Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्टार हेल्थ इन्शुरन्स ठरले भारतातील सर्वात मोठे होम हेल्थ केअर नेटवर्क ...

स्टार हेल्थ इन्शुरन्स ठरले भारतातील सर्वात मोठे होम हेल्थ केअर नेटवर्क · संपूर्ण भारतात 100 ठिकाणी स्टार हेल्थ इन्शुरन्सचा विस्तार · 3 तासांच्या आत ग्राहकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या दारात मिळू शकते · आरोग्यसेवेची सुलभता, उपलब्धता सुधारण्यासोबतच ती आवाक्यातही येते · मुंबई, दिल्ली आणि पुणे येथील सेवेत सर्वाधिक वाढ

भारत, 25 फेब्रुवारी 2025 : भारतातील सर्वात मोठी किरकोळ आरोग्य विमा कंपनी, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (स्टार हेल्थ इन्शुरन्स) आपल्या होम हेल्थ केअर (HHC) उपक्रमाचा संपूर्ण भारतभर 100 ठिकाणी विस्तार केला आहे. यामुळे ती देशातील सर्वात मोठी होम हेल्थ केअर (HHC) कंपनी ठरली आहे. जुलै 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आता स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या 85% पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा मिळते. या अंतर्गत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 3 तासांच्या आत कॅशलेस डोअरस्टेप वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. यामुळे भारतातील आरोग्यसेवेची सुलभता, उपलब्धता वाढण्यासोबतच ही सेवा आवाक्यात येते.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ आनंद रॉय म्हणाले, “आरोग्य विमा म्हणजे केवळ आर्थिक कव्हरेज देणे नाही तर त्या पलीकडे आहे, यावर आमचा विश्वास आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी सुलभ आणि आवाक्यातील आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे. मोठ्या रुग्णालयांमधील खर्च, लॉजिस्टिक आव्हाने आणि काळजी घेण्याशी संबंधित ताण यासारखे अडथळे दूर करणे यावर आम्ही सध्या काम करतो आहोत. दर्जेदार वैद्यकीय सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देऊन त्यांना आराम मिळावा आणि त्यांना मनःशांती देण्यासाठी करण्याचे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम आमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा लक्षात घेऊन आरोग्य विमा वितरण सुलभ, परवडणारे आणि डिझाइन केलेले आहे याची खात्री करून परिवर्तन करण्यावर आमचा भर आहे याचा हा ठोस पुरावा आहे.”

संसर्गजन्य रोगातून बरे झालेल्या रुग्णांना HHC उपक्रम वेळेवर वैद्यकीय सेवा पुरवतो. या कार्यक्रमांतर्गत, रुग्णाची परिस्थिती पाहण्यासाठी, निदान करण्यासाठी आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी एक डॉक्टर नियमित वैयक्तिक फॉलोअपसह गरजेच्या वेळी त्याच्या घरी जाऊन भेट घेतो. आजाराच्या तीव्रतेनुसार गरज भासल्यास डॉक्टर हॉस्पिटलायझेशनची शिफारस करू शकतात, याची शक्यता 1% पेक्षा कमी असली तरीही.

मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारखी शहरे या सेवांचा अवलंब करण्यात सक्रिय आहेत, ज्यात प्रामुख्याने व्हायरल ताप, डेंग्यू, आतड्यांसंबंधी ताप, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि श्वसन संक्रमण यांसारख्या आजारांवर उपचार केले जातात. 15,000 हून अधिक रुग्णांनी स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या होम हेल्थ केअर उपक्रमाचा होम ॲडमिशन आणि होम बेस्ड कन्सल्टेशन्सच्या संयोजनाद्वारे लाभ घेतला आहे.

केअर24, पोर्टिए, अर्गला, अथुल्या आणि अपोलो या प्रमुख आरोग्य सेवा प्रदात्यांसह भागीदारीद्वारे विस्ताराची सोय करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments