Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत ८० तक्रार वजा सुचना प्राप्त

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत ८० तक्रार वजा सुचना प्राप्त

पिंपरी, १० मार्च २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८० तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, १२, ५, ११, ५, ७, १३ आणि १३ अशा एकूण ८० तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांची निगा राखणे, कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करणे, रस्त्यावरील विजेचे खांब दुरुस्त करणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, ड्रेनेजलाईन दुरुस्त करणे, नवीन ड्रेनेजलाईन टाकणे, फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करणे, नियमित पाणीपुरवठा करणे, यासारख्या विविध तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत मांडल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments