Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedरिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार*

रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार*

पुणे, दि. 18 – भारतीय रिझर्व बँकेचे संचालक आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार उद्या (बुधवार, 19 फेब्रुवारी) रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, इफकोचे कार्यकारी संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री व या सत्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत येथे होत आहे. हा सत्कार सोहळा सकाळी 11 वाजता श्री स्वामी नारायण मंदिर सभागृह, दादर (पूर्व), मुंबई या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी व प्रसिध्दी प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली.

सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ, अनुभवी असलेल्या सतीश मराठेंनी बँक ऑफ इंडिया येथून नोकरीची सुरवात केली. त्यानंतर डोंबिवली नागरी सहकारी बँक तसेच जनकल्याण सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले. त्यानंतर युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली. इंडियन बँक असोसिएशन सारख्या विविध संस्थांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 1979 पासून सहकार भारतीच्या कामात त्यांनी महाराष्ट्राचे सरचिटणीस पदापासून राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत काम केले आणि आजही मार्गदर्शकाच्या भूमिकेतून करीत आहेत. 2020 पासून ते रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदावर कार्यरत असून त्यांची ही दुसरी टर्म आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments