमळ आहे, किती दयाळू आहे याचा पुनःप्रत्यय आला. सुंदर दर्शन देऊन माउलींनी सर्वांना तृप्त केलं !* 🙏 म्हणूनच म्हणावंसं वाटलं….
*आजि सोनियाचा दिनु*
*वर्षे अमृताचा घनु*
*वृत्त संकलन* : सौ अर्चना अशोक कौलगुड नांदेड सिटी
*M 9850574511*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments