पुणे, फेब्रुवारी ११, २०२५ – पुण्यातील लोकप्रिय लाइफस्टाइल डेस्टिनेशन कोपा मॉल या व्हॅलेंटाइन वीकेंडला तुमच्या लाडक्या व्यक्तीसह गॉरमे वाइन फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे. या इव्हेंटमध्ये नवे आणि प्रस्थापित वाइन ब्रँड्स सहभागी होत असून त्यात ग्रोव्हर झाम्पा, व्हर्जिन हिल्स, युनिवाइन व्हिंटर्स, मूनशाईन, रिदम आणि पॅलाडिन बाय मॉर्गन बेव्हरेजेस यांचा समावेश आहे. वाइन्सबरोबरच उपस्थितांना वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिसनल चीजचा त्यांच्या आवडत्या बॉटलसह आस्वाद घेता येणार आहे. त्याशिवाय वाइनबरोबर चवदार लागणाऱ्या विविध गॉरमे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही इथे असतील.
वाइन फेस्टला भेट देणाऱ्यांना वाइनचे भरपूर प्रकार आजमावता येतील आणि या फेस्टिवलची सिग्नेचर सांग्रियाचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर मजेदार आणि संवादी उपक्रमांमध्ये भाग घेता येईल. या फेस्टिवलमध्ये वाइन तज्ज्ञांद्वारे ग्रेप स्टॉम्पिंग स्पर्धा आणि वाइन अप्रिसिएशन सेशन घेतले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये पाहुण्यांना वाइन बनवण्याची प्रक्रिया अनुभवता येईल, शिवाय सर्वोत्तम वाइन्सची चव घेता येईल.
या फेस्टिवलमध्ये जॅझ आणि अकॉस्टिक बँड्स सहभागी होऊन परफेक्ट मूड बनवतील. फेस्टिवलमध्ये घालवलेला वेळ प्रत्येकासाठी अविस्मरणीय असेल. हा फेस्टिवल पेट फ्रेंडली असल्यामुळे प्रत्येकालाच त्यात सहभागी होता येईल.
तेव्हा तुम्ही गॉरमे पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असाल, नव्या वाइन्स चाखायच्या असतील, किंवा प्रियजनांरोबर एका वेगळ्या वातावरणाची अनुभूती घ्यायची असेल, हा व्हॅलेंटाइन वीकेंड कोपा मॉलमध्ये अविस्मरणीय ठरेल.
ठिकाण: टेरेस कोपा मॉल
तारीख: शनीवार आणि रविवार, १५- १६ फेब्रुवारी
वेळ: दुपारी ४ ते रात्री १०


