पुणे, १८फेब्रुवारी,२०२५: सॅनी इंडिया या बांधकाम उपकरणाच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने ओम हायड्रॉलिक्ससोबत सहयोगाने नाविन्यता, कार्यक्षमता आणि ग्राहक सहभागाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. सॅनी इंडियाने नवीन एसवाय८० प्रो एक्सकॅव्हेटर लाँच करण्यासाठी व्यापक रोडशो आणि ग्राहक संमेलन यशस्वीरित्या राबवले आहे. ९०० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत प्रवास केलेल्या या रोडशोला पुण्यापासून सुरूवात झाली आणि सातारा, कराड, सांगली, सोलापूर, बीड व संभाजीनगर अशा प्रमुख औद्योगिक व बांधकाम हब्सपर्यंत प्रवास केला.
या उपक्रमाने उद्योग व्यावसायिकांमध्ये मोठी रूची निर्माण केली, तसेच अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले. संभाजीनगरमध्ये या प्रवासाची सांगता झाली, जेथे विशेष ग्राहक संमेलनासोबत लाइव्ह प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
एसवाय८० प्रो सिरीज उच्च दर्जाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि विविध बांधकाम व पायाभूत सुविधा आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या रोडशोच्या माध्यमातून सॅनी इंडियाने ग्राहकांना मशिनच्या प्रगत वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला, ज्यामुळे कार्यक्षमता व विश्वसनीयतेमधील कंपनीचे उद्योग-अग्रणी स्थान अधिक दृढ झाले.
यशस्वी रोडशोबाबत मत व्यक्त करत सॅनी इंडियाच्या एक्सकॅव्हेटर बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. शशांक पांडे म्हणाले, “एसवाय८० प्रोमधून अत्याधुनिक सोल्यूशन्स देण्याप्रती सॅनी इंडियाची समर्पितता दिसून येते, जी उत्पादकता आणि कार्यरत कार्यक्षमता वाढवतात. हा रोडशो नाविन्यतेप्रती आमची कटिबद्धता दाखवण्यामध्ये साह्यभूत ठरला, तसेच प्रत्यक्ष आमच्या बहुमूल्य ग्राहकांशी संलग्न झाला आणि त्यांना विविध प्रदेशांमध्ये मशिनच्या क्षमतांचा अनुभव दिला.”
सॅनी इंडिया नाविन्यपूर्ण उत्पादन ऑफरिंग्ज आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील बाजारपेठेमधील आपले फूटप्रिंट वाढवत आहे. एसवाय८० प्रो रोडशोच्या यशस्वी अंमलबजावणीमधून व्यवसायांना उद्योग गरजांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणासह सक्षम करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
================================================================================================
सॅनी इंडियाकडून पुण्यामध्ये व्यापक रोडशो आणि ग्राहक संमेलनासह एसवाय८० प्रो सिरीजचे अनावरण
RELATED ARTICLES


