महत्वाचे मुद्दे:
á 2024 Burgundy Private Hurun India 500 साठी पात्रता मर्यादा 9,580 कोटी रु. झाली असून गेल्या वर्षीच्या 6,700 कोटी रु. च्या तुलनेत यात 43% वाढ आहे.
á 2024 Burgundy Private Hurun India 500 मधील भारतातील सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचे एकत्रित मूल्य 3.8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर (324 लाख कोटी रु., 40% वाढ) आहे. हे भारताच्या जीडीपी पेक्षा आणि यूएई, इंडोनेशिया आणि स्पेन यांच्या एकत्रित जीडीपी पेक्षा जास्त आहे.
á ही यादी जाहीर व्हायला लागल्यापासून पहिल्यांदाच, 2024 Burgundy Private Hurun India 500 यादीतील सर्व कंपन्यांचे मूल्य किमान 1 अब्ज अमेरिकन डॉलर आहे, अगदी रुपयाच्या अवमूल्यनानंतरही.
á 2024 Burgundy Private Hurun India 500 कंपन्यांनी मजबूत 11% विक्री वाढ नोंदवली असून एकत्रित विक्री 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे.
á गेल्या वर्षीच्या 342 कंपन्यांच्या तुलनेत यंदा 364 कंपन्यांच्या मूल्यात वाढ झाली. त्यापैकी 65 कंपन्यांनी आपले मूल्य दुप्पट केले. 2023 मध्ये 45 कंपन्या होत्या. तसेच, 17 कंपन्यांनी 1 लाख कोटी रु. हून अधिक वाढ नोंदवली, तर 2023 मध्ये 2 कंपन्यांनी हे साध्य केले होते.
á यावर्षी 82 नवीन कंपन्या यादीत सामील झाल्या, गेल्या वर्षाच्या तुलनेत 21 ने वाढ.
á मोठ्या तीन कंपन्या: रिलायन्स इंडस्ट्रीज – 17.5 लाख कोटी रु. (12% वाढ) यांसह भारतातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी असून त्या पाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) – 16.1 लाख कोटी रु. (30% वाढ) आणि एचडीएफसी बँक 14.2 लाख कोटी रु. (26% वाढ) या कंपन्या आहेत.
á 2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानी कायम असून 17.5 लाख कोटी रु. मूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज TCS पेक्षा किमान 1.9 लाख कोटी रु. अधिक मूल्यवान आहे. टिसीएस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
á मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने 2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये 297% वार्षिक वाढीसह सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कंपनीचा मान पटकावला. त्यापाठोपाठ लगोलग Inox Wind आणि Zepto यांनीही वर्षभरात आपले मूल्य जवळपास तिप्पट केले.
á पहिल्यांदाच, भारती एअरटेलचा आघाडीच्या 5 मध्ये प्रवेश झाला आहे. दोन स्थानांची प्रगती करत 9.74 लाख कोटी रु. मूल्यासह 75% वाढ साध्य केली आहे.
á एनएसई अग्रणी 10 मध्ये असून 2024 Burgundy Private Hurun India 500 सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच National Stock Exchange (NSE) 4.7 लाख कोटी रु. मूल्यासह पहिल्या आघाडीच्या 10 मध्ये दाखल झाले आहे.
á NSE ने 201% वाढीसह 4.7 लाख कोटी रु. मूल्यासह भारतातील सर्वाधिक मौल्यवान बिगर-सूचीबद्ध कंपनी म्हणून SII ला मागे टाकले.
á 2024 यादीतील 22% कंपन्या बिगर-सूचीबद्ध आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 4% घट आहे.
á 2024 Burgundy Private Hurun India 500 मधील स्टार्टअप्सच्या एकूण मूल्यात 1,09,259 कोटी रु. ची वाढ झाली. यामध्ये Zepto, OYO आणि Zerodha आघाडीवर आहेत.
á बिगर-सूचीबद्ध कंपन्यांमध्ये, Zepto (269%), NSE (201%) आणि Physics Wallah (172%) यांनी सर्वाधिक टक्केवारी वाढ नोंदवली.
á 2024 Burgundy Private Hurun India 500 कंपन्या एकूण 84 लाख लोकांना रोजगार देतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 14 लाख वाढ आहे. प्रत्येक कंपनीमध्ये सरासरी 21,000 कर्मचारी आहेत.
á 338 कंपन्यांनी 1,000 कोटी रु. हून अधिक मूल्य वाढ नोंदवली, त्यापैकी 170 कंपन्यांनी 10,000 कोटी रु. हून अधिक वाढ केली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या 94 कंपन्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे.
á 39% कंपन्या सेवा क्षेत्रात कार्यरत, तर 61% कंपन्या प्रत्यक्ष उत्पादने विकतात.
á 65% कंपन्या ग्राहकांना थेट सेवा देतात, तर 35% कंपन्या B2B क्षेत्रात कार्यरत आहेत.
á या यादीत 43 शहरांतील कंपन्या समाविष्ट आहेत, त्यामध्ये मुंबई (154), बंगळुरू (44), आणि नवी दिल्ली (37) आघाडीवर आहेत. यांची मिळून एकूण संख्या 235 आहे. हरियाणाने दोन स्थानांची प्रगती करत दिल्लीला मागे टाकून 2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये पहिल्यांदाच आघाडीच्या 3 राज्यांमध्ये स्थान मिळवले.
á प्रमुख सूचीबद्ध नवीन प्रवेशकर्त्यांमध्ये Waaree Energies, SRF आणि Premier Energies आहेत. तर प्रमुख बिगर-सूचीबद्ध नवीन प्रवेशकर्त्यांमध्ये Adani Realty, Aparna Constructions & Estates आणि Shahi Exports यांचा समावेश आहे.
á 82 नवीन कंपन्यांचे एकत्रित मूल्य 18.8 लाख कोटी रु. आहे. हे गेल्या वर्षाच्या एकूण रकमेच्या तुलनेत दुप्पट आहे.
á आर्थिक सेवा क्षेत्रे आणि आरोग्यसेवा क्षेत्रे या यादीत अग्रणी असून या क्षेत्रातील अनुक्रमे 63 आणि 59 कंपन्या आहेत, त्यानंतर 52 कंपन्यांसह औद्योगिक उत्पादन क्षेत्र आहे.
á नवीन प्रवेशकर्त्यांमध्ये, औद्योगिक उत्पादन क्षेत्र आघाडीवर असून 19 नवीन कंपन्या आहेत, त्यानंतर आरोग्यसेवा (8) आणि ऊर्जा क्षेत्र (7) आहेत.
á सेवा उद्योगाने सर्वाधिक मूल्यनिर्मिती केली, त्यामध्ये Motilal Oswal Financial Services (#112) ने 297% वाढ नोंदवली आणि Zepto 179 स्थानांनी वर चढत #145 वर पोहोचले.
á टाटा समूहामधील 15 कंपन्यांचे एकत्रित मूल्य 32 लाख कोटी रु. असून ते 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांच्या एकूण मूल्याच्या 10% हिस्सा आहे.
मुंबई, 18 फेब्रुवारी 2025: अॅक्सिस बँकेचा प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय Burgundy Private आणि Hurun India यांनी ‘2024 Burgundy Private Hurun India 500’ ची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. ही यादी भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आहे. सूचीबद्ध कंपन्यांसाठी मार्केट कॅपिटलायझेशन आणि बिगर-सूचीबद्ध कंपन्यांसाठी मूल्यांकन यानुसार या कंपन्यांची क्रमवारी त्याच्या मूल्यावर आधारित आहे. या यादीमध्ये केवळ भारतात मुख्यालय असलेल्या कंपन्या समाविष्ट आहेत. यात सरकारी कंपन्या आणि परदेशी तसेच भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्या समाविष्ट नाहीत.
‘2024 Burgundy Private Hurun India 500’ यादी मध्ये समाविष्ट होण्यासाठी 13 डिसेंबर 2024 पर्यंतच्या निर्धारित वेळेत कंपन्यांचे किमान मूल्य 9,580 कोटी रु. (1.1 अब्ज अमेरिकन डॉलर) असणे आवश्यक आहे. या यादीतील कंपन्यांचे सरासरी कार्यात्मक कालावधी 43 वर्षे आहे. या यादीतील सर्व 500 कंपन्यांचे एकत्रित मूल्य 324 लाख कोटी रु. म्हणजेच 3.8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, BSE SENSEX मध्ये 27%, NIFTY 50 मध्ये 30% वार्षिक वाढ (YoY) झाली, तर S&P BSE 500 मध्ये 38% वाढ झाली आहे.
यावेळी बोलताना अॅक्सिस बँकेचे एमडी & सीईओ अमिताभ चौधरी म्हणाले: “Burgundy Private ला Hurun India बरोबर भागीदारी करून भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचा गौरव करण्याचा अभिमान वाटतो. 2024 Burgundy Private Hurun India 500 अहवाल अतुलनीय परिवर्तन होत असलेल्या भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा एक उल्लेखनीय आढावा सादर करतो. या यादीतील कंपन्यांनी नवीन धोरणे अवलंबून, नाविन्य आणून आणि बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेत त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये आघाडीचे नेतृत्व राखले आहे. आजवर कधीही नव्हता एवढा भांडवली बाजार अधिक गतिशील होत असताना या कंपन्यांनी दृष्टीकोन, लवचिकता दाखवत त्यांच्या भागधारकांसाठी प्रचंड मूल्य निर्माण केले आहे.
Burgundy Private Hurun अहवालासाठी पात्रतेची मर्यादा यंदा 43% ने वाढून 9,580 कोटी रु. झाली आहे. त्यामुळे या यादीतील प्रत्येक कंपनी जवळजवळ अब्ज-डॉलर मूल्याची झाली आहे. ही वाढ भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे स्पष्ट प्रतिक आहे. या कंपन्या 8.4 दशलक्ष लोकांना रोजगार देतात, 2.2 लाख कोटी रु. कररूपाने भरतात आणि 10,939 कोटी रु. सीएसआर उपक्रमांवर खर्च करतात. 3.8 ट्रिलियन अमेरिकी डॉलर या एकत्रित मूल्यासह या 500 कंपन्यांचे मूल्य भारताच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे आणि यूएई, इंडोनेशिया आणि स्पेन यांच्या एकत्रित जीडीपी पेक्षा जास्त आहे.
“अॅक्सिस बँकेमध्ये आम्हाला भारताच्या आर्थिक विकासकथेचा भाग असल्याचा अभिमान आहे. Burgundy Private द्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना परिवर्तनशील गुंतवणूक संधी साधण्यास सक्षम करतो. आमच्या ‘One Axis’ प्रणालीद्वारे, आम्ही त्यांना आवश्यक संपत्ती व्यवस्थापन उपाय पुरवतो. आमची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (Assets Under Management) आता 24 अब्ज अमेरिकन डॉलर असून वार्षिक 31% वाढ दर्शवत भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांसाठी आम्ही विश्वासार्ह भागीदार म्हणून काम करत राहू. आम्ही 2024 चा अहवाल प्रकाशित करत असताना या कंपन्यांनी निर्माण केलेल्या नवीन संधींना आणि भारताला 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने चालना देणाऱ्या परिवर्तनशील प्रभावाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
Hurun India चे फाऊंडर आणि चीफ रिसर्चर अनस रहमान जुनैद म्हणाले: “2024 Burgundy Private Hurun India 500 मधील कंपन्या भारताच्या खाजगी क्षेत्राचा ‘आधारस्थंभ’ आहेत आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकतात. या कंपन्यांचे एकत्रित मूल्य 3.8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर असून ते भारताच्या वार्षिक जीडीपी पेक्षा जास्त आहे. या कंपन्या 8.4 दशलक्ष लोकांना रोजगार देतात. जर तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था कशी विकसीत होत आहे हे समजून घ्यायचे असेल तर 2024 Burgundy Private Hurun India 500 मधील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यशोगाथा समजून घेणे हा एक उत्तम मार्ग आहे.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 मधून हे स्पष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या तीन वर्षांत मोठे परिवर्तन झाले आहे. 2024 Burgundy Private Hurun India 500 या यादीतील 82 कंपन्या नवीन आहेत. याचा दुसरा अर्थ असा की तीन वर्षांपूर्वीच्या कंपन्यांपैकी एक-तृतीयांशपेक्षा अधिक कंपन्या आता यादीत नाहीत. नवीन समाविष्ट कंपन्यांचे आणि यादीबाहेर पडलेल्या कंपन्यांचे विश्लेषण केल्यास अर्थव्यवस्थेतील बदल स्पष्ट होतात. सर्वाधिक नव्या कंपन्या असलेले क्षेत्र म्हणजे औद्योगिक उत्पादने, आरोग्यसेवा आणि ऊर्जा असून या यादीतून सर्वाधिक बाहेर पडलेल्या कंपन्या आर्थिक सेवा क्षेत्रामधील आहेत.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 पैकी केवळ 33 कंपन्या Hurun Global 1000 मध्ये स्थान मिळवू शकल्या. यामागचे एक कारण म्हणजे या भारतीय कंपन्या तुलनेने अजूनही खूप नवीन आहेत. या यादीतील कंपन्यांचा सरासरी कार्यात्मक कालावधी 43 वर्षे आहे. Hurun Global 500 मधील कंपन्यांच्या सरासरी कालावधीपेक्षा हा काळ 24 वर्षे कमी आहे.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 साठी आवश्यक पात्रता निकष 6,700 कोटी रु. वरून 9,580 कोटी रु. पर्यंत वाढला आहे. भारतीय कंपन्यांच्या आर्थिक वाढीचे हे द्योतक आहे. प्रथमच, या यादीतील प्रत्येक कंपनी अब्ज-डॉलर (billion-dollar) मूल्य गाठू शकली आहे. यादीतील कंपन्यांचे एकत्रित उत्पन्न 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे जे भारताच्या जीडीपीच्या एक-चतुर्थांशपेक्षा अधिक आहे.”
“या यादीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील उल्लेखनीय विविधता. 192 वर्षे जुन्या P N G Jewellers पासून ते 2021 मध्ये स्थापन झालेल्या स्टार्टअप्सपर्यंत या यादीत कंपन्या आहेत. ऐतिहासिक परंपरा आणि नव्या उपक्रमशीलतेचा हा संगम भारताच्या अर्थव्यवस्थेतील गतिशीलता आणि सतत होणाऱ्या बदलांचे प्रतिनिधित्व करतो आणि जागतिक स्तरावर भारताची शक्ती आणि अनुकूलन क्षमता दाखवतो.”
“मूल्यावर आधारित क्रमवारीतील Burgundy Private Hurun India 500 मधील जवळपास 60% कंपन्या Fortune India 500 यादीत नाहीत. कारण Fortune India 500 हा महसुलाच्या आधारे तयार केला जातो. Hurun 500 ही यादी सध्याच्या विक्रीपेक्षा पुढील वाढीला प्राधान्य देत भविष्यातील नफ्याच्या क्षमतेला महत्त्व देते. या यादीत सरकारच्या मालकीच्या कोणत्याही कंपन्यांचा समावेश नाही. त्यामुळे 7.7 लाख कोटी रु. मूल्य असलेली भारतातील सर्वात मौल्यवान भारत सरकारची सूचीबद्ध कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया या यादीत नाही. अन्यथा LIC, NTPC, ONGC यांसारख्या सूचीबद्ध आणि बिगर-सूचीबद्ध कंपन्यांसह 100 हून अधिक भारतीय राज्य सरकारी कंपन्या या यादीत येऊ शकल्या असत्या.”
“भारतीय स्टार्टअप आयपीओज मजबूत गतीने पुढे जात असून या व्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा नवा आत्मविश्वास यातून दिसून येतो. 2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये, स्टार्टअप्सनी केवळ 2023 मधील 4 लाख कोटी रु.च्या मूल्यांकनातील घट नोंदवली नाही, तर 4.4 लाख कोटी रु. ची वाढही साध्य केली. Zepto, Physics Wallah आणि Oyo यांनी उच्च मूल्यांकनावर नवीन गुंतवणूक फेऱ्या मिळवल्या, तर सूचीबद्ध स्टार्टअप्सच्या बाजार भांडवलामध्ये तीव्र वाढ झाली. Zomato ने एकट्याने 1.7 लाख कोटी रु. ची भर घालत सर्व सार्वजनिकरित्या सूचीबद्ध स्टार्टअप्ससाठी एकूण 3.9 लाख कोटी रु. ची मूल्यवृद्धी केली. ही वाढ स्टार्टअप आयपीओ मार्केटमध्ये वाढत्या आशावादाचे स्पष्ट संकेत देते आणि भविष्यातील सार्वजनिक सूचीबद्धतेसाठी मजबूत प्रवाह निर्माण करते.”
“अधिकाधिक भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर विस्तारत आहेत! 2024 Burgundy Private Hurun India 500 नुसार, 296 कंपन्या म्हणजेच यादीतील 59% कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत, तर 31 कंपन्या 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करतात. भारताची अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या जवळ पोहोचत असताना, हा जागतिक विस्तार परकीय चलन उत्पन्न वाढवत आहे, व्यापारी भागीदारी मजबूत करत आहे आणि गुंतवणुकींना आकर्षित करत आहे. त्यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत एक प्रभावशाली शक्ती म्हणून उदयास येत आहे.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये वित्तीय सेवा क्षेत्र अग्रस्थानी असून त्यामध्ये 63 कंपन्या 62 लाख कोटी रु. च्या एकूण मूल्यासह सूचीबद्ध आहेत. एकूण मूल्याच्या 19% हे प्रमाण आहे. वाढते पत प्रमाण, मजबूत गुंतवणूकदार आत्मविश्वास आणि भारताचे जागतिक वित्तीय केंद्र म्हणून वाढत असलेले स्थान यातून प्रतिबिंबित होते.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब दर्शवते. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राने 74% मूल्य वाढ नोंदवली आहे. ही वाढ व्यावसायीकरण, जागतिक सहयोग, तसेच प्रगत तंत्रज्ञान आणि अंतराळ मोहिमांवर केंद्रित प्रयत्नांमुळे झाली आहे.”
“शिक्षण क्षेत्राने गेल्या चार वर्षांत 47% च्या कंपाऊंड अॅन्यूअल ग्रोथ रेट (CAGR) महसुलात वाढ नोंदवली आहे. 2024 Burgundy Private Hurun India 500 मधील एक महत्त्वाची प्रवेश कंपनी Physics Wallah ने मागील वर्षाच्या तुलनेत 172% वाढ आणि 14,900 कोटी रु. ची एकूण मूल्यवृद्धी नोंदवली आहे.”
“बाजारातील वर्चस्वाची नवी व्याख्या – टाटानी आपले आघाडीचे स्थान टिकवून ठेवले असून Adani ने आपली पकड मजबूत केली आणि रिलायन्सने सिद्ध केले की आकार सर्व काही नसतो! टाटा समूहाने 15 कंपन्यांसह 2024 Burgundy Private Hurun India 500 च्या एकूण संचयी मूल्याच्या 10% योगदानासह आपले आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. Adani Group ने एक नवीन कंपनीची भर घालून आपले स्थान वाढवले असून यावर्षी त्यांच्या कंपन्यांची संख्या 9 झाली. केवळ 3 कंपन्यांसह असूनही, रिलायन्स समूहाने संचयी मूल्यात दुसरे स्थान मिळवले, जे बाजारातील त्याच्या मोठ्या प्रभावाचे निदर्शक आहे.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 यादीचा व्यावसायिक नकाशा बदलत आहे. मुंबई आणि बंगलोरमध्ये घट होत असताना हरियाणाने प्रगती केली. 2024 Burgundy Private Hurun India 500 च्या रँकिंगमध्ये हरियाणा पहिल्यांदाच दोन स्थानांनी पुढे जात अग्रणी 3 राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. यावर्षी, मुंबई आणि बंगळुरु या महत्वाच्या शहरांमध्ये कंपन्यांची संख्या कमी झाली, तर हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा यांसारख्या तुलनेने छोट्या शहरांमध्ये मोठी वाढ दिसून आली. भारताचे व्यावसायिक परिक्षेत्र बदलत असल्याचा हा संकेत आहे.”
“Burgundy Private Hurun India 500 कंपन्या आजवरचे सर्वाधिक रोजगार निर्माण करत आहेत. 2024 मध्ये या कंपन्यांच्या कार्यशक्तीत 20% वाढ होऊन जवळपास 1.4 दशलक्ष नवीन नोकऱ्या तयार झाल्या आणि त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 8.4 दशलक्ष झाली. या कंपन्या आता भारताच्या एकूण कार्यशक्तीच्या 16% रोजगार पुरवत असून राष्ट्रीय रोजगार धोरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यातून दिसून येते.”
“2024 Burgundy Private Hurun India 500 मध्ये महिला आता 17% संचालक पदांवर आहेत. स्त्री पुरुष समानता वाढीचे उपक्रम आणि समान संधी देणारी कार्यस्थळ धोरणे यांचा प्रभाव यातून प्रतिबिंबित होतो. वर्षभरात 13 महिलांनी वरिष्ठ नेतृत्व पदे स्वीकारली. यातून अधिकार पदावर महिलांचे प्रतिनिधित्व वाढत असल्याचे दिसून येते.”
“भारताची वेगाने व्यावसायिक वाढ होत असली तरी 2024 Burgundy Private Hurun India 500 यादीत एक महत्वाची दूरी दिसून येते. OpenAI किंवा DeepSeek च्या तोडीसारखी एकही भारतीय AI कंपनी या यादीत नाही. जागतिक स्तरावर अग्रणी कंपन्या कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्णतेसाठी AI चा लाभ घेत असताना अनेक भारतीय उद्योगांनी अजून त्यांच्या संपूर्ण क्षमता खुल्या करणे बाकी आहे. जागतिक पातळीवर स्पर्धात्मक, कार्यक्षम राहण्यासाठी भारताला AI तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे आणि स्वदेशी AI कंपन्या उभारणे अत्यंत गरजेचे आहे.”
सलग चौथ्या वर्षी भारतातील आघाडीच्या 500 सर्वात मौल्यवान कंपन्यांची यादी सादर करण्यासाठी अॅक्सिस बँकेचा खाजगी बँकिंग व्यवसाय Burgundy Private सोबत भागीदारी करणे ही Hurun India साठी गौरवाची गोष्ट आहे. या सहयोगातून भारतीय आर्थिक परिसंस्थेमध्ये व्यवसाय विस्ताराला चालना देण्यात भारतीय कंपन्यांच्या विकासाची महत्वपूर्ण भूमिका आणि त्यांचे असलेले योगदान याचे प्रतिबिंब दिसून येते,” असे Hurun India चे फाऊंडर आणि चीफ रिसर्चर अनस रहमान जुनैद यांनी सांगितले.


