Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवा महोत्सवात चमकदार कामगिरी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे...

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवा महोत्सवात चमकदार कामगिरी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स : दोन सुवर्ण सह एक रौप्य आणि तीन कांस्यपदके विद्यार्थ्यांनी पटकावली

पुणे : नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित ३८ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी संचालक प्रा . शारंगधर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २ दोन सुवर्णपदके एक १ रौप्य पदक तर तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे.

या स्पर्धेत एकूण १४२ विद्यापीठे पात्र ठरली होती. भारती विद्यापीठाच्या
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पदके पटकावली. भारतीय शास्त्रीय गायनात नंदिनी गायकवाड आणि भारतीय वाद्य संगीत (ताल वाद्य) यामध्ये सूर्यकांत शिंदे यांनी सुवर्णपदक पटकाविले.

भारतीय सुगम संगीत स्पर्धेत अंजली गायकवाड हिने रौप्यपदक पटकाविले. भारतीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) हर्षिद शंकर, लोकवाद्य ऑर्केस्ट्रा आणि भारतीय शास्त्रीय नृत्यात गौरी पेंडसे हिने कांस्यपदकाची कमाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments