परीक्षा, निवडणुका तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयंचलित सहाय्यक सुरक्षेसाठी उपकरणे निर्माण करणाऱ्या इनोव्हेटिव्ह्यू इंडिया लिमिटेड या तंत्रज्ञान-चलित कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.
कंपनीने ₹20,000.00 दशलक्ष [₹2000 कोटी] पर्यंतच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश असलेल्या इक्विटी शेअर्सच्या (फेस व्हॅल्यू प्रत्येकी ₹ 5) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे निधी उभारण्याची योजना आखली आहे. (“एकूण ऑफर”)
इनोव्हेटिव्ह्यू इंडिया लि.ने ही भारतातील परीक्षा एकात्मिक सुरक्षा उपायांमध्ये सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याचा 2024 या आर्थिक वर्षामध्ये महसुलाच्या संदर्भात बाजार वाटा 73.7% आहे. परीक्षा सुरक्षा आणि निगराणी ठेवण्याच्या व्यवसायात तिचा बाजार हिस्सा आर्थिक वर्ष 2024 मध्ये वार्षिक 69.07% इतका वाढला आहे. (स्रोत: एफ ऍण्ड एस रिपोर्ट)
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. (“सूचीचे तपशील”)
डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि शॅनन ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. (“बीआरएलएम”).


