Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात सर्वात किफायतशीर ५जी स्‍मार्टफोन 'गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी' लाँच

सॅमसंगकडून भारतात सर्वात किफायतशीर ५जी स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी’ लाँच

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी १२, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात सर्वात किफायतशीर ५जी स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी’च्‍या लाँचची घोषणा केली. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी उच्‍च कार्यक्षमता व स्‍टाइलच्‍या परिपूर्ण एकत्रिकरणासह ५जी सेगमेंटमध्‍ये क्रांती घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी किफायतशीर दरामध्‍ये परिपूर्ण ५जी अनुभव देईल, ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ५जी तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल आणि देशभरात ५जी अवलंबतेला गती मिळेल. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समधील १२ ५जी बॅण्‍ड्स आहेत.

”आम्‍हाला आमच्‍या सर्वात किफायतशीर ५जी स्‍मार्टफोनची घोषणा करताना आनंद होत आहे, जो सर्वांसाठी नेक्‍स्‍ट-जरेशन कनेक्‍टीव्‍हीटी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी च्‍या लाँचमधून डिजिटल तफावत दूर करण्‍यासोबत लाखो ग्राहकांना परिपूर्ण ५जी अनुभव, उच्‍च दर्जाची कार्यक्षमता व नवीन स्‍टायलिश डिझाइनसह सक्षम करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या नवीन स्‍मार्टफोनची सुरूवातीची किंमत ९४९९ रूपये आहे. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी सह आम्‍ही स्‍मार्टफोनसोबत प्रत्‍येक भारतीयासाठी नवीन क्षमता देखील लाँच करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे जनरल मॅनेजर अक्षय एस. राव म्‍हणाले.

फुल ५जी अनुभव

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी अद्वितीय कनेक्‍टीव्‍हीटी देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समधील १२ ५जी बॅण्‍ड्स आहेत. या स्‍मार्टफोनमध्‍ये त्‍वरित डाऊनलोड आणि अपलोड स्‍पीड्ससाठी कॅरियर अॅग्रीगेशन आहे. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी सहज लाइव्‍ह स्‍ट्रीमिंग आणि व्हिडिओ कॉलिंग अनुभव देखील देतो.

नवीन डिझाइन आणि डिस्‍प्‍ले

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये ‘रिपल ग्‍लो’ फिनिश आहे, जेथे प्रत्‍येक हालचालीमधून आकर्षकता व अत्‍याधुनिकता दिसून येते. ८०० नीट्स ब्राइटनेससह ६.७ इंच मोठे एचडी+ डिस्‍प्‍ले असलेला गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी ग्राहकांना आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि उत्‍साहपूर्ण व्‍युइंग अनुभव देतो. या स्‍मार्टफोनची जाडी ८ मिमी असून वजन फक्‍त १९१ ग्रॅम आहे, ज्‍यामुळे वापरासाठी अत्‍यंत एर्गोनॉमिक आहे. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी दोन आकर्षक व अद्भुत रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल – बहामा ब्‍ल्‍यू आणि लिट व्‍हायोलेट.

कॅमेरा

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये आकर्षक नवीन कॅमेरा डेको आहे. हाय-रिझॉल्‍यूशन ५० मेगापिक्‍सल वाइड-अँगल लेन्‍ससह एफ१.८ अर्पेचर आकर्षक, सुस्‍पष्‍टपणे फोटो कॅप्‍चर करते, तर २ मेगापिक्‍सल डेप्‍थ-सेन्सिंग कॅमेरा अधिक सुस्‍पष्‍टतेसह फोटो कॅप्‍चर करतो. ८ मेगापिक्‍सल कॅमेरा आकर्षकपणे व सुस्‍पष्‍टपणे सेल्‍फीज कॅप्‍चर करतो.

मल्‍टीटास्किंग आणि गेमिंग

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये मीडियाटैक डी६३०० ची शक्‍ती आहे, जे जवळपास ४१६के अंतूतू स्‍कोअर असलेले सेगमेंटमधील सर्वोत्तम प्रोसेसर आहे. यामुळे हा गतीशील व ऊर्जा कार्यक्षम स्‍मार्टफोन आहे, जो सहजपणे मल्‍टी-टास्किंगची सुविधा देतो. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी हाय-स्‍पीड कनेक्‍टीव्‍हीटी, तसेच उच्‍च दर्जाचे ऑडिओ व व्हिज्‍युअल्‍ससह सुलभ मोबाइल गेमिंग अनुभव देतो.

बॅटरी आणि फास्‍ट चार्जिंग

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग आणि मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद देते. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी युजर्सना विनासायास कनेक्‍टेड, मनोरंजनपूर्ण आणि उत्‍पादनक्षम ठेवतो. गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये सेगमेंट-लीडिंग २५ वॅट फास्‍ट चार्जिंग आहे, ज्‍यामुळे स्‍मार्टफोन कमी वेळेत लवकर चार्ज होतो.

गॅलॅक्‍सी फाऊंडेशन

सॅमसंग गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये ओएस अपग्रेड्सचे बेस्‍ट-इन-सेगमेंट ४ जनरेशन्‍स आणि ४ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स देत ग्राहक समाधानाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे, ज्‍यामधून युजर्स आगामी वर्षांमध्‍ये आधुनिक वैशिष्‍ट्ये व सुधारित सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री मिळते.

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य ‘सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट’ असेल. हार्डवेअर-आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर अॅटॅक्‍सविरोधात सर्वसमावेशक संरक्षण देते. तसेच, गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह ग्राहक अनुभवामध्‍ये क्रांती घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे, जसे वॉईस फोकस, जे कॉलिंगदरम्‍यान सुस्‍पष्‍ट आवाज ऐकू येण्‍यासाठी आसपासचा आवाज कमी करते आणि क्विक शेअर वैशिष्‍ट्य, जे युजर्सना ते दूर असले तरी लॅपटॉप व टॅब अशा इतर कोणत्‍याही डिवाईससोबत फाईल्‍स, फोटो व डॉक्‍यूमेंट्स त्‍वरित शेअर करण्‍याची सुविधा देते.

उत्‍पादन

व्‍हेरिएण्‍ट

सुरूवातीची किंमत

ऑफर्स

गॅलॅक्‍सी एफ०६ ५जी

४ जीबी + १२८ जीबी

९४९९ रूपये

*५०० रूपयांची बँक कॅशबॅक ऑफर

६ जीबी + १२८ जीबी

१०९९९ रूपये

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments